Skip to main content

पवनचक्की.

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी शुक्रवार, 25/08/2017 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
अन्न,वस्त्र, निवार्या नंतर जर मानवाची चौथी गरज असेल तर ती म्हणजे ऊर्जा. भारत हा जगातील तीसरा सर्वात मोठा विद्युत ऊर्जा निर्माण करणारा व चौथा सर्वात मोठा ऊर्जेचा वापर करणारा देश आहे. देशात एकुण ऊत्पादन क्षमतेत पवनऊर्जेचा वाटा जवळपास 10% आहे. भारतात पवनऊर्जेची सुरूवात 1990 च्या जवळपास झाली. . भारताचा जगात पवनऊर्जा निर्मीतीत पाचवा क्रमांक लागतो. सुझलाँन ही भारतातील पवनऊर्जा निर्मीती क्षेत्रातील पहीली व सर्वात मोठी कंपनी.

विष्णू - बोधचिन्हे आणि प्रतिकं

लेखक आर्य यांनी शनिवार, 19/08/2017 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याच दिवसांपासून लिहायचे होते, पण कामामुळं राहून जात होतं... थोडी रोचक माहिती............ काही दिवसांपूर्वी पुन्हा दक्षिण भारत फिरायचा योग आला, त्यामध्ये अनेक मंदिरात गेलो, अर्थातच सर्वात जास्त मंदिरं विष्णूची किंवा त्याच्या विविध अवतारांची होती उदा: राम, कृष्ण, नृसिंह, केशव इत्यादी. पण प्रत्येक ठिकाणी वेगळी मुर्ती, वेगळी रचना, नाव वेगळं त्याचे सहचारीही वेगळे होते. एव्हढाच काय आपण विष्णूच्या विविध मूर्ती, चित्रं आणि ग्राफिक बघतो त्यात प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं विष्णूची रूपं दाखवतो, म्हणून त्यावर अभ्यास करायचा ठरवलं आणि त्यातून काही रोचक माहिती समोर आली.

सामाजिक उपक्रम २०१७ आढावा

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 15/08/2017 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! मिसळपाव साईटवर आवाहन जरी प्रथमच केले तरी आपल्या सामाजिक उपक्रमाचे हे ८वे वर्ष.

पैठणी दिवस भाग-३

लेखक गुल्लू दादा यांनी मंगळवार, 15/08/2017 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
बाह्यरुग्ण विभागामध्ये मलमपट्टी विभागात काम करायला मला विशेष आवडत असे. रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता येत असत. 'जखम कशी झाली' या विषयाद्वारे रुग्ण आपलं मन माझ्यापाशी मोकळं करत. त्यांच्याकडून मग मी पैठण शहराची माहिती, प्रेक्षणीय स्थळे, खाऊ गल्ली यांची माहिती अलगद काढून घेत असे. असेच एके दिवशी मध्यम वयाचे गृहस्थ आपल्या वडिलांना घेऊन मलमपट्टी विभागात आले. दोघेही एकमेकांवर मारवाडी भाषेत ओरडत आले. वडील मुलाला म्हणत होते, 'मला नाही करायची पट्टी बिट्टी'. त्यांचा मुलगा पण त्यांना प्रतिउत्तर देत होता.

मनुस्मृति भाग (३)

लेखक शरद यांनी शनिवार, 12/08/2017 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
मनुस्मृति भाग ३ पहिल्या दोन भागात आपण १२ अध्यायातील काही श्लोकांचे भाषांतर पाहिले. त्यात एक भाग जाणीवपूर्वक गाळला होता; तो म्हणजे शूद्रासंबंधी मनूचे विचार. आज आपण त्या संबंधातील काही श्लोक पहाणार आहोत. मनूचे विचार वीसाव्या शतकात पटणारे नाहीत. पण मनुस्मृतीवर विश्वास ठेऊन, त्याप्रमाणे वागणारे अनेक लोक भारतात होते. दलितांना मिळणारी वागणुक अमानुष अशीच होती. म्हणून १९२७ साली डॉ. बाबासाहेब अंबेडकरांनी प्रथमच मनुस्मृति जाहीरपणे जाळली. या घटनेची तुलना मुसलमान आक्रमकांनी नालंदा विद्यापीठातील ग्रंथसंपदा जाळली त्याच्याशी केली गेली पण ’ज्याचे जळते, त्यालाच कळते" हेच सत्य.

