असे देश, अशी नावे !
लेखनप्रकार
संपूर्ण जगाचा नकाशा न्याहाळणे हा एक छान विरंगुळा असतो. आज अखेरीस जगभरात एकूण १९६ देश असून याव्यतिरिक्त ‘देशा’चा दर्जा न मिळालेली अनेक बेटे किंवा भूभाग आहेत. (देशांच्या एकूण संख्येबाबत १९५ ते २४९ असे विविध अंक जालावर वाचायला मिळतात; तूर्त तो विषय नाही). नकाशातून जगातले एखादे अपरिचित शहर शोधण्याचा खेळ शालेय जीवनात बऱ्यापैकी खेळला जातो. गेले काही महिने https://worldle.teuteuf.fr/ या संकेतस्थळावर ‘नकाशावरून देश ओळखा’ हा दैनंदिन खेळ सादर केला जातो. तो नियमित खेळत असताना बऱ्याच अपरिचित देशांचा परिचय झाला. त्यातल्या काहींची नावे कुतुहल चाळवणारी निघाली. त्यांचे उच्चारही मजेशीर वाटले. मग स्वस्थ कुठले बसवणार? त्या नावांची व्युत्पत्ती आणि त्या मागचा इतिहास व भूगोल इत्यादी गोष्टी धुंडाळून काढल्या. त्यातून काही रंजक माहिती गवसली. त्याचे संक्षिप्त संकलन करण्यासाठी हा लेख.
देशनामांच्या विविध व्युत्पत्त्यांवर नजर टाकता बऱ्याच गमतीजमती वाचायला मिळतात. या व्युत्पत्त्यांचे अशा प्रकारे वर्गीकरण करता येते :
1. संबंधित ठिकाणच्या प्राचीन जमाती, राज्य किंवा वंशाची नावे
2. भूभागाचा भौगोलिक प्रकार
3. भूगोलातील दिशा
4. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून
5. अनिश्चित/ विवादास्पद व्युत्पत्ती
वरील प्रत्येक वर्गातील काही मोजकी रंजक देश-नावे आता पाहू. उदाहरणे निवडताना शक्यतो मोठ्या देशांऐवजी छोटे, तुलनेने अपरिचित किंवा माध्यमांत विशेष चर्चेत नसलेले देश निवडले आहेत.
१. प्राचीन जमाती / वंशाची नावे
जवळपास एक तृतीयांश देशांची नावे या प्रकारे दिली गेलीत.
क्रोएशिया हा युरोपमधील एक देश. त्याचे नाव एका स्लाविक जमातीवरून ठेवलेले आहे. मुळात हा शब्द इंडो-आर्यन होता. नंतर तो जुन्या पर्शियनमध्ये गेला आणि अखेरीस लॅटिन भाषेत स्थिरावला. या देशात Neanderthals या अतिप्राचीन मानवी पूर्वजांचे जीवाश्म सापडले आहेत.
या गटातील काही देशांची नावे थेट जमातीची नसून त्या जमातींचे गुणवर्णन करणारी देखील आहेत. Burkina Faso असे मजेशीर नाव असलेला हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश. त्याचे जुने नाव Upper Volta हे Volta या नदीवरून ठेवलेले होते. १९८४मध्ये त्याचे नामांतर होऊन नवे नाव लागू झाले. या नावातील दोन शब्द भिन्न भाषांमधले आहेत :
Burkina (Mossi भाषा) म्हणजे प्रामाणिक व सरळमार्गी
Faso (Dioula भाषा) म्हणजे वडिलांचे घर.
थोडक्यात, या देशाच्या नावातून तिथले लोक भ्रष्टाचारविरहित सज्जन आहेत असे अभिप्रेत आहे ! या देशात पूर्वी अनेकदा हिंसात्मक उठाव होऊन सत्तांतरे झालेली आहेत. एक अतिशय अविकसित देश असे त्याचे वर्णन करता येईल.
