लेख
--------अन----लग्न----------
भावाचं लग्न झालेलं आहे.
-त्याला एक मुलगी आहे.
माझं लग्न झालेलं नाही.
गावाकडे आमची अडाणी काकू राहते. ती म्हणते. तुझ्या (म्हणजे माझ्या) आयुष्याला काहीही अर्थ नाही.
(मी म्हणतो कोणाच्याही आयुष्याला काय अर्थ असतो?)
म्हणजे मी शिकलो, engg झालो. परदेशात वगैरे तरी जाऊन आलो. अन आता चांगला (म्हणजे अजिबात काम नसलेल्या आरामदायी कंपनीत) जॉब करतो- तरी माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही असं तिचं ठाम मत. कारण असं की- माझं लग्न होत नाहीये. म्हणजे मला साधं मुलगीही पसंत पडत नाहीये.
या पाच गोष्टी कायम कराव्यात
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल.
2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील.
3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील.
4.
बाळूकाकांचं गाई-वासरातलं वास्तव्य.
“पहाटे खळ्यात पडलेला पौर्णिमेच्या मावळत्या चंद्राचा लख्ख प्रकाश पाहून माझा थकवा पार निघून गेला.”
आज बर्याच दिवसानी मी माझ्या आजोळी गेलो होतो.आता आमच्या वयाचे लोक बरेच कमी झालेले दिसत होते.सहजच हिंडत मी आमच्या शेजार्यांकडे गेलो होतो.त्यांच्या कडून कळलं की,बाळूकाका,आमचे दुसरे शेजारी, अजून हयात आहेत.ते हल्ली जास्त हिंडत फिरत नाहीत.त्यांच्या घरी गेल्यावर ते मला खचित भेटतील असं समजून मी त्यांच्या घरी गेलो होतो.कुतूहल म्हणून मी बाळूकाकाना भेटायला गेलो.
सकाळ - त्यांच्या नजरेतुन
(थोडा वेगळा प्रयोग करायचा प्रयत्न करतोय, गोड मानुन घ्या. चु.भु.द्या.घ्या)
ललित-
सकाळची कोवळी किरणे हळुचकन अंगाला चिटकली.
नयनरम्य स्वप्नांचे बाण इंद्रधनुष्य ऊधळत गेले.
किलकिल्या डोळ्यांना खिडकीबाहेरची हिरवाई खुणावत होती.
ऊफाळत्या चहाचा कप घेऊन सौभाग्यवती बाजुलाच ऊभी होती.
टक्क जागा झालो.
ग्राम्य-
रामाधरमाच्या पाऱ्याला आंग घाम्याजलं हुतं.
उनाचं कवुडसं डोळ्यावर आलं.
मक्याची कणसं छटायला खळ्यावर जावं लागणार.
कण्याचा धड़ा
-----------------कण्याचा धड़ा---------------
"26 वर्षाचा अनुभव आहे. तू पास झालास तर राजीनामा देईन. सायन्स हे तुमच्यासारख्यांचं काम नाही. कुठं आर्ट-बीट ला जाऊन BA करून शेवटी गावातच पडून रहायचं तर डॉक्टर-इंजीनिअरची स्वप्ने बघत हिथं सायन्सच्या वर्गात बसायला, दुसरयांची जागा आडवायला आलायत. 'थोड़ी शिल्लक असेलच' तर आई बापाला फसवायचं बंद करा अन आर्ट ला एडमिशन घेऊन तिकडं बसा."
सर वर्गात असं 'इन जनरल' म्हणायचे. नाव न घेता. कित्येक वेळा.
पण मुलांना, मला व सरांना- तिघांनाही माहीत असायचं की हा बाण नेमका कोणाच्या दिशेने सुटलेला आहे.
12वीत गॅप घेतलेला.
"येडाय का तु?"
कुटीबाहेर रविकिरणांची तांबुस सकाळ पसरली.
हरीतालिकेचा गाभारा रामप्रहरी दणाणला.
तपोवनातल्या वैराग्याचा निद्राभंग झाला.
कुटीबाहेर येऊन सुर्यस्नान करत तो उकिडवा बसला.
कुळस्वामीनी कोवळ्या ऊन्हात आन्हिकं उरकत होत्या. गायींच्या गळ्यातल्या घंटा मंद किणकिणत होत्या. कळप घेऊन बालगोपाळ अरण्यात निघाले. कान्हा पण आला असेल त्यांच्यात, मंत्रमुग्ध बासुरी घेऊन. यशोदेला चुकवुन.
पाणवठ्यावर गौळणींची लगबग चालली होती. गोपिका खिदळत बाजाराला निघाल्या होत्या.
सच्चे वरण
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही.
अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.
वाघ-या
(ही पूर्णत: काल्पनिक कथा असून या कथेचा अन्यत्र कुठेही कसल्याही प्रकारचा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही नम्र विनंती)
"कुठला र तू?" दरेकर साहेबाने जेवता जेवता पाण्याचा ग्लास तोंडापाशी धरला आणि इतका वेळ दाराबाहेर हात मागे बांधून उन्हात उभा असलेल्या ठाकराच्या पोराला विचारले.
दुपार तीन-साडेतीनची वेळ होती. दरेकर साहेबांची ब-याच दिवसांनी या पांबरे-माड धरणक्षेत्राला व्हिजीट पडली होती. इकडे येताना मुख्य राज्य महामार्ग सोडल्यानंतर रस्त्याने त्यांना गाडीत एका जागी स्वस्थ बसू दिले नव्हते.
नवस - लघुकथा
होडी तशी बारीकचं होती.
नदीसारखीच.
पलिकडं, देवळावर, भगवा झेंडा वाऱ्यावर डौलत होता.
हातात मटणाचा प्रसाद होता.
आभाळात घारी सावज शोधण्यात भटकत होत्या.
बारकी पोरं त्यांचाकडं बघण्यातच दंग होती.
ईवलूशी होडी पण वस्ताद कस लावुन वल्हत होता.
संथ संथ होडी काठाला लागली.
देवळात भक्तगणांची गर्दी होती.
मऊशार वाळुतनं वाट काढत नाना देवळात शिरला.
मंदाक्कापण सोबतीला होती.
आज नानानं बोकड कापलं होतं.
म्हसोबाला. कुणी त्याला खंडोबा पण म्हणायचं.
आख्खी वाडी आली होती.
दुरदूरची नातीगोतीही जमलेली.
दिगंबर सोडून.
पोरीचं लगीन जमाव म्हणुन मंदाक्कानं नवस केलता.
मिसळपाव