Skip to main content

मत

दादाजीपंतांनी सिऊबास शहाणे केले

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 04/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, लोकप्रभातील श्री. पांडूरंग बलकवडे यांचा खालील लेख जरूर वाचावा आणि इतरांस वाचण्यास प्रवृत्त करावे. ब्रिगेडच्या अतिरेक्यांना दादोजींनी जिजाऊंचा मातोश्री असा उल्लेख करून चोख उत्तर दिले आहे. लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! आपल्या पुढार्‍यांइतकी नीच माणसे या पृथ्वितलावर सापडणे नाही. जयंत कुलकर्णी.

स्वयंभू राजें शिवछत्रपतींना गुरुची गरजच नव्ह्ती.......

लेखक अमोल देशमुख यांनी शुक्रवार, 24/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांना खरे पाहता गुरुची गरजच नव्हती, ते एक स्वयंभू व्यक्तिमत्व होते, गेल्या हजार वर्षात असा राजा झाला नाही, पुढे होणार नाही, त्यांच्या गुरुविषयी आपण का बोलावे, त्यांचे व्य्क्तीमत्वच ईतके उत्तुंग होते की आपले विचारही त्यां उंचीर्यंत पोहोचत नाहीत, मग हे चर्चेचे गु-हाळ कशासाठी ही चर्चा केल्याने काय होईल, महाराष्ट्रातले काही लोक म्हणतात हे त्यांचे गुरु होते, काहींचे म्हणने आहे ते नाही हे होते, उगाच वाद वाढतो आहे, त्या वादाचे आता राजकारण होत आहे.

वर्तूळ - एक अनुभव

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 23/11/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आपण एखाद्या चित्रपटाने आनंदी होतो किंवा अस्वस्थ होतो. तसं झालं तर आपण म्हणतो “अरे हा चित्रपट मस्त होता हं” अर्थात चित्रपट चांगला असायची ही एकच परीक्षा आहे असं म्हणता येत नाही. उदाहरण द्यायचे म्हणजे इराणी चित्रपट. विशेषत: लहान मुलांवरचे. त्यात काही खास अशी गोष्ट नसते, तरीही पण आपण तो चित्रपट बघितल्यावर काहीतरी वेगळा अनुभव घेतला आहे असे आपल्याला सारखे वाटत रहाते.

चिरंजीव चिंटू

लेखक डावखुरा यांनी गुरुवार, 18/11/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

मी, बाटली आणि देशद्रोही

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 16/11/2010 या दिवशी प्रकाशित केले.
देशद्रोही ह्या अशक्यप्राय चित्रपटावर चार ओळी लिहून मी मिपावर लेखक म्हणून पदार्पण केले. त्यावर बऱ्याच गंमती गमतीच्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. बिहारी-मराठी वाद पेटलेला असतानाच खास बिहारींचे महत्त्व आणि त्यांचे औदार्य वगैरे पटवून देणारा चित्रपट अशी हवा करत हा चित्रपट तेव्हा आपल्यावर येऊन आदळला होता. स्वत:ला 'के आर के' म्हणवून घेणाऱ्या कमाल रशीद खान ह्या महामानवाचे हे पाप! पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तो 'कॅम कॉपी' होता.

फुल्ल टू दबंग

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 29/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
काल मध्यान्ह मुहूर्तावर मी छानसे देवाला आणि स्वतःला वंदन केले. त्यानंतर 'हे कसे शक्य आहे? ' 'असे कधी असते का? ' असे नको ते प्रश्न विचारणारा मेंदूचा भाग काढून बाजूला ठेवाल. त्यानंतर छानसा उजव्या हाताला रुमाल गुंडाळला आणि शर्टाचे वरचे बटण उघडे टाकून मी रिक्षावाल्यांच्या ईस्टाइलने खुर्चीत स्थानापन्नं झालो.