Skip to main content

डोंबिवली कट्टा.... हेमांगी के... ह्यांच्या समवेत...

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 28/01/2014 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरील एक आदरणीय व्यक्तीमत्व (हेमांगी के) सध्या भारतात आल्या असून, एक,दोन फेब्रूवारीच्या सुमारास त्या डोंबिवलीला आहेत. नक्की वेळ,तारीख आणि ठिकाण (अर्थात डोंबिवली मधीलच) त्यांना विचारून ३१ ता.च्या सुमारास ठरेल. पुरुष मंडळींपैकी ज्यांना यायचे असेल, त्यांनी मला व्य.नि. करावा, ही विनंती. भगिनींनी, अजया ताईंना व्य.नि. करावा. पुढील रंगतदार कट्यांची घोषणा लवकरच.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 8671
प्रतिक्रिया 48

प्रतिक्रिया

मजा आहे राव. करा लेको कट्टे करा, खा खा मजा करा.

In reply to by मुक्त विहारि

एक कट्टा बडोद्याला पण करायचा आहे...
कधी ? कधी ? कधी ? वाटल्यास खर्च माझ्याकडुन. आणी हो इथेही राणीची नसली तरी सयाजीरावांची बाग आहे बरं.

In reply to by इरसाल

कमेठी बाग का? व्वा वा! कट्टा सहकुटुंबच करा. छोट्यांना आवडेल अशी छोsssट्टीशी झुक-झक गाडी (माझे लहानपणीचे प्रचंड आकर्षण), प्राण्यांचे पिंजरे आणि मोठ्यांसाठी विस्तिर्ण हिरवळ. शांतता आणि पक्षांचे आवाज. एक संपूर्ण निवांतपणा.

अरे वा ! ह्या कट्ट्याला यायला जरूर आवडले असते. हेमांगी के यांचे लेखन आवडीने वाचतो. कट्ट्याला अनेक शुभेच्छा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आता पुढच्या कट्ट्याला आमच्या साठी वेळ काढा, ही नम्र विनंती.

In reply to by मुक्त विहारि

धन्यवाद ! विनंती करुन कशाला लाजवताहात ? तिथे असतो तर कट्ट्यांची मजा थोडीच चुकवली असती? आलो की भेटूच.

शुभेच्छा! मात्र बंधुलोकांनी एकाला व भगिनीसमाजाने दुसरीला व्यनि करावा हे काही कळलं नाही ब्वॉ! असो.

In reply to by कवितानागेश

भगिनींची 'बंधू' म्हणून आणि बंधूंची 'भगिनी' म्हणून नोंद होईल. भगिनी तर पँट आणि टी शर्टात येऊ शकतील. मात्र बंधुंना साडी किंवा पंजाबी ड्रेस म्हणजे फार अवघडच होईल.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कारण, पुर्वीचे मिपा आणि सध्याचे मिपा, थोडे वेगळे आहे. टवाळा आवडे विनोद , असे जरी असले तरी... आजकाल टवाळगिरी करतांना बर्‍याच वेळा भान रहात नाही. म्हणूनच अशी उपाययोजना करायला लागली.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल टवाळगिरी करतांना बर्‍याच वेळा भान रहात नाही.
???? उदाहरण???

In reply to by टवाळ कार्टा

असेच म्हणतो. उदाहरण???? हे बंधु भगिनी सेग्रेगेशन फारच होतंय का काय? - (सगळ्या काळातलं मिपा बघितलेला)

हेमांगीके यांच्यासोबतच्या या कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा!! त्यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखिकेसोबत कट्टा अनुभवायला मजा आली असती. फोटो नक्की टाकावेत ही विनंती आणि सविस्तर मजकूर पाहिजेच पाहिजे. :-) --समीर

वा मु.वि. वा तुम्हाला सा. ___/\__/\_ मानलं तुम्हाला माझ्या मागिल प्रतिसादांत मी तुम्हाला "कट्टा नियोजन अधिकरी" म्हंटलं होतं ते काहि उगाच नाही ब्वॉ.

!कट्ट्यास हर्दिक शुभेच्छा !


कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा!! अमेरिकेत राहणार्‍या मिपाकरांच्या नव्या पिढीचे प्रतिनिधित्व मिपा कट्ट्यामध्ये (जॅक डॅनियल्सनंतर) हेमांगी करत आहे हे पाहून समाधान वाटत आहे.

तारीख : २ फेब्रुवारी २०१४ (रविवार) ठिकाण : मॉर्डन कॅफे, फडके रोड , डोंबिवली (पुर्व) स्टेशन पासून चालत ५/६ मिनिटांवर आहे. वेळ : सकाळी १० वाजता.

In reply to by प्यारे१

मॉर्डन हा बोली भाषेतील शब्द आहे. पुण्यात असलेल्या मॉडर्न कॉलेज अथवा मॉडर्न कॅफे अशा जगप्रसिद्ध ठिकाणांना बरेच पुणेकर मॉर्डन कॉलेज अथवा मॉर्डन कॅफे असेच म्हणतात. ;)

In reply to by प्रचेतस

डोंबिवली ला देखील मोठा सांस्कृतिक इतिहास असल्याने डोंबिवली मध्ये देखील अशीच बोली भाषा असू शकते असं सुचवायचं/ म्हणायचं आहे का? मुवि शेठ हलकं घ्या हो! अजया मॅडमनी खाली विशेष सूचना दिलेली आहेच. :)

In reply to by प्यारे१

भावना महत्त्वाच्या!! नै का प्यारेकाका? अध्यात्माच्या वाटेवर चालणार्‍याच्या वागण्यात असा विरोधाभास बरीक शोभत नाही हो !!

बाकी मुवि आदरणीय वैगेरे लिहून लाअजवू नका हो. मला एकदम म्हातारं झाल्यासारखं वाटलं. इतक्या कमी वेळात धडपड करुन कट्टा आयोजनासाठी अजया आणि तुमचे मनापासून धन्यावाद. बाकी भेटूच २ तारखेला.

येतोय. मुक्त विहारी ,तुम्ही क ट्ट क री अशी सही का करत नाही ?

कट्टयाला मीसुध्दा येतोय.

@ठिकाण : मॉर्डन कॅफे, फडके रोड , डोंबिवली (पुर्व) स्टेशन पासून चालत ५/६ मिनिटांवर आहे. सुप्रसिद्ध फडके रोड वर असे लिहितो , सहज सापडेल कट्याला शुभेच्छा

कट्टयाला उपस्थित मिपाकर - हेमांगीके, अजया, मुक्त विहारि, सुबोध खरे, रामदास काका, सूड, भ ट क्या खे ड वा ला, विनोद१८, स्पा आणि मी कट्टयाचा सविस्तर वृत्तांत येईलच लवकर.

In reply to by किलमाऊस्की

सध्या रात्र थोडी सोंग फार
अहो चालायचंच. आमच्याकडेही रात्रीची सोंग फाssssर असतात.