लेख
फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : १२
फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - १२
( Decorate Your Love )
नववर्ष.. प्रेमाचा निरोप..
३१ डिसेंबर.. आजचा दिवस.. सारे जग आज एकवटणार.. नववर्षाच्या स्वागतासाठी.. गतवर्षाला निरोप देऊन..
तोही आज निरोपच देत होता.. तिला.. त्याच्या एकतर्फी प्रेमाला..
सारे जग आज गतवर्षातील कटू आठवणी विसरून नव्या आठवणीसाठी सज्ज होत होते..
पण त्याच्यासाठी तिच्या गतवर्षातील आठवणी ह्या गोड होत्या.. त्या तो कधीच विसरू शकत नव्हता..
पण आजचा दिवस मात्र गोड नव्हता.. कारण आज ती ऑफिस सोडून चालली होती..
ऑफिस सुटल्यावर दुसरीकडे तरी गाठभेट होईलच ह्या आशेवर तो असतानाच त्याला कळले की ती हे शहरच सोडून जाणार होती..
सकाळी सकाळी
ग्लोबल इंटरनॕशनल स्कुलच्या प्री प्रायमरी सेक्शनच्या गेटवर आज एक नाट्य बघायला मिळालं.मी नेहमी सकाळी कामाला जाताना धवल मधे चहा प्यायला थांबतो .आजही चहा घेत असताना.समोर एक गाडी थांबली.आतुन एक पारोसा झोपाळलेला ,केस विस्कटलेला बाबा त्याचं गोंडस पिल्लु घेउन बाहेर पडला.गुबगुबीत जर्कीनच्या आतलं तेवढंच गोंडस गोरंगोरं बाहुलं बापाच्या गळ्याला मिठी मारुन बसलं होतं.एका खांद्यावर त्या बाहुल्याचं शिक्षण बांधलेली धोपटी आणी दुसर्या खांद्यावर बाहुली असा लवाजमा घेत कसंबसं गाडीचं दार लावुन आणी बाहुल्याची पप्पी घेत गप्पागोष्टी करत बाप शाळेच्या गेटकडे पोहचला.गेटवरच्या वॉचमन कडे सॕक देत बापाने लेकराला खाली उतरवले.चि
आरंभशूर
``तूच ठरवतेस, आज व्यायाम सुरू करायचा. आज डायरी लिहायला सुरुवात करायची, आजपासून कामात जास्त लक्ष द्यायचं, टाइमपास करायचा नाही, सोशल मीडिया कमी वापरायचं, व्हर्च्युअल जगात जास्त वावरायचं नाही, सकाळी लवकर उठायचं, माती नि मसणं करायचं!``
``मग?``
``मग` काय `मग`? तू मागचापुढचा विचार न करता संकल्पांना होकार देऊन टाकतेस आणि आम्हाला ते पाळत बसावे लागतात ना!``
गावाची रचना
- डॉ. सुधीर रा. देवरे
कोणत्याही गावाला पूर्वी शीव असायची. गावातून बाहेर पडायला दरजा असायचा. गावाच्या आजूबाजूला कोट म्हणजे भिंत असायची. अथवा गावांतील घरांची रचनाच अशी असायची की घराच्या पुढच्या दारातून गावात प्रवेश व्हायचा तर मागच्या दारातून गावाबाहेर मळ्यात- खळ्यात वा प्रात:र्विधींसाठी जाता येत असे. या व्यतिरिक्त गावाला कुठे कुठे खिंडी असत. या खिंडींमधून पांदीने शेतात बैलगाडीतून जाता येत असे. गावात येणार्या व्यक्तीला गावाच्या मुख्य दरवाजातूनच गावात प्रवेश करावा लागे. आणि गावाबाहेर जाण्यासाठी सुध्दा.
गावाची शीव वेगळी आणि दरजा वेगळा.
