Cold Blooded - ७
सकाळी साडेआठ वाजता वाजता रोहितने आपलं हॉटेल चेक-आऊट केलं आणि एअरपोर्टला जाण्यासाठी टॅक्सी पकडली. तासाभराने तो एअरपोर्टवर जवळपास पोहोचला असताना त्याच्या मोबाईलवर कदमांचा फोन आला.
"गुड मॉर्निंग! बोला कदम....."
"सर....."
"आर यू शुअर कदम? तुमची पूर्ण खात्री आहे?"
"येस सर ....."
कदमांच्या शब्दाशब्दाला त्याच्या चेहर्यावरचे भाव बदलत होते. गेले दहा - बारा दिवस दिल्ली, सिमला, मंडी, कलकत्ता अशी सुरु असलेली अथक धावपळ आणि इन्क्वायरी आणि त्यातून पुढे आलेली माहिती याची नव्याने सांगड घालणं आता क्रमप्राप्तं होतं! डॉ. भरुचांवर त्याचा पूर्ण विश्वास होता.
मिसळपाव