Skip to main content

साद रामेश्वरमची .... - भाग १

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 30/08/2011 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
साद रामेश्वरमची .... - भाग १
"शशिकांतजी आप को हमारे साथ रामेश्वरम आना है।"
असा हुकूम वजा आदेश मला फोनवरून आला व मी तात्काळ होकार कळवला. झाले. मी कामाला लागलो. तोवर हवाई प्रवासाची तिकीटे आली. मधल्याकाळात मला महर्षीं अत्रींच्या जीव नाडीत सांगण्यात आले, "तुला सांगून अजूनही अमुक अमुक ते सोपस्कार तू केलेले नाहीस.

'ओपनहायमर' पुस्तक प्रकाशन

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 30/08/2011 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
आण्विक शस्त्रास्त्रांविषयीच्या मतांमुळे अमेरिकन सरकारच्या रोषाचा धनी ठरलेला सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ ओपनहायमर याच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक पुस्तकाचं आज संध्याकाळी पुण्यात प्रकाशन होणार आहे. लेखिका: माणिक कोतवाल (यांनी पूर्वी गॅलिलिओवरही चरित्रात्मक पुस्तक लिहिलेलं आहे.) प्रकाशकः राजहंस प्रकाशन, पुणे स्थळः एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक वेळः सं. ५:३० वा. अध्यक्षः अच्युत गोडबोले उपस्थिती: डॉ. शंकरराव गोवारीकर कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. ओपनहायमरविषयी अधिक माहिती इथे मिळेल.

'ओपनहायमर' पुस्तक प्रकाशन

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 30/08/2011 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
आण्विक शस्त्रास्त्रांविषयीच्या मतांमुळे अमेरिकन सरकारच्या रोषाचा धनी ठरलेला सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ ओपनहायमर याच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक पुस्तकाचं आज संध्याकाळी पुण्यात प्रकाशन होणार आहे. लेखिका: माणिक कोतवाल (यांनी पूर्वी गॅलिलिओवरही चरित्रात्मक पुस्तक लिहिलेलं आहे.) प्रकाशकः राजहंस प्रकाशन, पुणे स्थळः एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक वेळः सं. ५:३० वा. अध्यक्षः अच्युत गोडबोले उपस्थिती: डॉ. शंकरराव गोवारीकर कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. ओपनहायमरविषयी अधिक माहिती इथे मिळेल.

() हजामांना मार्गदर्शन करता येईल का? ()

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 30/08/2011 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
हे वाड्मयचौर्य नाही, फारतर कल्पना आणि शब्द उधारीवर आणले आहेत. कुठून? करा थोडं खोदकाम. सर्वच छोट्या मोठ्या शहरखेड्यांत हजाम अस्तित्वात आहेत. वेळोवेळी नवीन हजाम आपापली दुकानेदेखील उघडतात. (त्यातल्या काहींचा हजामपणाचा धंदा बसला. काहींनी वयोपरत्वे राजीनामा दिला. काहींनी तर पुन्हापुन्हा राजीनामा दिलेला आहे. तर काही दीर्घ मुदतीच्या रजेवर आहेत. काही हजामांच्या मते आपण त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. शिल्लक असलेल्या) सर्वच हजामांना बिनपाण्याने सफाई करण्याची इच्छा असते.

ज न नी हि ता य (प्रकरण १ ते २५)

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी गुरुवार, 25/08/2011 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
महिलांच्या आरोग्यविषयक समस्या या विषयावर इंग्रजीत विपुल माहिती उपलब्ध आहे. परंतु या विषयी समग्र अशी माहिती मराठीत फारशी उपलब्ध नाही. मराठीत याविषयावर माझ्यासंग्रही असलेल्या लेखांपैकी सुरूवातीची २५ प्रकरणे ही किरण फॉन्ट वापरून टंकलिखीत केली असल्याने त्यातील मजकुर इथे थेट चिकटविता येत नाही. यास्तव पीडी फाईल्स बनवून त्या गुगल डॉक्स मध्ये लोड करून त्यांच्या लिंक्स इथे देत आहे. यापुढची प्रकरणांचे (प्रकरण क्रमांक २६ पासून) लेखन युनिकोड मध्ये करीत असल्याने ती पुढच्या भागात क्रमश: इथे थेट पद्धतीने प्रकाशित केली जातील. सध्या प्रकरण एक ते पंचवीस च्या लिंक्स देत आहेत.

सौंदर्यनगरीतील कलावैभव: शिल्पकला

लेखक चित्रगुप्त यांनी गुरुवार, 25/08/2011 03:31 या दिवशी प्रकाशित केले.
(या धाग्याचे स्वरूप शिल्पकलेविषयी माहितीपूर्ण, तौलनिक, समिक्षात्मक लेखनप्रपंच असे नसून निखळ रसग्रहणात्मक आहे). पॅरिसमध्ये भ्रमण करताना ठायी ठायी सौदर्यदेवता कुठल्या ना कुठल्या स्वरूपात रसिकांना दर्शन देतच असते...

श्री गणेशासाठी कमलाकृती आसन

लेखक मीनल यांनी गुरुवार, 25/08/2011 03:28 या दिवशी प्रकाशित केले.
श्री गणेश चतुर्थी आता आठ-दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. उत्सवाचे वारे कित्येक दिवस आधिच वाहू लागले आहेत. आषाढच्या सरींत आणि श्रावणाच्या शिडकाव्यात चिंब होऊन हिरवीगच्च झालेली सर्व सृष्टी श्री गणेशाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहते आहे. तिथेच पिवळ्या, पांढ-या रानफुलांनी जणू फेर धरला आहे. विविध रंगी तेरडा माती मातीच्या कणातून तरारून आला आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा पिढ्यानपिढ्या जोपासण्यात आलेल्या कोकणातील प्रत्येक देवघरची रंगरंगोटी आता संपली आहे. गणपतीच्या आसनाच्या मागच्या भिंतीवर निसर्गचित्रे, देवांची चित्रे रंगवून झाली आहेत.