Skip to main content

लेख

डुबुक !!

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी बुधवार, 28/08/2019 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
“नानी ये देखोsss!”, “नाना ये देखोsss!”. आमच्या ४ वर्षाच्या नातवाच्या डोळ्यातील चमकदार भाव, अत्यंत आनंदानी उड्या मारत हातातला डायपर आमच्यापुढे नाचवत नाचवत तो उत्साहानी, आनंदानी दाखवत होता आणि आईला कसं शेवटी माझं ऐकावंच लागलं आणि मला ‘ते’ तिला द्यावंच लागलं, अशा विजयी नजरेनी तो अगदी ‘सुखावला’ होता. लगेच त्यानी ‘ते’ घातलं आणि तो ‘ब्रम्हानंद’ घेण्यात रमला. आणि इकडे त्याची आई म्हणजे माझी मुलगी “आई बघं ना गं, त्याला शेवटी डायपर द्यावंच लागलं, आज चौथा दिवस. डायपरशिवाय त्याला 'ते' होत नाहिये आणि त्यामुळे आता तो काही खातपीतपण नाहिये!

इसाई पुयलची थीम

लेखक मायमराठी यांनी बुधवार, 28/08/2019 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
मार्च ९५ ला ' बॉम्बे' प्रदर्शित झाला. कोणत्या तरी एका शनिवारी संध्याकाळी चित्रपट बघून घरी परतलो. उरलेला शनिवार व संपूर्ण रविवार हरवलो होतो. माझा मला सापडतंच नव्हतो. मणीरत्नमचं लेखन व दिग्दर्शन, राजीव मेननचं छायाचित्रण, सगळ्या कलाकारांचा अभिनय आणि 'इसाई पुयल' ( मूळ तामिळ शब्द, अर्थ संगीतातील वादळ) रहमानने तर कोणाकोणाने म्हणून नाही हेलावून सोडले? बॉम्बे थीम बद्दल लिहायला, ती ऐकून काय होतं, होऊ शकतं, हे असं सगळं वर्णन करायला साधे शब्द नाही चालत, मागवायला लागतात, कुठून मागवायचे ते माहीत नाही. पहिल्यांदा ऐकली तेव्हाच सैरभैर व्हायला झाले.

युगांतर - आरंभ अंताचा ! भाग ३८

लेखक मृणालिनी यांनी सोमवार, 26/08/2019 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
"मला हे पटत नाही युवराज!" "का?" "हे एका योद्ध्याचे काम नव्हे." "ते मला माहित नाही. मला इतकंच महत्त्वाचं वाटतं की राजमुगुट त्या पंडुपुत्रांच्या माथी नसला पाहिजे.वारणावतला तुमच्यासाठी महाल बनवलाय म्हणल्यावर बघ कसे सगळे पांडव गेले तिकडे. हावरट कुठले. "युवराज, त्यांनी विश्वास ठेवला तुमच्यावर. तुम्ही दिलेली भेट म्हणून संशय सुद्धा न घेता गेले ते तिथे. आणि राजगादीचाच प्रश्न आहे, तर त्यासाठी त्यांच्या बळी कशासाठी? तुम्ही द्वंद्वयुद्धाचे आव्हान द्या युधिष्ठिराला. तुमच्यावतीने मी त्याला पराजित करून त्याच्याच हस्ते तुमचा राज्याभिषेक करून देईन." "आणि असे कोण करू देईल आपल्याला?

दुपारची झोप..

लेखक आजी यांनी सोमवार, 26/08/2019 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
जगातली सर्वोत्तम सुखे फुकटात मिळतात असं कोणीतरी म्हटलं आहेच. तर फुकट मिळणाऱ्या सुखांपैकी "दुपारची झोप" ही मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या दृष्टीने ती एक जीवनावश्यक गोष्ट आहे. दुपारचे असे मस्त जेवण झालेले असावे. पोट तृप्त असावे. मन अर्धसमाधी अवस्थेत गेलेले असावे. डोळ्यावर हलकेच झोप उतरावी आणि पापण्या अलगद मिटाव्यात. फक्त अर्धा तास!... अर्धा तास ब्रह्मानंदी टाळी लागावी आणि आपण निद्रादेवीच्या अधीन व्हावे.

सावज (भाग २)

लेखक अनाहूत यांनी शनिवार, 24/08/2019 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ : http://misalpav.com/node/45068 तिच्या डोळ्यात धुंद होऊन त्याने त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकले आणि त्यांचा रस तो प्राशन करू लागला . त्याला समजतच नव्हत जास्त धुंदी कशात आहे , तिच्या डोळ्यात कि तिच्या ओठात . तो कितीतरी वेळ त्यांच प्राशन करतच होता . दोघंही एकमेकांना उत्तेजित करत होते . तो नवखा असला तरी त्याच्या स्पर्शाने ती वेडी झाली होती . ते अजूनही foreplay पर्यंतच होते . अजून त्याने खऱ्या विषयाला सुरुवातही नव्हती केली होती . तेव्हढ्यातच तिची हि दशा झाली होती . ती या पूर्वरंगातच इतकी उतावीळ झालेली कि तिला आता खऱ्या सुखाची ओढ लागली होती .

