Skip to main content

लेख

माझं पहिलं ई - पुस्तक

लेखक नूतन यांनी सोमवार, 19/11/2018 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, माझं पहिलं ई-पुस्तक 'अरण्यबंध'काल बुकगंगा.कॉम वर प्रकाशित झालं. हे पुस्तक म्हणजे प्रसिद्ध बंगाली पुस्तक "आरण्यक"( लेखक श्री बिभूतीभूषण बंदोपाध्याय) चा मराठी अनुवाद आहे. पुस्तकाविषयी थोडक्यात : कोलकात्यासारख्या महानगरात वाढलेला सत्यचरण एका जमिनदाराच्या मालकीच्या जंगल महालाचा इस्टेट मॅनेजर म्हणून रुजू होतो. पण त्या निर्जन अरण्यात आल्यानंतर आल्यापावली परत जाण्याचा विचार ते त्या अरण्याच्या प्रेमात पडणं, या परिवर्तनाचा आलेखं मांडणारं हे पुस्तक..... या सोबत ओघाने येणारी निसर्गवर्णनं, भेटलेली माणसं...

घालमेल

लेखक लौंगी मिरची यांनी सोमवार, 19/11/2018 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
“कबूल का करत नाहीस ? एकदाचं मान्य करुन मोकळी हो . रोजचं तीळ तीळ मरणं . त्यापेक्षा, एकदाच हो, आहे माझं तुझ्यावर प्रेम, तुझ्याशिवाय़ काहीच सुचत नाही, म्हण आणि मोकळी हो .” तो आज फार बोलत होता, माझी घुसमट पाहवत नव्हती त्याला. पण, मी एकटी ने मान्य करुन काय होणार होतं? जो मला हे मान्य करायला सांगतोय तो मात्र कुणा दुसरीतच अडकलाय आणि हो प्रामाणिकपणे हे पहिल्याच भेटीत सांगितलं. मग तरीही मी त्याच्यात का अडकली असेन? गुंतणं आपल्या हातात नसतं, हेच खरं. “मला समजून का घेत नाहीस? प्रेमाच्या भावना बदलता येत नसतात..

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ७

लेखक कलम यांनी शनिवार, 17/11/2018 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
"तुम्हीच मिसेस शांभवी सरपोतदार ना?" इन्स्पेक्टर पाटील ह्यांचा आवाज शांभवीच्या अवाढव्य बंगल्यात घुमला. "अं...हो मीच शांभवी सरपोतदार." शांभवीनं अत्यंत खालच्या आवाजात उत्तर दिलं. 'अमितचा खून झालाय' हे अथर्वनं बोललेलं वाक्य अजूनही तिच्या डोक्यात फिरत होतं. कशीबशी सावरून जणू काही आपल्याला काही झालंच नाहोये हे अथर्वला भासवत ती जरी खाली हॉल मध्ये पोहोचलेली असली तरी तिचं हृदय एवढ्या जोरात धडधडत होतं कि आता ते फुटून बाहेर पडतंय की काय असं तिला वाटत होतं. "काय झालं मिसेस शांभवी सरपोतदार? म्ही फारच बिथरलेल्या दिसताय." इन्स्पेक्टर पाटील एक डोळा बारीक करत म्हणाले. "नाही, असं काही नाही.

शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला?

लेखक shantanu Paranjpe यांनी शुक्रवार, 16/11/2018 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
Shivaji Maharaj रायगडाने अनेक सुखद आणि दुखद क्षण अनुभवले. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे आकस्मिक निधन! १६७४ ला राज्याभिषेक झाल्यानंतर कुणाला वाटले पण नसेल की अवघ्या ६ वर्षात हा महान राजा हे जग सोडून जाईल म्हणून पण नियतीचा फेरा कुणास चुकतो का! ३ एप्रिल १६८०, चैत्र पौर्णिमा,शालिवाहन नृप शके १६०२ या दिवशी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारा माझा राजा निधन पावला!

गावातला आड

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/11/2018 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे पूर्वी गावात आड असत. घरोघरी नसले तरी प्रत्येक पंधरा वीस घरांमागे एक आड असायचाच. घराच्या मागच्या दारी आड खोदला जायचा. जमिनीत चाळीस पन्नास हात खोल जाताच आडाला पाणी लागायचं. आडाची रूंदी चार बाय चार हात अथवा तीन बाय तीन हात असायची. या रूंदीला कडं म्हटलं जायचं. ‘आडनं कितीनं कडं घिदं?’ उत्तर यायचं ‘चार हात’. ‘हेरनं (विहिरीचं) कितीनं कडं घीदं?’ उत्तर यायचं ‘बारानं कडं’. (म्हणजे बारा बाय बारा हात). आड धसू नये म्हणून तो बांधून घेतला जायचा. दगड आणि चुना यात तो खालून वरपर्यंत गोल आकाराने बांधावा लागायचा. आडाच्या वर लाकडी रहाट बसवलं जायचं.