पैठणी दिवस भाग-२

लेखक गुल्लू दादा यांनी शनिवार, 12/08/2017 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रामीण रुग्णालय पैठण येथे आम्हाला एक महिना सेवा द्यायची होती. राहण्यासाठी 2 खोल्या तेथेच उपलब्ध करून दिलेल्या होत्या. सामान टाकून, हात-पाय धुवून आम्ही जवळपास दुपारी 4 च्या दरम्यान डॉ.सचिन सर यांकडे हजेरी लावली. आम्हाला महिन्याचे वेळापत्रक देण्यात आले. 2 जणांना सोबत महिनाभर काम करायचे होते. माझा सहकारी होता सुरज. संध्याकाळी खुप उत्सुक होऊन धरणावर फिरावयास गेलो असता असे अप्रतिम दृश्य नजरेस पडले. कितीही पाहिले तरी मन भरत नव्हते. हा क्षण नजरकैद करण्यासाठी आपसुकच आमचे कॅमेरे बाहेर येऊन क्लीकक्लीकाट सुरू झाला.

मनुस्मृति (भाग १)

लेखक शरद यांनी रविवार, 23/07/2017 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
मनुस्मृति (भाग १) आपण जेव्हा कोणत्याही धर्मकृत्याच्या संकल्पात " श्रुतीस्मृतीपुराणोक्त फलप्राप्यर्थम् " असे म्हणतो तेव्हा आपणाला फारफार तर पुराण माहीत असते, अगदी बरीच नावे माहीत नसली तरी त्यात जुन्या देवादिकांच्या गोष्टी असतात, त्यात भक्तीचा पुरस्कार केला आहे इतके जुजबी ज्ञान नक्की असते. श्रुती-स्मृती ही काय भानगड आहे ? आज थोडी माहिती मिळवू. वेदसंहिता-ब्राह्मणे-आरण्यके-उपनिषदे या सर्व साहित्याला श्रुती म्हणतात. आपल्या, विशेषत: पंडितांच्या, धार्मिक व्यवहारात, हा अतिम शब्द.

आपण स्वप्न का बघतो.

लेखक आदित्य कोरडे यांनी बुधवार, 19/07/2017 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
फार पुरातन काळा पासून माणसं त्यांना पडणाऱ्या स्वप्नांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आलेत. स्वप्नात भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत, पूर्व सूचना मिळतात असे मानले जाते. माणसाना भेडसावणाऱ्या चिंता स्वप्नांचे रूप घेऊन येतात किंवा ईश्वर बऱ्याचदा आपल्या भक्तांशी संवाद साधायला स्वप्न एक माध्यम म्हणून वापरतो असेही मानले जाते. अनेक कवी, लेखक, नाटककार, चित्रकार आदींना त्यांच्या कलाकृती साकार करण्याची प्रेरणा स्वप्नातून मिळाल्याचे सांगितले आहे.

विश्वामित्र- क्षत्रिय ते ब्राह्मण

लेखक शरद यांनी शनिवार, 15/07/2017 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
विश्वामित्र- क्षत्रिय ते ब्राह्मण श्री. माहितगार यांच्या एका धाग्यात विश्वामित्राचा उल्लेख आला होता. याची कथा सगळ्यांना माहीत असेलच असे नाही. मनोरंजक आहे. प्राचिन काळी वर्ण बदलता येत होते याची ही कहांणी. गोष्ट विश्वामित्राच्या आधीच्या पिढीपासून सुरू होते. ऋचीक हा विद्वान ब्रह्मर्षी त्याचे लग्न गाधी या क्षत्रिय राजाची मुलगी सत्यवती हिच्याशी झाले. पतिपरायण सत्यवतीवर प्रसन्न होवून ऋचीकाने तिला वर मागावयास सांगितले. ही गोष्ट सत्यवतीने आपल्या आईला सांगितली. आई म्हणाली ’तुझे पती महान तपस्वी व समर्थ आहेत.

’हॅरी पॉटर’: कास्टिन्ग (भाग १)

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी मंगळवार, 11/07/2017 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
’हॅरी पॉटर’ म्हटलं कि सर्वात आधी आठवतात तीन नावं – अभ्यासात सर्वात हुशार असलेली हर्मायनी ग्रेंजर, थोडासा मस्तीखोर, घाबरट आणि एका उंदराच मालक असलेला रॉन विजली आणि द स्टार ऑफ द फिल्म अर्थात ’हॅरी पॉटर’ .... ही तीन पात्र ज्यांनी पडद्यावर रंगवली ती आता ३० च्या घरात आहेत. हर्मायनी रंगवली ती ब्रिटिश अभिनेत्री एमा वोट्सन या ब्रिटिश अभिनेत्रिने. पहिल्या भागात काय cute दिसते ती. रॉन विजली उभा केला तो रुपर्ट ग्रीन्ट याने. सुरुवातीला अगदीच वेंधळा वाटत असला तरीही पहिल्या भागाच्या शेवटी बुद्धिबळाचा डाव खेळताना काय सुंदर अभिनय केलाय पठ्ठ्याने.