Guinea हा शब्द नावात असलेले काही देश आहेत. त्यापैकी Papua New Guinea हे एक गमतीदार नाव. यातल्या Papua चा अर्थ (बहुधा) कुरळे केस असलेले, तर Guinea चा अर्थ काळ्या वर्णाचे लोक. हा देश Oceania तील एक बेट आहे. भाषावैविध्य हे या देशाचे वैशिष्ट्य असून तेथे सुमारे ८५१ भाषा प्रचलित आहेत.
२. भौगोलिक प्रकार
जगातील सुमारे एक चतुर्थांश देश या व्युत्पती-प्रकारात मोडतात. बेट, आखात किंवा जमिनीच्या वैशिष्ट्यपूर्ण भूगोलावरून अशा देशांची नावे ठेवली गेलीत.
Sierra Leone हा एक पश्चिम आफ्रिकेतील देश. याचे मूळ नाव पोर्तुगीजांनी ठेवले. त्याचा शब्दशः अर्थ ‘सिंह पर्वतराजी’ असा आहे. परंतु याचा संबंध सिंहांशी अजिबात नाही. तेथील पर्वतराजीतून होणाऱ्या प्रचंड विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेवरून ते नाव दिले गेले आहे. पुढे मूळ नाव इटालिय पद्धतीने बदलून सध्याचे करण्यात आले. हे नाव प्रथम ऐकल्यावर सनी लिओनी या अभिनेत्रीची सहजच आठवण झाली ! 😀
Costa rica हा अमेरिका खंडातील एक छोटा देश. या नावाचा शब्दशः अर्थ किनारपट्टीचा श्रीमंत भाग असा आहे. मूळ नाव (la costa rica) स्पॅनिश भाषेतील असून ते बहुधा नामवंत दर्यावर्दी ख्रिस्तोफर कोलंबस यांनी दिलेले असावे. त्यांच्या समुद्रपर्यटना दरम्यान ते जेव्हा या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांना येथील स्थानिक लोकांनी अंगावर भरपूर सोन्याचे दागिने घातलेले दिसले.
या देशाने नागरिकांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले असून देशाच्या सकल उत्पन्नातील बऱ्यापैकी भाग शिक्षणावर खर्च केला जातो. या खर्चाचे प्रमाण जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे.
3. भूगोलातील दिशा
सुमारे पंचवीस देशांना त्यांच्या पृथ्वीगोलातील दिशेनुसार नाव दिलेले आहे. त्यापैकी नॉर्वे, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तर सर्वपरिचित देश. त्यांची व्युत्पत्ती अशी :
• नॉर्वे = Northern Way = उत्तरभूमी
• जपान (निप्पोन) = उगवता सूर्य (पूर्व)
• ऑस्ट्रेलिया = दक्षिणभूमी
आता Timor-Leste या अपरिचित देशाबद्दल पाहू.
हा देश आग्नेय आशियातील एक बेट आहे. देशाच्या जोड नावातील दोन शब्दांचा अर्थ असा :
Timor(मलय भाषेत) = पूर्व
Leste(पोर्तुगीज) = पूर्व
हा देश जावा व सुमात्राच्या पूर्वेस असल्याने हे नाव दिले गेले.
येथे पूर्वी दीर्घकाळ पोर्तुगीजांची वसाहत होती. त्यानंतर इंडोनेशियाने लष्करी कारवाई करून तो ताब्यात घेतला होता. 2002 मध्ये त्याला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाले. स्वतंत्र अस्तित्व मिळवणारा तो एकविसाव्या शतकातील पहिला देश ठरला. हा अतिशय गरीब देश असून कुपोषणाच्या समस्येने ग्रासलेला आहे.
४. स्थानिक प्रभावशाली व्यक्तीवरून
जगातील सुमारे 25 देश या गटात येतात. त्यापैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतेकांची नावे स्थानिक प्रभावशाली पुरुषावरून दिलेली आहेत.
