Skip to main content

माहिती

एक सुवर्णयोग !!!

लेखक वैशाली हसमनीस यांनी मंगळवार, 19/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात थोडेफार तरी सुवर्णयोग येत असतात.... कधी कळत तर कधी नकळत. असे हे योग अपार समाधान देऊन जातात. माझ्याही आयुष्यात १७ ऑगस्टला असाच एक सुवर्णयोग अवतरला. प्रसंग होता आमच्या 'ए. आय. एम. एस. टी(एम्स्ट)'विद्यापीठाच्या औपचारिक उद्घाटनसमारंभाचा. उद्घाटन होणार होते मलेशियाचे पंतप्रधान दातो(माननीय)स्री अब्दुल हजी अहमद बडावी यांच्या शुभहस्ते! आम्हाला सकाळी साडेनऊलाच ग्रेट हॉलमध्ये बोलाविले होते.

हौतात्म्याची शताब्दी आणि अजरामर हौतात्म्यगीत

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 11/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदुस्थानातील १८५७ साली भडकलेला क्रांतिचा वणवा शमला कि काय असे वाटत असतानाच विसावे शतक सुरू झाले आणि भारतमातेला मुक्त करण्यासाठी हिदुंस्थानातील क्रांतिकारकांनी पुन्हा एकदा क्रांतिदेवतेची आराधना सुरू केली.

सूर्यग्रहणाचे थेट प्रक्षेपण (नासाचे संस्थळ)

लेखक लिखाळ यांनी शुक्रवार, 01/08/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी ! आज सूर्यग्रहण आहे हे आपणाला माहितच आहे. नासाच्या या संकेतस्थळावर (http://www.nasa.gov/multimedia/nasatv) चीन मधून दिसणारे ग्रहण थेट दाखवत आहेत. या स्थळाची माहिती मला आताच समजली. नासाचे हे स्थळ जागातल्या अश्या काही घडामोडी नेहमीच थेट दाखवते असे दिसते आहे. म्हणजे पुढील वेळेस सुद्धा या स्थळाकडे लक्ष ठेवल्यास काही चांगले बघायला, ऐकायला मिळेल. या स्थळावर अजून काही स्वारस्यपूर्ण सापडल्यास कृपया प्रतिसादात लिहावे.

सफर---काम्पुंग तेपी सुंगाइची (आता फोटोसह बघता येईल!)

लेखक वैशाली हसमनीस यांनी गुरुवार, 31/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मलेशिया हा नैसर्गिक सौंदर्याचा वरदहस्त लाभलेला एक देश! जगभरातले लोक येथे पर्यटनस्थ्ळ म्हणून येतात. हा सर्व भाग सदाहरित वृक्षराजीने नटलेला.

भूलेश्वर -२

लेखक डोमकावळा यांनी सोमवार, 28/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
ध्रुव यांचा भुलेश्वर हा लेख वाचून त्याबाबत आणखी थोडी माहिती द्यावीशी वाटते. मंदिराची जागा ही अतिशय शांत व निवांत असून मंदिरात प्रवेश हा काहीसा वेगळ्या पद्धतीचा आहे. मंदिराच्या मुख्य दाराच्या समोर एक प्रचंड आकाराची पितळी (किंवा मिश्रधातूची) भग्न झालेली घंटा आहे. मुख्य दारातून आत शिरता लगेच एक अंधारी खोली असून तिच्या उजव्या बाजूला एक दगडी जिना आहे जो मंदिरात जातो.

जायंट मीटरवेव्ह रेडीओ टेलिस्कोप

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शनिवार, 26/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
वाचायला सुरूवात करण्यापूर्वी: या लेखातली भाषा बोजड असू शकते आणि विज्ञानाची आवड नसणाय्रांसाठी हा लेखच कंटाळवाणा असेल. तर या प्रमादांबद्दल आधीच क्षमा मागते. पुणे-नाशिक रस्त्यावर कधी गेला असाल तर जुन्नर किंवा नारायणगावच्या जवळ मोठमोठाल्या डिश अँटेना दिसतात. बय्राचदा त्या आर्वीच्या सैनिकी किंवा व्ही.एस.एन.एल.च्या संपर्क दुर्बिणी असतात पण कधीमधी आमच्या संशोधनाच्या दुर्बिणीही दिसतात. तर या दुर्बिणी दिसतात आपल्या डीश अँटेनासारख्याच (आणि त्यांचं कामही साधारण सारखंच असतं).

जर असं झालं तर....

लेखक सरपंच यांनी बुधवार, 23/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आज आत्ता मिसळपावचे मुखपृष्ठ दिसत नाहिये ! त्या जागी पान सापडले नाही असा मजकूर येत आहे. मात्र त्याच वेळी संकेतस्थळ योग्य पद्धतीने चाललेलं आहे. असं होण्याचं कारण असं की मिसळपाव वर अचानक गर्दी वाढली की त्या सर्वांना सेवा देता यावी म्हणून मग जी जड पाने आहेत ती बाजूला ठेवलीजाऊन सर्वांना सेवा देता यावी हा या मागचा उद्देश्य आहे. पहिलं पान हे सर्वात जड असल्यामुळे आज ते दिसत नाहिये. मात्र थोड्या वेळाने ते आपसुक दिसायला लागेल. जर का पुन्हा असं झालं तर आपल्याला वरच्या उजव्या मेन्युमधुन मिसळपाव वर सहज वावरता येईल. आज त्यात सदस्य प्रवेशाचा मेन्यु सुध्दा जोडला आहे.

माझं आवडतं नाटक : फ़ायनल ड्राफ़्ट

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 20/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नाटक : फ़ायनल ड्राफ़्ट लेखक आणि दिग्दर्शक : गिरीश जोशी कलाकार : मुक्ता बर्वे गिरीश जोशी निर्मिती : महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे जसे नाट्यलेखनाच्या मूलभूत नियमांबद्दल लिहिले, तसेच लेखनाच्या ठराविक आडाख्यांपासून दूर जाणारे, नियमांच्या साचेबद्ध चौकटी तोडणारे नाट्यलेखन यावरही लिहित आहेच..... चाहूल, साठेचं काय करायचं, लूज कंट्रोल यावर पूर्वी लिहिलं आहेच... तसंच थोडंसं वेगळं हे दोन अंकी नाटक ...