Skip to main content

लेख

चिव चिव चिमणी छतांत ...

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 10/06/2011 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसमधून संध्याकाळी मी घरी आलो. दारावरची बेल वाजवली. दार माझ्या मुलीनं - वल्लरीनं उघडलं. बाहेरच्याच खोलीत ती अभ्यास करंत बसलेली असावी कारण दिवाणावर पुस्तकं, वह्या अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. तिची दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली होती. परीक्षेच्या अभ्यासाची सुट्टी कधीच चालू झालेली होती. मला बघितलं तशी हिरमुसला चेहरा केला. मी विचारलं " काय झालं ?". "आजही बाबा एकसुध्दा चिमणी आली नाही." "त्यात काय झालं. येतील उद्या-परवा. फिडर आणून तीन तर दिवस झालेयत". बुर्‍हाणी फौंडेशनने काही हजार बर्ड फिडर्स वाटायचे ठरविले होते.

शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून २०११

लेखक मालोजीराव यांनी शुक्रवार, 10/06/2011 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
रायगडावर ६ जून रोजी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा ३३८ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.जबरदस्त पावसात आणि धुक्यात सोमवारी पहाटे मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली. मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर कुलदेवतेला स्मरून शिवरायांच्या सुवर्णमूर्तीवर श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते राज्याभिषेक संपन्न झाला.यावेळी महाराजांच्या जयजयकाराने सारा आसमंत दणाणून गेला होता. पोवाडे, ललकारी,तुतारी च्या आवाजाने वातावरण भारुन गेलं होतं. यावेळी नितीन देसाई यांनी पुढील वर्षी सोहळा आणखी दिमाखदार आणि भव्य होणार असल्याचा सांगितलं....तसंच रायगड,राजगड आणि सिंधुदुर्ग

हत्या करायला शीक

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 29/05/2011 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
हत्या करायला शीक विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे महात्मा जोतीबा फुले म्हणायचे. शेतकर्‍यांची मुलं शाळा-कॉलेजात शिकायला गेली की शिकून-सवरून शहाणी होतील आणि मग शिकून-सवरून शहाणी झालेली शेतकर्‍यांची मुले आपल्या घरातल्या, गावातल्या म्हणजे पर्यायाने शेतकरी समाजातल्या दारिद्र्याचा समूळ नायनाट करतील, असे महात्मा जोतीबा फ़ुलेंना वाटायचे.

(फळं) खा, पिऊ नका!

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 21/05/2011 04:02 या दिवशी प्रकाशित केले.
'माझा रोजचा फिक्स ब्रेकफास्ट असतो- एका अंड्याचे ऑम्लेट, दोन टोस्ट आणि एक ग्लास ऑरेंज ज्यूस.' 'दुपारी आम्ही ऑफिसची सर्व मंडळी चालायला जातो, टी टाईमला , तेव्हा सगळे चहा पितात पण मी मात्र ज्यूस सेंटर चे फ्रेश ज्यूस पिते. ' ' रोज संध्याकाळी मी माझ्या रिटायर्ड मित्रांसोबत जॉगर्स पार्क ला जातो, तिथून परत येताना मी फ्रूट आणि भाज्यांचे मिक्स हर्बल ज्यूस पितो, वरून साखर न घालता बरं का!' आहेत न ह्या सगळ्यांच्या एकदम हेल्दी हॅबिट्स? मला विचाराल तर, नाही. ह्या पैकी कुणाचीच सवय खरंच आरोग्यदायक नाहीये. हं, हेल्दी मानसिकता नक्की आहे.

शास्त्रीय नृत्याकडून ..... व्यायामाकडे

लेखक मृगनयनी यांनी शनिवार, 21/05/2011 02:57 या दिवशी प्रकाशित केले.
"शास्त्रीय नृत्याकडून व्यायामाकडे " ...... सामना'तील लिन्क इथे - शास्त्रीय नृत्य - एक व्यायाम : आपण सुन्दर, प्रमाणबद्ध असावं आणि दिसावं अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. आणि त्यासाठी काहीही करायची तिची तयारी असते. सुन्दर दिसण्यासाठी कॉस्मेटिक्स, आयुर्वेदिक औषधं, मेक-अप.. वगैरे पर्याय असतात. पण प्रमाणबद्ध शरीरयष्टीसाठी आणि आपले आरोग्य टिकवण्यासाठी मात्र व्यायामाशिवाय पर्याय नसतो. त्यासाठी लेडीज-जिम, स्लिमिन्ग सेन्टर्स, एरोबिक्स-क्लासेस जॉईन करण्याकडे बहुतेक जणींचा ओढा असतो.