Skip to main content

लेख

प्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 25/08/2011 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
प्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३
              समाज जसजसा पुढे जातो तसतशी नैतिकता आणि भ्रष्टाचाराची परिमाणे बदलत जाणे अपरिहार्य असते. कालची अनैतिकता ही आजची नैतिकता व कालचा असंस्कृतपणा हा आजचा संस्कृतपणा ठरत असतो. आजीबाईला नातीच्या ड्रेसमध्ये असंस्कृतपणा दिसणे किंवा देवाला दिलेले दान यात लाचलुचपतखोरी न आढळणे, ही मानसिकता याच वाहत्या काळाच्या वाहत्या बदलातून आलेली असते.

ज न नी हि ता य (प्रकरण १ ते २५)

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी गुरुवार, 25/08/2011 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
महिलांच्या आरोग्यविषयक समस्या या विषयावर इंग्रजीत विपुल माहिती उपलब्ध आहे. परंतु या विषयी समग्र अशी माहिती मराठीत फारशी उपलब्ध नाही. मराठीत याविषयावर माझ्यासंग्रही असलेल्या लेखांपैकी सुरूवातीची २५ प्रकरणे ही किरण फॉन्ट वापरून टंकलिखीत केली असल्याने त्यातील मजकुर इथे थेट चिकटविता येत नाही. यास्तव पीडी फाईल्स बनवून त्या गुगल डॉक्स मध्ये लोड करून त्यांच्या लिंक्स इथे देत आहे. यापुढची प्रकरणांचे (प्रकरण क्रमांक २६ पासून) लेखन युनिकोड मध्ये करीत असल्याने ती पुढच्या भागात क्रमश: इथे थेट पद्धतीने प्रकाशित केली जातील. सध्या प्रकरण एक ते पंचवीस च्या लिंक्स देत आहेत.

मैत्र !

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 24/08/2011 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
एक जवळचा मित्र ! आपल्या आयुष्यातील कितीतरी, म्हणजे कितीतरी तास आपण या लाकडाच्या अडीच फूट बाय ३/४ फूट तुकड्यावर घालवतो. टेबलाशी निगडीत अनेक चांगल्या वाइट आठवणींचा आपल्या डोक्यातल्या हार्डडिस्कवर एक वेगळा ड्राईव्ह केला तरी चालेल एवढ्या आठवणी सहज असतात. कामाचा पहिला दिवस, मधल्यावेळेचा डबा, मित्रांचे कोंडाळे, साहेबाची बोलणी, पडलेला चेहरा, बढती, बढतीची मेजवानी....शेवटचा दिवस.... अशा अनेक आठवणी आपण या टेबलाशी बोलू शकतो. अशा अनेक टेबलांनी आपल्या आयुष्यात आपल्या मित्रांप्रमाणे आपली सोबत केलेली असते. जरा आठवून पहा आणि तुम्हाला आढळेल किती महत्वाचा आणि जवळचा मित्र होता हा !

सातवाहन आणि नाणेघाटातील शिलालेख. आता पूर्ण येथेच केला आहे.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 19/08/2011 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
नाणेघाटातला शिलालेख – आपल्यापैकी अनेकजण नाणे घाटात मुक्काम टाकतात. दरीतून वरती येणारे ढग कवेत घेतात, शूद्ध हवा छातीत भरून घेतात आणि त्या गुहेतल्या पवित्र आणि गुढ अशा वातावरणात निस्तब्ध होतात. त्या गुहेच्या दारात उभे राहून मग आपण खालून रस्त्याने येणार्‍या व्यापारांचा काफिला नजरे समोर आणू लागतो. दमलेले, तहानलेले ते जीव हळू हळू वर येत असतात आणि वर आल्यावर विश्रांतीसाठी आपली पथारी सोडतात, जेवणाचे डबे उघडतात आणि थंड पाणी पिऊन तृप्त होतात. सुखदु:खाच्या दोन गोष्टी बोलून पुढच्या मार्गाक्रमणाबद्द्ल चर्चा करतात.

हॅलो.....हॅलो.....

लेखक गजा गाजरे यांनी शुक्रवार, 19/08/2011 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो..आबा , अव किती येळ लावलाय फोन उचलायला" "अरॅ दादा होय , अर बार लावला व्ह्ता. तू आमच लेका सगळच बंद करुन टाकलस. मंग असं गुमान खाव लाग्तया" "आवो पन कुठ अहात तुम्ही ? " "काय लेका एका माग एक लचांड माग लाव्ता तुमी..पार डोक्याची मंडई झाली . म्हून येऊन बसलोय हिकड म्हाबळेश्वरला आपल्या फार्म हाउस वर" "काय आबा तुमी बी..एव्हढ मनाला लाउन घेताय.