बोलिविया हा दक्षिण अमेरिका खंडातील देश. तो पूर्वी स्पॅनिश लोकांच्या ताब्यात होता. कालांतराने स्थानिकांचे स्पेनविरुद्ध स्वातंत्र्ययुद्ध झाले. त्यामध्ये व्हेनेझुएलाचे नेते Simón Bolívar यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सन्मानार्थ या नव्या देशाला Bolívar असे नाव दिले गेले. पुढे ते मधुरतेसाठी Bolívia असे बदलण्यात आले. हा बहुवांशिक असलेला विकसनशील देश आहे. तेथील भूमी अनेक खनिजांनी समृद्ध आहे.
मॉरिशस या पूर्व आफ्रिकेतील बेटाच्या नावाची कथा तर खूप रंजक आहे. चालू नाव Maurice या डच राजपुत्रावरून दिलेले आहे. परंतु हा देश बऱ्याच नामांतरांतून गेलेला आहे. सुरुवातीस पोर्तुगीज दर्यावर्दींनी त्याला
Dina Arobi >> Do-Cerne >> Mascarene
अशी नावे दिली होती. त्यानंतर इथे फ्रेंचांची वसाहत झाल्यानंतर त्याचे नाव Isle de France असे झाले. पुढे फ्रेंचांनी शरणागती पत्करून ब्रिटिशांनी यावर कब्जा केला तेव्हा मॉरिशस हे नाव पुन्हा प्रस्थापित झाले.
ओमानमध्ये खूप तांब्याच्या खाणी असल्यामुळे त्याचे जुने नाव मजान असे होते. पुढे ते संस्थापक पुरुषाच्या नावावरून ओमान करण्यात आले. परंतु या संस्थापक नावासाठी खलील, सीबा आणि इब्राहिम असे तीन ‘ओमान’ दावेदार आहेत !
या गटातील दोन देशनावे स्त्रियांवरुन दिलेली आहेत. त्यापैकी ऐतिहासिक खऱ्या स्त्रीवरून दिलेले (बहुधा) एकमेव नाव म्हणजे St. Lucia.
हे एक वेस्टइंडीज मधील बेट आहे. त्याचे नाव Lucia या संत स्त्रीवरून दिले आहे. कॅथोलिक पंथात ज्या आठ गौरवलेल्या स्त्रिया आहेत त्यापैकी ही एक. या भागातून जात असताना फ्रेंच दर्यावर्दींचे जहाज 13 डिसेंबर रोजी बुडाले. हा दिवस ल्युसिया यांचा स्मृतिदिन असल्याने कोलंबसने त्यांचे नाव या बेटाला दिले. हे बेट त्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यामुळे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचा वाटा मोठा आहे.
५. अनिश्चित/ विवादास्पद व्युत्पत्ती
सुमारे २० देशांच्या बाबत अशी परिस्थिती आहे. त्यापैकी दोन उदाहरणे पाहू.
माल्टा हा पर्यटकांचे आकर्षण असलेला युरोपातील एक छोटासा देश (बेट). किंबहुना स्वतंत्र देशाचा दर्जा दिलेले हे एक शहर (city-state) आहे. याच्या दोन व्युत्पती प्रचलित आहेत:
a. ग्रीक भाषेत Malta चा अर्थ मध. या बेटावर एक विशिष्ट प्रकारच्या मधमाशा असून त्यांच्यापासून एक अतिमधुर मध तयार होतो.
b. Maleth या शब्दाचा अर्थ निवारा किंवा बंदर असा आहे.
