हॅरी पॉटर - भाग दोन
भाग १
हॅरी पॉटरच्या जगातले जादुई प्राणी
या जगात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जादुई प्राणी / जादुई जीव आहेत . त्यातले कथेच्या दृष्टीने महत्वाचे आणि विविधतेची साधारण कल्पना येईल असे काही पुढीलप्रमाणे -
१ . हाऊस एल्फ्स -
हाऊस एल्फ हे अतिशय जुन्या व श्रीमंत प्युअर ब्लड जादूगार घराण्यांमध्येच आढळून येतात . हाऊस एल्फची उंची साधारण 3 फूट असते . हाऊस एल्फ हे आपल्या मालकाची आज्ञा पाळण्यास जादूने बद्ध असतात . मालकाची कोणतीही आज्ञा ते मोडू शकत नाहीत .
मिसळपाव