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३७

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 23/08/2019 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
कोणाला साधी कल्पनाही नव्हती की गोकुळातले सारे चैतन्य असे एका क्षणात निघून जाईल. त्या निलवर्णी गिरिधराच्या बासरीचे सुमधुर, भावस्पर्शी सूर हवेच्या लहरींसोबत घुमले नाहीत. कानांना तृप्ती दिली नाही, गोपिकांना वेड लावले नाही आणि त्या स्वरांवर धुंद होऊन नाचणाऱ्या राधेच्या पायातील पैंजणांची मंजुळ छुमछुम सुद्धा कोणाला ऐकू आली नाही. तो दिवस! कंसाच्या सैनिकाने आणलेला निरोप. कृष्णाला बोलावून घेतले हे कळाल्यावर यशोदेचा जीव नुसता घाबराघुबरा झाला होता.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३६

लेखक मृणालिनी यांनी गुरुवार, 22/08/2019 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
कुटीच्या दाराची हालचाल झाली. विदूरने आत प्रवेश केला तसे कृपाचार्य आणि द्रोणाचार्यांचे त्याच्याकडे लक्ष गेले. "प्रणाम, आत येण्याची परवानगी आहे?" "प्रणाम विदुर. आज तुम्ही या द्रोणाचार्याच्या कुटीत?" द्रोणांनी आश्चर्याने विचारले. "मनात प्रश्न होते काही." "तुम्हाला प्रश्न पडलेत, विदुर? खुद्द धर्मात्म्यास?" "मनाला कश्याचे बंधन असते, गुरु द्रोण? एका निमिषात असंख्य प्रश्न पडतात त्याला.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ३५

लेखक मृणालिनी यांनी बुधवार, 21/08/2019 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
भरलेली सभा! मान्यवर आसनस्थ होते. द्रोणाचार्य उठले तेव्हा सर्वांची उत्सुकता शिगेला पोचली होती. स्पर्धा काय असेल, यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. "ही स्पर्धा समजा अथवा गुरु आज्ञा, पण माझ्यासाठी ही गुरुदक्षिणा असेल!" मुठीत धरून सगळे ऐकत होते.... "तुम्हाला पांचाल नरेश द्रुपद राजाला हरवून त्याला बंदी बनवायचे आहे." दुर्योधनच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. 'राजाला हरवायचे आहे? .....आणि हे पांडव स्पर्धा जिंकतील ? हे पाच जण?' त्याला हसू आले. 'ही गुरुदक्षिणा तर आम्हीच देणार तुम्हाला, गुरु द्रोण!

N.H.4 (रहस्यकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी मंगळवार, 20/08/2019 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
रात्र बरीच चढली होती. चंद्राची छोटीशी कोर आकाशात चमकत होती. अंधार दाटून आला होता. रात किड्यांच्या किर्र आवाजाने वातावरण भारून गेल होत. आणि या शांत वातावरणात त्याचा ट्रक वेगाने पुढे जात होता. पुणे राष्ट्रीय महामार्गावरून त्याचे येणे जाणे नित्याचे असल्याने, ट्रक चालविताना तो बेफिकीर होता. त्याच्या चेहर्‍यावरून तो बेफिकीरपणा जाणवत होता. शांत शीळ वाजवीत गाडीचे गोल स्टेअरिंग त्याने पकडले होते. स्टेअरिंग डावी  उजवीकडे वळवताना त्याला मजा वाटत होती. तो मजेत वाहने चुकवित वेगाने मुंबईकडे निघाला होता. अठरा- एकोणीस वर्षाचा त्याचा क्लिनर बाजूच्या सीटवर घोरत पडला होता.

नभ मेघांनी आक्रमिले

लेखक स्वीट टॉकर यांनी मंगळवार, 20/08/2019 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझे बोटीवरचे अनुभव तुमच्याबरोबर शेअर केले. माझी मुलगी पुनव वैमानिक झाल्यामुळे (स्वीट टॉकरीणबाईचा 'पहिली फ्लाइट - जरा हटके! हा लेख तुम्ही वाचला आहेच.) तिचे अनुभव आणि या नव्या विश्वाबद्दल वेगळी माहिती माझं जीवन समृद्ध करत आहे. वेळोवेळी मी तुमच्याबरोबर शेअर करीन. वैमानिकाच्या जॉबला ग्लॅमरचं वलय फक्त 'बाहेरच्यांना' दिसतं. स्वत: वैमानिकाला मात्र त्या आयुष्याचे वेगवेगळे आयाम अनुभवायला मिळतात आणि सोसायला लागतात. जर वैमानिक स्त्री असेल तर जास्तच. त्यात ग्लॅमरला अजिबात स्थान नसतं! प्रत्येकाच्या शरीराला एक ताल असतो.