Skip to main content

लेख

प्रथम नागरिकाचा दिमाखदार शपथविधी

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 23/07/2022 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
Presidential Buggy नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.

राष्ट्रपतींचे डबे

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 21/07/2022 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
Presidential Saloon भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्यावर डॉ. राजेंद्र प्रसाद सार्वभौम भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले. त्यावेळी राष्ट्रपतींसाठी रेल्वेचा खास डबा असावा असा विचार पुढे आला नव्हता.

वह्या पुस्तके

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 19/07/2022 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
जून महिना चालू झाला की साधारणपणे मध्यमवर्गीयांच्या घरात शालेय वस्तू खरेदी करण्याची लगबग चालू होते. बहूतेक कुटूंबवत्सल पालक पगार झाला की शाळेसाठी लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात निघतात. मान्सूनचा पाऊस जरी चालू असला तरी एखाद्या सुटीच्या दिवशी आपापली मुले, त्यांच्या आया यांची स्कुटरवर निघालेली गर्दी रस्त्यावर पहायला मिळते. आजकाल सरकारी शाळातच सरकारी पुस्तके मिळत असतात. त्यामुळे शालेय सामाना मिळणार्‍या दुकानांत पुस्तकांची विक्री सोडून वह्या व इतर गोष्टी विकायला ठेवतात. नाही म्हटले तरी इंग्रजी शाळांतील मुलांना मात्र पुस्तके दुकानातूनच खरेदी करावी लागतात.

आपण सगळेच अश्वत्थामे

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 14/07/2022 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
लिहीण्याचा उद्देश जे उत्कटतेने वाटते ते लिहावे.चुक,बरोबर,चांगले वाईट हे वाचणाऱ्यांनी ठरवावे. युगांत(इरावती कर्वे),मृत्युंजय, युगंधर आणी आता अश्वत्थामा ही पुस्तके वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने वाटली,ती म्हणजे महाभारतातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या कर्माची फळे भोगून मुक्त झाली. प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर व दुसर्‍यांच्या लेखी चुक होता,अश्वत्थामा सुद्धा. अश्वत्थाम्याचे चिरंजीवीत्वाचे वरदान ऐवढे शापित निघेल हा विचार कदाचित नियतीने सुद्धा केला नसावा. म्हणूनच अश्वत्थाम्या नंतर तीने (नियतीने) कुणालाच हे वरदान दिले नसावे. अश्वत्थामा शेवटचा चिरंजीव. अश्वत्थामा आपल्या कर्माची फळे भोगतोय.

पुस्तक परिचयः एक होता कार्व्हर-- विणा गवाणकर

लेखक सुजित जाधव यांनी मंगळवार, 12/07/2022 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता कार्व्हर ही लेखिका विणा गवाणकर यांची १९८१ साली प्रकाशित झालेली पहिलीच कादंबरी.. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांची ही जीवनगाथा... आपल्या आईवडिलांचे नीट तोंडही पाहू न शकलेल्या कार्व्हर यांची जीवनकहाणी जितकी आपल्याला भावनिक करते तितकीच ती प्रेरणा देऊन जाते. या पुस्तकात लेखिकेने कार्व्हर यांचे हलाखीचे बालपण, त्यांनी जगण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी केलेली धडपड अतिशय सुरेख रित्या शब्दबद्ध केलेली आहे.. अमेरिकेतील मिझुरी राज्यातील 'डायमंड ग्रोव्ह' पाड्यावर मोझेस कार्व्हर नावाचा एक शेतकरी आपली पत्नी सुझन कार्व्हर सोबत रहायचा.

आठवणींच्या जंगलात

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 02/07/2022 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वरंग त्रेचाळीस वर्षापुर्वीची आठवण व अंतरजालावर उपलब्ध आसलेली माहीती एकत्र गुंफून धागा विणायचा प्रयत्न त्यामुळे कुठे कुठे विषयांतर झाले आहे.

मैत्री स्वत:शी- मैत्री सर्वांशी

लेखक मार्गी यांनी रविवार, 26/06/2022 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
✪ मैत्री संस्थेतल्या मित्रांसोबत भेट ✪ मैत्री = सामाजिक कामासाठी काही करणा-या मित्रांचा गट ✪ मैत्रीच्या उत्तराखंड पूराच्या वेळेच्या कामाच्या आठवणी ✪ मैत्री एक इनोव्हेटीव्ह मॉडेल ✪ दोन करामती आजींचं इनोव्हेशन ✪ सामाजिक कार्य म्हणजे त्याग- परिश्रम असंच असलं पाहिजे असं नाही ✪ आपण काय करू शकतो? सर्वांना नमस्कार. पुण्यामध्ये केंद्र असलेल्या "मैत्री" संस्थेच्या कामाला २५ वर्षं पूर्ण झाली. त्या निमित्ताने झालेल्या एका मेळाव्याला जाण्याचा योग आला. मैत्रीमधल्या जुन्या मित्रांना भेटता आलं. मैत्रीचं काम आणखी थोडं समजून घेता आलं.

विंबल्डनचे सेंटर कोर्ट

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 25/06/2022 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
टेनिसविश्वातील सर्वांत मानाची ग्रँड स्लॅम स्पर्धा, विंबल्डन टेनिस स्पर्धा सालाबादप्रमाणे 27 जूनपासून सुरू होत आहे. लंडनजवळील ही विंबल्डननगरी टेनिसपटूंची पंढरी म्हणून ओळखले जाते. म्हणूनच या स्पर्धेत मानाच्या सेंटर कोर्टवर खेळण्याचे आणि अर्थातच विजयी होण्याचे प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्न असते. या सेंटर कोर्टच्या उभारणीला 2022 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणूनच यंदाच्या स्पर्धेच्या निमित्ताने या सेंटर कोर्टविषयी. विंबल्डन सुरू झाल्यावर काही वर्षांमध्येच स्पर्धेचा लौकीक वाढत गेला आणि त्यात सहभागी होणाऱ्या टेनिस स्पर्धकांची संख्याही वाढू लागली.

दिनेश कार्तिकची फिनिक्स भरारी...

लेखक सुजित जाधव यांनी गुरुवार, 23/06/2022 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
फिनिक्स हा काल्पनिक पक्षी असला तरी त्याच्याप्रमाणे राखेतून नवी भरारी घेणारे काही लोक प्रत्यक्षात असतात. दिनेश कार्तिक हा क्रिकेट जगतातील नवा फिनिक्स आहे. १ डिसेंबर २००६… जोहान्सबर्गमध्ये भारत विरुद्व दक्षिण आफ्रिका टी-२० सामना सुरु होता. हा आंतराष्ट्रीय क्रिकेट मधील भारताचा पहिला टी-२० सामना होता. सचिन, सेहवाग, झहीर, आगरकर, हरभजन असे खेळाडू त्या संघात होते. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २० षटकांत १२७ धावांचे लक्ष्य ठेवले. चांगली सुरवात मिळूनही मधल्या षटकांत भारताचा डाव ढासळला. दिनेश मोंगिया आणि दिनेश कार्तिकने चांगली फलंदाजी करून भारताला तो सामना जिंकवून दिला.