<strong>आता रायगडावर रहावत नाही.....</strong>
आता रायगडावर रहावत नाही.....
आजच्या या इंग्रजाळलेल्या वातावरणात वाढलेल्या माझ्या तमाम भारतीय बांधवांनो आणि भगिनींनो , स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींचा तुम्हा सर्वांना नमस्कार !
तुमच्या हल्लीच्या इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे , आज ६ जून २००९. म्हणजे आज आमचा राज्याभिषेक ३३६ वर्षांचा झाला - म्हणजेच आज ३३५ वा वर्धापन दिन !पर्यायाने तुमच्या हे ही लक्षात आलं असेलच की , आज ३३५ व्या वर्धापन दिनानिमित्त , आणि आमच्या निर्वाण दिनानंतर ३२९ वर्षांनी पण आमचा आत्मा तुमच्याशी संपर्क साधतोय म्हणजे ही सारी वर्षे आम्ही होरपळतोय !
मिसळपाव