लेख
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....!
कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....!
मा. कुलगुरू डॉ.व्यंकट मायंदे,
पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला.
स.न.वि.वि
दि. ६ जून २०११ च्या लोकसत्तामध्ये एक बातमी प्रकाशित झाली आहे. कृषी अधिकार्यांच्या तांत्रिक कार्यशाळेत "प्रकल्प आधारित शेती" या विषयावर मार्गदर्शन करताना "शेतकर्यांना फुकट काही देऊ नये, नुसते फुकट जर दिले तर शेतकरी फुकट घेण्यासाठीच बसलेले असतात, अशी शेतकर्यांची प्रवृत्तीच झाली आहे" अशा आशयाचे विधान केल्याचे प्रकाशित झाले आहे.
डॉ. मायंदे साहेब, आपण एका विद्यापीठाच्या कुलगुरुपदी विराजमान आहात आणि कुलगुरू या शब्दाची महतीसुद्धा फार मोठी आहे.
याद्या
4758
मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेनची चित्रशैली (भाग २)
भाग १: मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेनची चित्रशैली: एक धावता परिचय
पूर्वपीठिका: लेख जरा लांबलचक होतो आहे अशी जाणीव लिहिताना झाली होती. त्यामुळे तो शेवटीशेवटी थोडक्यात आटपला होता, हे कबूल करतो. पण शेवटचा भाग त्रोटक करण्यामागे त्याशिवाय अजून एक विचार होता: अखेर चित्रं ही डोळ्यांनी पहायची असतात. त्याविषयीचं विवेचन हे फार फार तर जरा मदत एवढ्यापुरतंच यावं असं मला वाटतं. असो. काही लोकांची तशी इच्छा दिसल्यामुळे थोडं अधिक विवेचन देत आहे.
याद्या
15108
मकबूल फिदा उर्फ एम. एफ. हुसेनची चित्रशैली: एक धावता परिचय
हुसेनच्या मृत्यूची बातमी कळताच अपेक्षेनुसार या संस्थळावर सडक्या प्रतिक्रियांचा एक ओघ येऊन गेला. काहींनी मेल्या माणसाबद्दल हे असं बोलणं कसं रुचिहीन आणि सभ्यतेची पातळी सोडून आहे हे सांगितलं. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी किंवा वृद्ध हुसेनना जो देशत्याग करावा लागला त्याविषयी अनेक उदारमतवादी लोकांनी अनेक ठिकाणी या निमित्तानं पुन्हा एकदा खेद व्यक्त केला. पण मुळात चित्रकार म्हणून हुसेन यांचं कर्तृत्व काय याचा थोडा परिचय करून द्यावा यासाठी हा लेख लिहिला आहे.
त्याआधी थोडी स्वातंत्र्यपूर्व भारतातली कलासंस्कृती पाहणं गरजेचं आहे. इंग्रजांनी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना केली. त्याच साली जे.जे.
याद्या
38800
चिव चिव चिमणी छतांत ...
ऑफिसमधून संध्याकाळी मी घरी आलो. दारावरची बेल वाजवली. दार माझ्या मुलीनं - वल्लरीनं उघडलं. बाहेरच्याच खोलीत ती अभ्यास करंत बसलेली असावी कारण दिवाणावर पुस्तकं, वह्या अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. तिची दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली होती. परीक्षेच्या अभ्यासाची सुट्टी कधीच चालू झालेली होती. मला बघितलं तशी हिरमुसला चेहरा केला.
मी विचारलं " काय झालं ?".
"आजही बाबा एकसुध्दा चिमणी आली नाही."
"त्यात काय झालं. येतील उद्या-परवा. फिडर आणून तीन तर दिवस झालेयत".
बुर्हाणी फौंडेशनने काही हजार बर्ड फिडर्स वाटायचे ठरविले होते.
याद्या
4656
शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून २०११
रायगडावर ६ जून रोजी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा ३३८ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.जबरदस्त पावसात आणि धुक्यात सोमवारी पहाटे मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली.
मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर कुलदेवतेला स्मरून शिवरायांच्या सुवर्णमूर्तीवर श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते राज्याभिषेक संपन्न झाला.यावेळी महाराजांच्या जयजयकाराने सारा आसमंत दणाणून गेला होता.
पोवाडे, ललकारी,तुतारी च्या आवाजाने वातावरण भारुन गेलं होतं.
यावेळी नितीन देसाई यांनी पुढील वर्षी सोहळा आणखी दिमाखदार आणि भव्य होणार असल्याचा सांगितलं....तसंच रायगड,राजगड आणि सिंधुदुर्ग
याद्या
9948
हत्या करायला शीक
हत्या करायला शीक
विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे महात्मा जोतीबा फुले म्हणायचे. शेतकर्यांची मुलं शाळा-कॉलेजात शिकायला गेली की शिकून-सवरून शहाणी होतील आणि मग शिकून-सवरून शहाणी झालेली शेतकर्यांची मुले आपल्या घरातल्या, गावातल्या म्हणजे पर्यायाने शेतकरी समाजातल्या दारिद्र्याचा समूळ नायनाट करतील, असे महात्मा जोतीबा फ़ुलेंना वाटायचे.
याद्या
3782
मिसळपाव