Skip to main content

लेख

धुक्यात हरवलेला तैलबैला

लेखक जातीवंत भटका यांनी सोमवार, 07/03/2011 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
धुक्यात हरवलेला तैलबैला
पावसाळ्यातला एकही विकएन्ड घरी बसायचे नाही असा विडाच उचलला असल्याने येत्या शनिवार-रविवार तैलबैल-घनगड असा बेत आखला होता. कमी जास्त होत होत अखेरीस ९ शिलेदार तयार झाले. आमच्या कुठल्या ट्रेकमधे व्यत्यय आला नाही, असे झाले तर शपथ !! ५ जुलैच्या भारत बंदचा वचपा आमच्या कंपनीने शनिवारी "वर्कींग" ठेऊन काढला होता.

.... उचल ना फोन..

लेखक ५० फक्त यांनी सोमवार, 07/03/2011 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसात जाताना असं होतं, कधी कधी माझा आणि बायकोचा वाद झालेला असतो, आम्ही तसेच ऑफिसला जातो, चेहरा लगेच कार्पोरेट झालेला असतो, पण आत काहीतरी बोलायचं राहिलेलं असतं, काहीतरी ऐकलेलं डोक्याच्या बाहेर निघायला तयार नसतं. टेबलवर फोन वाजत असतो, टॅण टॅ धॅन टॅ . voice call from **** टॅण टॅ धॅन टॅ .. मी फोन उचलत नाही तर सायलेंट करुन ठेवतो, पुन्हा ४-५ मिनिटांनी फोन टॅण टॅ धॅन टॅ . voice call f******* टॅण टॅ धॅन टॅ , आता चिडणारा दुसरा कोणितरी असतो पण डायलॉग तोच -'अरे उचल ना फोन ' . मी तरी ही फोन उचलत नाही.

कृषिविद्यापीठांना अनुदान कशाला हवे?

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 07/03/2011 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
कृषिविद्यापीठांना अनुदान कशाला हवे? जेव्हा जेव्हा शेतीच्या दुर्दशेचा विषय निघतो, तेव्हा तेव्हा ज्या अनेक उपाययोजना सुचविल्या जातात, त्या अनेक उपाययोजनांपैकी कृषी विद्यापीठे आणि त्यांचे संशोधन हा एक हमखास उपाय सुचविला जातो. या सर्व तज्ज्ञांच्या मते कृषी विद्यापीठाने आजवर फार मोठे चमत्कारिक संशोधन केलेले आहे पण ते संशोधन शेतकरीवर्गापर्यंत पोचत नाही किंवा पोचले तरी शेतकरी ’आळशी’ ’अज्ञानी’ वगैरे असल्याने तो ते अंगिकारत नाही म्हणून त्याला शेती परवडत नाही.

हेल्थ फूड्स खरंच हेल्थी असतात?

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 05/03/2011 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली बाजारात सगळीकडे 'हेल्थ फूड्स ' ची धूम आहे. जिथे बघावं तिथे 'कोलेस्टेरोल फ्री' , 'फायबर रिच', 'शुगर फ्री', 'लो कॅल' इ. लेबलं लावून कितीतरी खाण्याचे पदार्थ किंवा संबंधित पदार्थ, दुकानाच्या किंवा मॉल च्या प्रत्येक शेल्फातून आपल्याला खुणावत असतात. ह्यातील बहुतांश प्रोडक्ट एका चमचमीत किंवा एरवी 'unhealthy' समजल्या जाणाऱ्या पदार्थाचा 'देवकृपेन' जणू आपल्याचसाठी बनवलेला आरोग्यपूर्ण अवतार असतो. उ. दा. फ्रायम्स, चीज बॉल, चीझी वेफर, बिस्कीट इ.

वषाट

लेखक मुक्त यांनी शनिवार, 05/03/2011 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
परशा आपल्या शेळ्या घेवुन आज लौकरच आला होता. परश्याने शेळ्या वाडग्यात कोंडल्या. तान्ह्या-पार्‍हाट्या शेळ्या वेगवेगळ्या बांधल्या. वाडग्याचा झोपाटा पध्दतशीर लावुन झपाझप टांगा टाकीत म्हणजे जवळजवळ पळतच तो घराकडे निघाला. कधी घरी जाईन अशी अनावर घाई त्याला झाली होती. त्याला कारणही तसेच घडले होते. आज दुपारी ओढ्याला पाणवठ्यावर हिवर्‍याच्(एक गाव) एक शेळ्यांचं खांड आलं होतं. त्या शेळ्यांचा आणि परशाच्या खांडाचा मेळा झाला होता. त्या गडबडीत हिवर्‍याच्या खांडातलं एक बकरु चुकून परशाच्या खांडात आलं होतं. परशा घरी आला त्यावेळेस तात्या, परशाचा बाप ओट्यावर बिडी फुंकीत बसला होता.

अमेरिका एक विश्वासार्ह मित्रराष्ट्र आहे काय?

लेखक सुधीर काळे यांनी बुधवार, 23/02/2011 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिका एक विश्वासार्ह मित्रराष्ट्र आहे काय? अलीकडील घटना पहाता अमेरिका भारताशी मैत्री करू इच्छिते आहे असे चित्र दिसत आहे. क्लिंटन यांच्या कारकीर्दीत याला सुरुवात झाली होती पण त्यांच्या कारकीर्दीत ’नारळ फोडण्या’पलीकडे फारशी प्रगती झाली नव्हती. धाकल्या बुश यांच्या कारकीर्दीत कांहींसा वेग आला व अणू ऊर्जा करार होण्यात त्याची परिणती झाली.

गुरुदत्तः तीन अंकी शोकांतिका - एक अभिजात मराठी पुस्तक

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 22/02/2011 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गुरुदत्त आवडलेले पुष्कळ लोक भेटतात. व्हॅलेंटाईन दिनाच्या निमित्तानं ‘टाईम’मासिकानं काही दिवसांपूर्वी जी रोमँटिक चित्रपटांची यादी जाहीर केली, तीत ‘प्यासा’चं नाव पाहून अनेक भारतीयांना आनंद झाला. तो आनंद ठीकच होता.