Skip to main content

रंजना देशमुख.

लेखक गणपा यांनी गुरुवार, 27/01/2011 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
सायली ताईंचा हा धागा आम्ही हायजॅक केला... देर आये दुरुस्त ये म्हणत तिथे आवंतर न करता मुद्दाम हा वेगळा धागा खास रंजना ताईंच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी. आपणा पैकी कुणालाही तिच्या बद्दल काही बोलायच / सांगायच असल्यास इथे मांडा. तिथे इतर गाण्यांबद्द्ल चर्चा घडत असतानाच रंजाना या काळाच्या पडद्या आड गेलेल्या गुणी अभिनेत्रीच्या आठवणी निघाल्या.

केक, केक आणी केक

लेखक पर्नल नेने मराठे यांनी गुरुवार, 27/01/2011 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
केव्हाच मनात होते ह्या विशयी बोलेन पण नाहि जमले. हल्ली केकच्या पा़क्रु टाकुन ह्या बायकांनी अगदी उत आणलाय. मला पण वाटतेय कि केक करुन ह्या बायकांचे छुपे चॅलेन्ज स्विकारावे ;) पण प्रॉब्लेम हा आहे कि माझ्याकडे ओव्हन नाही. माहेरी आहे पण कधी लक्श दिले नाही. माझ्याकडे एक साधा माइक्रोव्हेव आहे ज्याचा उपयोग मी फुड रि-हिटिन्ग साठी करते. ह्यात बेकरी/क्नन्व्हेक्शन असले मोड नाहित. तर ह्या साध्या माइक्रोव्हेवमधे मी केक व नानकटाइ टत्सम पदार्थ करुन शकेन का? तरी बायकांनी निट मार्गदर्शन करावे. मार्गदर्शनानंतर केक निट झाला नाही तर कोर्‍टात खेचले जाइल, वकिल आधिच पाहुन ठेवावा ;)

'द किंग'

लेखक प्रास यांनी मंगळवार, 25/01/2011 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
१९५० चा काळ, अमेरिकेत ज्याकाळात वर्णद्वेष ब~यापैकी वास्तव होते तेव्हा मिश्रवस्ती असलेल्या 'मेम्फिस' शहरामध्ये एक गौरवर्णीय मुलगा खूपदा कृष्णवर्णीयांच्या मौजेच्या ठिकाणी दिसायचा. त्यांच्या म्युझिक क्लब्स मध्ये जायचा, गाण्यांच्या कार्यक्रमात जायचा, इतकंच नाही तर गौरवर्णीयांच्या क्लब्समध्येही 'ज्यूकबॉक्स'मध्ये '~हिदम एन ब्लूज', 'गोस्पेल' आणि 'स्पिरिच्युअल' प्रकारची गाणी ऐकायचा. एरवीही रेडिओला चिकटण त्याला नवीन नव्हत.

शबद गुरबानी

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 25/01/2011 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी एका पंजाबी स्नेह्यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात मी 'मेहरावालेया साइयां रक्खी चरनां दे कोल' हे मला तेव्हा येत असलेले एकमेव पंजाबी भक्तिगीत गायले अन् त्या स्नेह्यांनी खूश होऊन लगेच त्यांच्याकडील उत्तमोत्तम पंजाबी गीतांची कॅसेटच मला भेट म्हणून दिली! शिवाय त्यांच्याकडे असलेले एक पुस्तकही चाळायला दिले. पंजाबी भाषेतील गाण्यांशी माझा तो पहिलाच परिचय! त्या अगोदर हिंदी चित्रपटांच्या काही गाण्यांमधून या भाषेची गोडी जाणवली होती. पण आता ती गाणी नियमित ऐकू लागल्यावर त्यांच्यातील रसमाधुर्य अजूनच आल्हाद देऊ लागले.

स्वरभास्कराची महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाने घेतलेली मुलाखत.

लेखक गणपा यांनी सोमवार, 24/01/2011 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज मटामध्ये, तीस-एक वर्षांपुर्वी आकाषवाणीवर पुलंनी अण्णांच्या घेतलेल्या मुलाखतीचे काही अंश छापुन आलेत. त्याच मुलाखतीची ही ध्वनीफीत.

गरजू हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 20/01/2011 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या माहितीतल्या एका संस्थेतर्फे गरजू व हुशार विद्यार्थ्यांना काही आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने एक उपक्रम चालू होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना या वर्षी दहावीत ९४%च्यावर गुण मिळतील तसेच त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. १,८०,०००/- पेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. सायन्स आणि कॉमर्स शाखेतील ११वी आणि १२वी साठी आर्थिक मदत केली जाईल. जर का विद्यार्थ्याने १२वीत परफॉर्मन्स मेंटेन केला तर वैद्यकिय अथवा अभियांत्रिकीच्या (फक्त शासकिय महाविद्यालायतील) शिक्षणासाठी देखिल मदत केली जाऊ शकते. आपणा सर्वांना नम्र आवाहन...

मौलाना गुलाम मोह्म्मद वस्तानी

लेखक कापूसकोन्ड्या यांनी बुधवार, 19/01/2011 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
विकास आणि प्रगती/ देवबंद ची साधक बाधक चर्चा व्हावी या उद्देशाने हा धागा काढला आहे. कोणताही उद्देश नाही तेंव्हा धागा उड्वू नये अशी नम्र विनंती. भारताची जनता खरेच वि कासासाठी आसुसली आहे का? गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे चे कौतुक केले देवबन्द ने हे काय चालले आहे! न्यू दिल्ली दारूल ऊलूम व्हाइस चान्सलर मौलाना गुलाम मोह्म्मद वस्तानी म्हणाले " दंग्यानंतर झालेले रिलिफ़ वर्क हे अत्यंत चांगल्या प्रकारे गुजरात सरकार आणि लोकांनी केले आहे." वस्तानी स्वत: एक एमबीबीए आहेत. ते स्वत: गुजरातचे आहेत. जातियवादींच्या गोटात त्यामुळे आनंदीआनंदी झाला असेलच.

मिपा - क्रिकेट विश्वचषक २०११ - आवाहन ...

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 19/01/2011 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, तयार आहात ना जल्लोशाला ? तयार आहात ना ढोल-ताशे, टाळ्यांचा कडकडाट, आरोळ्या आणि जयजयकाराला ? तयार आहात ना एखाद्या चुकलेल्या फटक्यावर, सुटलेल्या झेलावर आणि न दिलेल्या विकेटीवर खडाजंगी चर्चा करायला ? तयार आहात ना विजयानंतर डोक्यावर घेऊन नाचायला आणि लाजिरवाण्या पराभवानंतर हक्काने संघाला ४ खडे सुनवायला ? काय म्हणता ? कशाची तयारी करायची ? अहो 'क्रिकेट हा धर्म' असलेल्या आपल्या देशात अजुन महिन्याभरात क्रिकेटचा कुंभमेळा भरतो आहे.