अग्नी(इंद्र)धनूष्य..........
अग्नीधनूष्य हा एक फार दुर्मिळ अद्भूत असा नैसर्गिक चमत्कार आहे. हा घडायला आकाशात तंतूमय ढग असावे लागतात व त्यांची उंची वीस हजार फुटाहून अधिक असावी लागते. एवढेच नाही तर या ढगात भरपूर बर्फाचे कणही असावे लागतात.
सुर्याचे किरण या ढगांवर बरोबर अठ्ठावन्न अंशाचा कोन करून पडावे लागतात. असे झाले तर हे इंद्रधनुष्य़ आग आकाशाला आग लागल्यासारखे दिसू लागते.
या चमत्काराचे शास्त्रीय नाव आहे “सरकमहॉरीझाँटल आर्क”.
हे नेहमी दिसणारे इंद्रधनुष्य नाही. जेव्हा प्रकाश उंचीवर असलेल्या तंतूमय ढगातून जातात तेव्हा हे चमत्कार दिसतात.
मिसळपाव
साधारणपणे वाईट चित्रपटांच्या काही कॅटेगर्या असतात. वाईट, खुप वाईट आणि अशक्य वाईट. याच्या व्यतिरिक्त एक क्याटेगरी आहे जी केवळ २-४ चित्रपटात संपु शकते. जानी दुष्मन त्यापैकी एक. चित्रपटाचे नाव खुप जालीम आहे. तुमचा एखादा जानी दुष्मन असेल तर त्याला खुर्चीला बांधुन ठेवुन हा चित्रपट दाखवावा. त्याला अजुन टॉर्चर करायचे असेल तर याच चित्रपटातले "जावेद भाई सो रह्यले है" हे गाणे चालीवर पाठ म्हणुन दाखवायची शिक्षा द्या. एकतर तो दुष्मनी सोडुन देइल किंवा दुनिया. दोन्ही तुमच्या साठी चांगलेच आहे.