Skip to main content

लेख

मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी...

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 23/07/2011 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक चित्रकार... .... अमुक एका ठिकाणी पोचायचे म्हणून नव्हे, तर निव्वळ आवड म्हणून माळरानावर, राना-वनात भटकंती करणारा, जे आवडेल, ते चित्रात, शब्दात मांडणारा एक प्रवासी.... माझं जीवन हे सुध्धा अशीच एक निरुद्देश भ्रमंती... यात जे जे काही बघता-करता आलं, ज्यात मी काही काळ का होईना, रमून गेलो, त्याचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न ... चांदोबा, मेणबत्ती आणि निसर्ग .... इंदूर मध्ये ३० सप्टेंबर १९५१ रोजी जन्मलो. जन्मापासून सव्वीसाव्या वर्षापर्यंत माळव्यात, इंदुरात वाढलो, पण मध्यंतरी सातवी ते नववी महाराष्ट्रात सांगली जवळच्या माधवनगरात होतो.

सामराजगड आणि रेवदंडा.

लेखक हेम यांनी बुधवार, 20/07/2011 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १- कांसा बेटावरील पद्मदुर्ग..= http://www.misalpav.com/node/18354 पद्मदुर्ग आटोपून ११ च्या सुमारास राजपुरीतून निघालो. आता लक्ष्य सामराजगड होते. सामराजगड हा छोटासा दुर्ग मुरुड आणि राजपुरी यांच्यामध्ये असलेल्या एकदरा गांवाजवळ आहे. एकदरा गांवातले लोक किल्ला म्हटल्यावर नीट माहिती देईनात. एकदरा गांवातल्या शिव मंदिराजवळ गेल्यावर मुरुड समुद्रकिनार्‍याचा सुंदर देखावा दिसतो.

पंढरीची वारी: मूल्य शिक्षण व व्यवस्थापन अभ्यासाचे अद्वितीय माध्यम.डा. संजय होनकळसे

लेखक dr sanjay honkalse यांनी मंगळवार, 19/07/2011 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
पंढरीची वारी: मूल्य शिक्षण व व्यवस्थापन अभ्यासाचे अद्वितीय माध्यम.डा. संजय होनकळसे :M.A.,M.Phil.,M.D.,M.Com.,LL.B. भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे .भारतात संस्कृतीची गुंफण समाज व धर्म यांच्याशी सांगड घालून शास्त्रोक्त पद्धतीने सण, उत्सव, व्रत वैकल्ये, तीर्थाटन साजरी होतात व याला पारंपारिकता आहे. एवढी विविधता व परंपरा इतर कुठल्याही देशात व धर्मात आणि ती ही शास्त्रोक्त बैठकीवर आधारलेली आढळत नाही. तीर्थाटन, शिक्षण व निरीक्षण हे भारतात परंपरेने तीन महागुरू म्हणून संबोधले जातात. तीर्थे ही ऊर्जास्त्रोत मानली जातात. भारतातीय इतिहास व संतही याचे समर्थनच करतात.

ब्राऊ-२

लेखक गवि यांनी मंगळवार, 19/07/2011 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
3

वाट पाहीन पण.......

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 19/07/2011 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
मध्ये एकदा प्रवासात बर्‍याच दिवसांनी "वाट बघेन पण एसटीनेच जाइन" ही पाटी बघितली आणि तोंडभर हसू तरळले. त्यात अभिमान होता, 'एस टी ने प्रवास? हे काहितरी काय !' ही कुचेष्टा होती की नॉस्टेल्जिया होता हे माझे मलाच झेपले नाही. कदाचित सगळेच थोडे थोडे असेल. पण एस टी म्हटल्याबरोबर बर्‍याच आठवणी ग्रामोफोनवर झरझर फिरणार्‍या तबकडीसारख्या सुळकन डोळ्यासमोरुन तरळुन गेल्या. लहानपणी एस टी म्हटल्यावर फक्त लाल डबा समोर उभा रहायचा. इतर कुठलीही बस म्हणजे एशियाड असायची. त्या काळात पुण्यासारख्या मोठ्या शहरात रहायचो नाही त्यामुळे पी एम टी नामक बागुलबुवा बद्दल माहिती नव्हती झालेली.

भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा

लेखक गंगाधर मुटे यांनी बुधवार, 13/07/2011 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा
              बालपणीच्या अशा फारच कमी आठवणी असतात की ज्या माणसाच्या आयुष्यभर सावलीसारख्या सोबत-सोबत चालतात. जीवनाने कितीही रंग बदललेत, आचार-विचारांच्या संरचनेत कितीही बदल झालेत तरीही त्या आठवणी मात्र वास्तवाचे कायम स्मरण करून देत असतात.

गोप्या घाटातून शिवथर घळीत !!!

लेखक जातीवंत भटका यांनी सोमवार, 11/07/2011 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
गोप्या घाटातून शिवथर घळीत !!!
गोप्या घाटाच्या माथ्यावर
यंदाच्या पावसाळ्यातल्या पहिल्या मोठ्या ट्रेकची आखणी झाली. नेहमीचेच लोकप्रसिध्द किल्ले फाट्यावर मारून सह्याद्रीतल्या थोड्या अनगड वाटांवर उंडारायचं अशी खुणगाठ मनाशी आधीच बांधली होती.