Skip to main content

कल्पना सरोज --रोपरखेडा या अकोला जिल्ह्यातील एक हीरा.

लेखक कापूसकोन्ड्या यांनी शनिवार, 05/02/2011 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
कमानी ट्यूब ची मालकीण कल्पना सरोज रुपरखेडा या अकोला जिल्ह्यातील एक हीरा. मुंबई जवळच्या औद्योगीक आजाराने जर्जर (एकूण ₨ १६० कोटी कर्ज) झालेली बि आय एफ़ आर लिस्टेट कंपनी त्याब्यात घेणारी सरोज एक दलित समाजात जन्माला आलेली अत्यत खडतर प्रवास करत आलेली एक धडाडीची इन्ट्र्प्रुनर --तीन हजार कोटी रूपयाची मालकीण असलेल्या कल्पनाची कहाणी चित्तथरारक आहे. सुमारे ४८ वर्षांचे वय असलेल्या कल्पना ताईंचा एक मुलगा पायलट आहे आणि मुलगी उच्च शिक्षण घेत असलेली आहे.

मेला मैदा

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 05/02/2011 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
'आईईई.... प्लीईज्ज्ज... पिझ्झा कर न...किंवा नूडल्स .. पास्ता? तो पण नाही? मग नुसतं sandwich तरी कर न मग? असं काय? आम्ही काही पण करायला सांगितलं की तू नाहीच म्हणते! maggi पण नाही खाऊ देत. पिंकी ची आई तिला दररोज maggi किंवा ब्रेड बटर देते.' आमची आई: काय ते सगळे नुसते मेले मैदे खायचे असतात तुम्हाला! दूध पोळी खा पाहू मुकाट्याने! हा आमच्या लहानपणचा कायमचा संवाद. आमच्या आई ला हे माहित होतं की मैदा खाल्लेला चांगला नाही, त्यात काहीच जीवन सत्व नसतात असं ती आम्हाला सांगायची. पण जीवन सत्व म्हणजे काय? मैद्यात ती नसतात तर त्यात एवढा काय बिघडलं? किंवा मैद्यात ती का नसतात?

मोराची चिंचोळी व रांजणखळगे.

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 04/02/2011 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
सहल - मोराची चिंचोळी व रांजणखळगे. मित्रहो, अचानक ठरवुन देशस्थात ब-याच गोष्टी नीट होतात हे बाबांचं वाक्य सिद्ध करण्यासाठीच की काय दोन दिवसात हि सहल ठरवली आणि यशस्वी केली. या बद्दल आम्ही सर्व प्रथम आमचे मित्र कि जे श्री. राजशेखर व श्री. अभिजित यांचे अनेक आभार. तर या सहलीचा रिपोर्ट खालीलप्रमाणे सादर आहे.

लुई आर्मस्ट्राँग

लेखक प्रास यांनी गुरुवार, 03/02/2011 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
संगीताला कोणत्याही राष्ट्रीय सीमा नसतात आणि ते कोणत्याही एका वंशाची जहागीर नाही.

प्राचीन ग्रंथांचे ऑनलाईन ग्रंथालय: विश्वास भिडे यांचा उपक्रम

लेखक यकु यांनी मंगळवार, 01/02/2011 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
संपूर्ण ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, दासबोध, एकनाथी भागवत आणि सार्थ वाल्मिकी रामायण, महाभारताचे जवळपास सर्व खंड, ऋग्वेद, जोनाथन लिव्हींग्स्ट्न्स सीगल आणि असे सुमारे दीडशे ग्रंथ एकाच वेळी, तेही फुकट आपल्याला मिळू शकतात? होय. सांगली येथील श्री. विश्वास भिडे यांनी स्वत:च्या स्वेच्छानिवृत्तीच्या काळात पुरातन ग्रंथांना डिजीटलाईज्ड करण्याचे काम हाती घेतले आणि सुमारे दीडशे ग्रंथ अंतर्जालावर विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत. म.टा.

'क्वीन' - फ्रेडी मर्क्युरीची जादूगारी

लेखक प्रास यांनी शनिवार, 29/01/2011 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
झांझिबार मध्ये भारतीय पारशी आई-बापाच्या पोटी जन्मलेला एक मुलगा फारोख बलसारा शिक्षणासाठी भारतात येतो, मुंबई मध्ये, दादर (पूर्व) च्या पारशी कॉलनीमध्ये राहतो आणि शालेय शिक्षणानंतर पुढच्या शिक्षणासाठी लंडनला जातो. गीत-संगीतामध्ये लहानपणापासून रस असणारा फारोख लंडन मध्ये कलेचं रीतसर शिक्षण घेतो आणि संगीतामध्येच करीअर करतो. त्यात इतकं नाव मिळवतो की जगातल्या सर्वोत्तमांपैकी एक म्हणून गणला जातो.

स्पेस शटल चॅलेंजर

लेखक विकास यांनी शनिवार, 29/01/2011 05:41 या दिवशी प्रकाशित केले.
स्फुटनिक पासून अमेरिका-रशिया यांच्या मधे चालू झालेल्या अंतराळ स्पर्धेत अमेरिकेने मजल मारली होती. स्पेस शटलचे तंत्रज्ञान विकसीत करून पुन्हा पुन्हा तेच वाहन आंतराळात उपग्रह सोडण्यासाठी तसेच मानवी वावरासाठी आणि त्यांना परत आणण्यासाठी वापरणे आता नवीन राहीलेले नव्हते.