Skip to main content

हिमरंग

लेखक शरद यांनी गुरुवार, 16/08/2012 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
3

सरदार अजितसिंह यांना आदरांजली

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 15/08/2012 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
ajit singh सरदार अजितसिंह यांचा जन्म नवान्शहर तहसिलातील खट्करकलान येथला. जन्मदिवस दिनांक २ फेब्रुवारी १८८१. ज्या कुळात जन्म घेतला ते सिंधु कुल म्हणजे साक्षात क्रांतिचा कल्पवृक्ष. सरदार अजितसिंहांचे वडील सरदार अर्जुनसिंह हे प्रखर राष्ट्रवादी आणि आधुनिक विचारसरणीचे. आपले ईंटर आर्ट्स चे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी शिक्षकाची नोकरी सुरू केली.

फोटोशॉप - स्वप्नांना रेखाटण्याचे कैनवास

लेखक सौरभ उप्स यांनी शनिवार, 11/08/2012 04:03 या दिवशी प्रकाशित केले.
फोटोशॉप - स्वप्नांना रेखाटण्याचे कैनवास नमस्कार... फोटोशॉप ची किमया खुप आहे... डिजिटल कलेचा मुलभुत भाग बनलेल्या या सॉफ्टवेर ची गरज हल्ली सर्वाना लागते... दिसत तस नस, असच हे सॉफ्टवेर आहे आणि याचा वापर याच म्हाणीला खर करण्यासाठी बहुदा वापरला जातो.. म्हणजे जे जस दिसत ते त्यापेक्षा सुंदर, छान किंवा विचित्र काही (गरजे नुसार) आपण करू शकतो... म्हणाव तस सोप्प नाही हे सॉफ्टवेर पण तस कठिणही नाही.... असच अचानक कोल्हापुरहुन येताना ट्रेनमधून काढलेले काही फोटो बघताना त्यातले २ फोटो बघून डोक्यात कुठून कशी tube पेटली माहित नाही, वाटल हे २ फोटो मिक्स करून काहीतरी वेगळ कराव.. ते अस काही झाल की जास्त काही

दहीहंडीचा आधुनिक अवतार

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 10/08/2012 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज दहीहंडीच्या दिवशी मुंबईत हंडीचा आधुनिक अवतार पाहायला मिळाला. पारंपारिक हंडी ही रस्त्याच्या दोन बाजुंना परस्परासमोर उभ्या असलेल्या इमारती वा खांब यांच्यावर दोरखंडाने बांधुन उंच टांगलेली असते. मात्र यंदा प्रथमच मुंबईत बांधकामासाठी वापरल्या जाणार्‍या उंच क्रेनचा वापर मी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हंडी टांगण्यासाठी केलेला पाहिला. क्रेनच्या टोकाला लटकलेली हंडी, वर सोनेरी छत्र व ध्वज, पताका यांची सजावट या कल्पकतेला मनोमन दाद द्यावीशी वाटली. मला फोटो टिपायला जमले नाही, पण माझ्या मागोमाग आलेल्या माझ्या साहेबांनी त्यांच्या ब्लॅकबेरीवर ही हंडी टिपली आणि मला धाडली.

अनोखे रक्षाबंधन

लेखक आनंद भातखंडे यांनी सोमवार, 06/08/2012 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
अनोखे रक्षाबंधन दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी माझ्या मुलीच्या विद्यानिकेतन शाळेत पालक सभेच्या निमिताने जाण्याचा योग येतो. एका चांगल्या आणि नावाजलेल्या शाळेत माझ्या मुलीला प्रवेश मिळाला आणि तिची शैक्षणिक प्रगती सुरु झाली. या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेचे सगळे सोपस्कार पूर्ण करून ज्यांना प्रवेश मिळतो त्यांचे पालक कृतकृत्य होतात आणि ज्यांना मिळत नाही ते नेहेमी प्रमाणे त्यांच्या कार्यप्रणालीला नावे ठेवतात. विद्यानिकेतन शाळा तशी डोंबिवलीच्या गजबजाटापासून लांबच.

फंडामेंटल विश्लेषण

लेखक सदानंद ठाकूर यांनी शनिवार, 04/08/2012 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
फंडामेंटल विश्लेषण फंडामेंटल विश्लेषण म्हणजे काय? फंडामेंटल (मुळतत्वावर आधारीत) विश्लेषण म्हणजेच पारंपारीक बाबींचा विचार करुन व कोणत्याही प्रकारच्या स्पेक्युलेटिव्ह (भविष्यातील संभाव्य घटणांचा) विचार न करता केलेले विश्लेषण असे म्हणता येईल कारण हे दलाल स्ट्रिटवर होणा-या उलथापलथीशी संबधीत नसते व ते खालील तिन बाबींचाच विचार करुन केले जाते. १) अर्थव्यवस्था २) औद्योगीक वातावरण (उद्योग) ३) कंपनी मुळतत्वावर आधारीत विश्लेषण करताना वरील तिन्ही घटकांचा एकत्रीत पणे विचार करावा लागतो व वरीलपैकी कोणतीही एक बाब वगळून ते करता येत नाही.

हलकल्लोळ - १ (उपोद्घात)

लेखक पुष्कर यांनी शुक्रवार, 03/08/2012 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षी जयेशने मला 'केऑस्' ह्या नावाचं पुस्तक दिलं. का कुणास ठाऊक, पण अनेक दिवस माझी समजूत अशी होती की केऑस् हा विषय अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्सशी निगडीत असावा. जयेशनी थोडीफार कल्पना दिली होती, पण ते पुस्तक उघडण्याची इच्छा अनेक दिवस मला झाली नाही. (पुस्तक मुखपृष्ठ छायाचित्र सौजन्य -  http://www.midshelf.com/ProductSummary.aspx?P=9780749386061 ) अश्याच एका कोणत्या तरी दिवशी 'बघुया काय आहे ते' या विचारानी मी ते पुस्तक उघडलं आणि मग मात्र त्यात गुंगून गेलो.