सरतेशेवटी आपल्या सख्खा शेजारी नेपाळबद्दल. याच्या अनेक व्युत्पत्ती असून भाषातज्ञात त्याबाबत भरपूर मतभिन्नता आहे. ४ प्रकारच्या व्युत्पत्ती प्रचलित आहेत :
a. पशुपती पुराणानुसार ‘ने’ नावाचे मुनी होते (नेमी). त्यांनी संरक्षित केलेला हा प्रदेश आहे.
b. नेपा नावाच्या गुराख्यावरून हे नाव पडले.
c. निपा =पर्वताचा पायथा. आल= आलय= घर. >> पर्वताच्या पायथ्याशी असलेला प्रदेश.
d. तिबेट -बर्माच्या भाषेनुसार:
ने= गाई-गुरे आणि
पा = राखणदार
असे हे व्युत्पत्ती प्रकरण. काही देशांच्या नावांच्या संदर्भात ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध असतात; त्याबाबत दुमत नसते. मात्र जिथे अशी कागदपत्रे उपलब्ध नसतात तिथे भाषा अभ्यासकांना लोककथा किंवा दंतकथांचा आधार घ्यावा लागतो. काही वेळेस मूळ नावांचे अपभ्रंश होत समाजात शेवटी कुठलेतरी भलतेच नाव देखील रूढ होते. अशा तऱ्हेने काही देशांच्या नावाबाबत अधिकृत माहितीखेरीज अनेक पर्यायी व्युत्पत्ती वर्णिलेल्या असतात.
“नावात काय आहे?” हा शेक्सपिअर निर्मित आणि बहुचर्चित लाखमोलाचा प्रश्न. त्याचे उत्तर, “नावात काय नाही?” या प्रश्नाद्वारेच अन्य कोणीतरी देऊन टाकलेले आहे !
प्रत्येक शब्दातून त्याचा इतिहास डोकावत असतो. तो आपल्याला कित्येक शतके मागे घेऊन जातो. विविध देशांच्या नावांवरून आपल्या लक्षात येईल की त्यातील बऱ्याच नावांमधून भूगोल देखील डोकावतोय. देशाचे नाव त्या संस्कृतीचे प्रतीक असते आणि तो राष्ट्रीय अस्मितेचाही भाग असतो. नमुन्यादाखल काही देशनावे या लेखात सादर केली. ही छोटीशी जागतिक शब्दसफर वाचकांना रोचक वाटेल अशी आशा आहे.
…………………………………………………………………………………………………………………………………………….
चित्रे जालावरून साभार !

वाचने
23915
वाचनखूण
प्रतिक्रिया
88
तुमचे चौफेर दांडगे वाचन मिपा
In reply to तुमचे चौफेर दांडगे वाचन मिपा by सुरसंगम
धन्यवाद !
रोचक माहिती
In reply to रोचक माहिती by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद ,
In reply to धन्यवाद , by हेमंतकुमार
पुस्तक चतुष्ट्य
अरे वा! ही माहिती गोळा करता
In reply to अरे वा! ही माहिती गोळा करता by नचिकेत जवखेडकर
धन्यवाद !
ऐकावे ते नवलच
In reply to ऐकावे ते नवलच by कर्नलतपस्वी
वा !

मस्त, रोचक महिती !
In reply to ऐकावे ते नवलच by कर्नलतपस्वी
मद्रास .. ओरेगॉन राज्यात
In reply to ऐकावे ते नवलच by कर्नलतपस्वी
सात लखनौ शहरे ....... मस्त,
नेहमीप्रमाणे मस्त लेख. हा खेळ
माहिती बद्दल धन्यवाद....
सर्वांना धन्यवाद
In reply to सर्वांना धन्यवाद by हेमंतकुमार
त्या सटिंब u ला उमलाऊट किंवा

In reply to त्या सटिंब u ला उमलाऊट किंवा by खेडूत
धन्यवाद ,
In reply to धन्यवाद , by हेमंतकुमार
कळफलक सेट करून आपल्यालाही ते
In reply to कळफलक सेट करून आपल्यालाही ते by खेडूत
+१
छान लेख
माहितीपुर्ण आणि ऱोचक
सर्वांना धन्यवाद !