Cold Blooded - १० (अंतिम)

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 15/11/2018 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
रोशनी, जवाहर आणि अखिलेश या तिघांचीही हत्या करण्यासाठी बॅट्रॅकटॉक्सिन वापरण्यात आलं आहे हे ऐकून चारु नखशिखांत हादरली होती. रोहित बँगलोरला डॉ. मालशेंच्या लॅबमध्ये आलेला असतानाची सारी चर्चा क्षणांत तिच्या नजरेसमोर फिरुन गेली! "मिसेस द्विवेदी, तुम्ही डॉ. मालशेंच्या लॅबमध्ये असिस्टंट म्हणून काम करता, राईट?" "येस!" चारु स्वत:ला सावरत उत्तरली. "तुम्ही आणि शेखर अमेरीकेहून परत येताना कोलंबियात थांबून बॅट्रॅकटॉक्सिन घेवून मुंबईला आलात, करेक्ट?" "येस! मी व्हेकेशनसाठी स्टेट्सला जाणार आहे हे कळल्यावर परत येताना बॅट्रॅकटॉक्सिनचा स्टॉक आणण्याची डॉ. मालशेंनी सूचना केली होती.

अच्छे चाचा कच्चे चाचा

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 14/11/2018 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
"स्वातंत्र्य दिल्यावर तथाकथित भारतीय नेते थोडयाच कालावधीत भारताची वाट लावतील.भारतीय लोकांकडे राज्य करण्याची क्षमताच नाहीय, ते फक्त गुलामच राहू शकतात.... " तत्सम इंग्रजी वल्गनांच्या गदारोळात भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दिवसात स्वतंत्र भारतचे सक्षम नेतृत्व करू शकेल असा नेता जवाहरलाल नेहरू यांच्या इतका कुणी होता असे मला तरी आजही वाटत नाही. तत्कालीन परिस्थिती मध्ये नेहरू हे सर्वात अधिक योग्य नेतृत्व होते. आज रुजलेल्या आणि प्रगल्भ होऊ घातलेल्या लोकशाही व्यवस्थेतल्या दिवसात त्यांच्या नेतृत्वाचे अनेक अंगानी विश्लेषण होईल वा होते आहे.

Cold Blooded - ९

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 12/11/2018 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
रोहित अतिशय शांतपणे आपल्या आयपॅडवर काहीतरी वाचत होता. कोलंबियातून बॅट्रॅकटॉक्सिन आणणार्‍या डॉ. मालशेंच्या असिस्टंटची सखोल चौकशी केल्यावर त्याने थेट एअरपोर्ट गाठला होता आणि मिळालेली पहिली फ्लाईट पकडून रात्री अकराच्या सुमाराला तो मुंबईत उतरला होता. फ्लाईटच्या प्रतिक्षेत असताना त्याने डॉ. रेड्डींना फोन करुन डीएनए टेस्टच्या रिपोर्ट्सची चौकशी केली तेव्हा अद्यापही काही टेस्ट्स बाकी असून दुसर्‍या दिवशी सकाळी किंवा जास्तीत जास्तं दुपारपर्यंत त्याला रिपोर्ट इमेल करण्याचं डॉ. रेड्डींनी कबूल केलं होतं. संपूर्ण प्रवासामध्ये आतापर्यंतच्या तपासात पुढे आलेल्या माहितीची तो डॉ.

Cold Blooded - ८

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 10/11/2018 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
रोहित थंडपणे समोरच्या खुर्चीत बसलेल्या अल्ताफकडे पाहत होता. दिल्लीहून निघाल्यावर त्याने बरेली पोलीसांना फोन करुन अल्ताफला अ‍ॅरेस्ट करण्याची सूचना दिली होती. त्याचा फोन येताच इन्स्पे. शेख सादीकनी आपल्या स्टाफसह एजाज नगरकडे धाव घेतली. निसारच्या घराभोवती चारही बाजूला पोलीसांचं कडं उभं करुन ते आपल्या स्टाफसह आत घुसले. रात्री एक वाजता ध्यानीमनी नसताना पोलीस घरात घुसलेले पाहून तिथे एकच गोंधळ उडाला. आतल्या खोलीत असलेले अल्ताफ आणि रुक्साना जागे झाले होते. पण कोणतीही हालचाल करण्याची संधी मिळण्यापूर्वीच शेखनी त्याच्यावर झडप घालून त्याच्या हातात बेड्या चढवल्या होत्या!

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ११

लेखक रा.म.पाटील यांनी गुरुवार, 08/11/2018 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - ११ ( Decorate Your Love ) दीपावली.. प्रेमाचा गोडवा.. 'लाडू..' दिवाळीची गोड चव.. पण ती चव आता त्याच्यासाठी एक कडू आठवण झाली होती.. त्यामुळेच की काय त्याने लाडू खायचे सोडून दिले होते, त्याच्या आईला राहून राहून आश्चर्य वाटायचे की एकेकाळी ह्याच लाडूसाठी हट्ट धरायचा तो हाच का, मग आता इतका तिटकारा का आलाय त्याचा..? माझ्या हातच्या लाडूची चव बिघडली तर नाही ना.! मागच्या दिवाळीत त्याच्या आईने त्याला ह्याबद्दल विचारून पाहिले होते..