Skip to main content

लेख

मिशन काश्मीर - भाग ३ - श्रीनगर

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 16/05/2011 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
http://misalpav.com/node/17957 - मिशन काश्मीर - भाग १ http://misalpav.com/node/17973 - मिशन काश्मीर - भाग २ ************************************************************** काश्मीर आज भारतीयांसाठी सुद्धा एक दंतकथा झाली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात काश्मीर म्हणजे दहशतवाद असे एक समीकरण झाले आहे. पण एकेकाळी ही देवांची भूमी होती. साक्षात शंकराने इथे साधना केल्याचे मानले जाते. कश्यपाच्या या भूमीत हजारो वर्षे हिंदु राजांनी राज्य केले. त्याच्या अनुषंगाने बरीच मंदिरे देखील बांधली गेली.

कसा जपावा मराठी बाणा?

लेखक शंकर पु. देव यांनी शनिवार, 14/05/2011 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र सरकारची मराठीबद्दलची असणारी आस्था किती बेगडी आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. विरोधकांनी मराठीचा मुद्दा उचलून धरुन राजकारण सुरु केले की सत्तेतील राज्यकर्त्यांना मराठीचे प्रेम वाटू लागते. आम्हालाही मराठीबद्दल किती तळमळ आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्यकर्ते करतात. पण कुठे ना कुठे नव्हे, तर प्रत्येक ठिकाणी सरकाअचे हे पुतना मावशीचे प्रेम उघडे पडते व सरकार तोंडघशी पडते. सांस्कृतिक संचनालय हे किती सुसंस्कारीत आहे हे लपून राहिलेले नाही. म्हणूनच पारितोषिकांचे नामांकने जाहिर करताना नेहमीप्रमाणे सरकारी गोंधळ घातला गेला.

तुला काय व्हायला आवडेल?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 12/05/2011 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
"तुला काय व्हायला अवडेल?"हा प्रश्न आपल्याला बालवाडीपासुन अनेकदा विचारला जातो.फक्त जे आपल्याला व्हायला अवडेल,तसं आपण होणं ईतरांना कधिच रुचत नाहि,हे नंतरहुन दिसुन येत.म्हणजे वरपांगि या प्रश्नाचं स्वरुप,हे आपलि आवड जाणवुन घेणारं वाटलं,तरी अंर्तयामि कारभार निराळाचा असतो.कसा?..तर हा संवाद पहा--पात्र क्रमांक-१)बालाक.पात्र क्रमांक-२)पालक... पालाक:- बबन्या,खरं खरं संग हं,तुला काय व्हायला अवडेल?