In reply to सर्वांना धन्यवाद ! by हेमंतकुमार
स्वारगेट वरून सिंगापूरला येष्टी जाते.
In reply to स्वारगेट वरून सिंगापूरला येष्टी जाते. by चामुंडराय
चला,
In reply to सर्वांना धन्यवाद ! by हेमंतकुमार
विक्रम
In reply to विक्रम by चंद्रसूर्यकुमार
वा !
In reply to वा ! by हेमंतकुमार
मस्त
In reply to विक्रम by चंद्रसूर्यकुमार
महाराष्ट्रात अनेक "वडगाव आणि
अझरबैजान
In reply to अझरबैजान by श्रीरंग_जोशी
धन्यवाद ,
महाराष्ट्रात कर्जत नावाचे तीन
In reply to महाराष्ट्रात कर्जत नावाचे तीन by अमरेंद्र बाहुबली
किमान तीन खंडाळीही आहेत
In reply to किमान तीन खंडाळीही आहेत by गामा पैलवान
सातारा जिल्ह्यातील खंडाळा
पारगाव खंडाळा
आहेछान !
In reply to छान ! by हेमंतकुमार
तुम्हाला धाराशीव
नेहमीप्रमाणे उत्तम लेख.
In reply to नेहमीप्रमाणे उत्तम लेख. by गवि
धन्यवाद !
In reply to नेहमीप्रमाणे उत्तम लेख. by गवि
गवि
In reply to गवि by जेम्स वांड
म्हणून
In reply to नेहमीप्रमाणे उत्तम लेख. by गवि
८वा खंड
नेहेमीप्रमाणे रोचक आणि
छान लेख
छान, माहितीपूर्ण लेख व चर्चा
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
गावाची नावे
चुकीची दुरूस्ती
In reply to चुकीची दुरूस्ती by कर्नलतपस्वी

दिग्बोई
In reply to चुकीची दुरूस्ती by कर्नलतपस्वी
नोएडा शहर
कुमार सर
In reply to कुमार सर by जेम्स वांड
जेम्स,
In reply to कुमार सर by जेम्स वांड
MHOW
सुंदार माहिती पुर्ण लेख !
कॉलॉनिअल नावे
छावण्यांचा उल्लेख आलाय
In reply to छावण्यांचा उल्लेख आलाय by गवि
बांधवाडी !
सर्व प्रतिसादकांचे आभार !
In reply to सर्व प्रतिसादकांचे आभार ! by हेमंतकुमार
वडे = वट ?
In reply to वडे = वट ? by गामा पैलवान
गा.पै.
सुंदर लेख
धन्यवाद !
उर्फ फिमेल जेनाईटल
In reply to उर्फ फिमेल जेनाईटल by जेम्स वांड
वाईट प्रथा
चलनाचे पुनर्मूल्यांकन
एक गंमत
परमहंस नित्यानंद ह्या सत्पुरुषाचे "कैलास"
In reply to परमहंस नित्यानंद ह्या सत्पुरुषाचे "कैलास" by चामुंडराय
कैलास हे राष्ट्र अस्तित्त्वात आहे.
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
स्वतंत्र हिंदू देश स्थापनेचे प्रयत्न
आज!!
In reply to आज!! by हेमंतकुमार
सुधारणा...
मोठा उत्सव
युगांडा हा देश आणि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vithala Konta Zenda | Dnyaneshwar Meshram |In reply to युगांडा हा देश आणि by मदनबाण
+१
"उंच विहीर"
In reply to "उंच विहीर" by हेमंतकुमार
बीर तवील नाव रोचक आहे
In reply to बीर तवील नाव रोचक आहे by गामा पैलवान
गा.पै. ,
डुडल २७ जून
राष्ट्रकुल (+२)
वेढलेले...
Rwanada
In reply to Rwanada by हेमंतकुमार
सुधारणा ..
अंटार्टिका उजळला...
नदी/ झरा/ तलाव
फिनलंड "नाटो" त...