पहिला पाऊस
*पहिला पाऊस*
नेहमीच्या दिमाखात तो अवतरलाच. किती दिवस हुलकावण्या देत होता.
संध्याकाळी आकाशात पसरलेल्या संधिप्रकाशानेच तो येतोय हे कळवलं, हलक्या वा-यांच्या गार झुळूकांनीच हळुच कानात सांगितलं 'तो येतोच आहे लवकरच'.हळुहळू मेघ दाटून आले, वारा सुसाट झाला. आणि..आणि...*तो आला*.
ढगांनी आता जोरात नगारे वाजवायला सुरूवात केली, विजांनीही टाळ्यांचा कडकडाट करत त्याचं स्वागत केलं..आणि भुईवरची माती तर..आनंदाने त्याच्या टपोरल्या थेंबांच्या गंधाने मोहभरीत होऊन..त्याचा गंध चहुकडे उधळीत सुटली, दिसेल त्याला त्या गंधाने वेडं करून टाकलं तिने..
अहाहा! सगळेच त्या मृद् गंधाने वेडावून गेले..धुंद झाले.
मिसळपाव
फोर जी फाईव्ह जी ची संपर्क क्रांती करणारी दुनिया आपल्या देशात अवतरली आणि आपल्या जालीय जीवनातही एक मोठा बदल घेऊन आली. आता स्मार्टफोन झालाय आपला नवीन तळहात आणि जालविश्व् बनलंय आपलं दुसरं घर. फेसबुक, इन्स्टा, टिकटॉक वगैरे आता घरचेच झालेत पण गेली काही वर्ष टिकटॉकर्स, स्टॅन्ड अप कॉमेडीयन्स आणि यू ट्युबर्स च्या जोडीला प्रचंड फोफावलेला एक नवा वर्ग म्हणजे फूड ब्लॉगर्स / Vloggers.
जगभरातील एकूण फूड ब्लॉगर्स सुमारे २२ कोटी आहेत अन त्यातले निम्मे एकट्या भारतात आहेत म्हणे.