सिंहगडाची अखेरची लढाई (भाग २)
१८१७ सालच्या दसऱ्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांविरुद्ध उघड युद्ध पुकारले. खडकी, येरवड्याच्या लढाईनंतर इंग्रजांनी पुणे घेतले, पण बाजीरावाने आपला खजिना आणि मौल्यवान वस्तू आधीच सिंहगड आणि रायगडावर हलवल्या होत्या. त्यामुळे २० फेब्रुवारी १८१८ या दिवशी साताऱ्याहून ब्रिटिश फौज सिंहगडच्या परिसरात पोचली. या फौजेने कुठे तोफा चढवल्या होत्या त्याचा एक नकाशा लढाईनंतर एका वर्षातच कर्नल व्हॅलेंटाईन ब्लॅकर याने एका पुस्तकात प्रकाशित केला.
अडनिडी मुलं-४
आज सकाळी सकाळी ९:०० च्या दरम्यान बेल वाजली. आज कचरा घेणारी बाई लवकर आली कि काय म्हणत मी कचऱ्याच्या दोन्ही बादल्या घेवूनच दरवाजात धावले आणि दार उघडताच काळजात धस्स झाले. माझ्या घरी पूर्वी काम करणाऱ्या आणि माझ्या अडीनिडीला धावून येणाऱ्या मावशी दारात उभ्या होत्या. घरात पावूल कि दारात पावूल त्यांनी रडायला चालू केल. मलाही राहवले नाही. दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागलो. मावशी तर धायमोकलून रडू लागल्या. मी गपा मावशी गपा एवढेच बोलत होते आणि त्या कशी गप्प बसू ओ मी म्हणून रडत होत्या. माझ्या टीनाने असा काय गुन्हा केला असेल ओ, काय म्हणून माझ्या लेकराला अशी शिक्षा म्हणून अजूनच रडू लागल्या.
प्रधान
HR नावाचा जो काही प्रकार कोणत्याही कंपनीत असतो . त्याला डोकेदुखी सोडून दुसरं काही जमत नाही . म्हणजे , काही लोक असतात चांगले . शक्य तेवढी मदत करतात, माहिती देतात आणि पुढे काय होईल आणि काय नाही हे समजावून समोरच्याला शांत करतात. समोरचा कामगार .. (कामगार च कि . प्रोफाइल मध्ये जरी Senior Engineer असलं तरी शेवटी दिवसाच्या - आजकाल रात्र पाळीच्या रोजच्या हिशोबाने काम करणारे आम्ही कामगार ) का पेटलाय . आणि फक्त कंपनीचा फायदा न बघता त्याचाही कसा फायदा होईल हे सांगून देणारे काही दुर्मिळ प्राणी असतात काही कडे. आणि ते जिथे असतात तिथे कायम फायदाच दिसतो कंपनीचा . ..
जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): १३. अकोला ते रिसोड
जे सत्य सुंदर सर्वथा....: १३. अकोला ते रिसोड
जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१. चाकण ते केडगांव चौफुला
जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):२. केडगांव चौफुला ते इंदापूर
जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):३.
जेवीद्वि व्रत - द्विभूक्त्स्य वजनो दास:
एक आटपाट नगर होते. तेथे एक मध्यवयीन, मध्यमवर्गीय सद्गृहस्थ रहात होता. खाऊन पिऊन सुखी होता, चरबी आणि ढेरी बाळगून होता परंतु शारीरिक समस्येमुळे त्रासाला होता. वाढता रक्तदाब आणि रक्तातील वाढत्या साखरेमुळे पिडला होता. प्रयत्न करूनही कमी न होता, कलेकलेने वाढणारे वजन आणि पुढे येणारी ढेरी यामुळे गांजला होता. वजन आणि ढेरी कमी करण्याचे विविध प्रयत्न करून थकला होता. वाढत्या वजनाबरोबरीने येणारे विविध आजार त्याला भीती दाखवत होते. काही विशिष्ट व्यक्ती समोर आल्यावर पोट आत ओढून ओढून दमला होता. वजन आणि ढेरी कमी करण्यासाठी अर्धबरीच्या सूचना ऐकून ऐकून कंटाळला होता.
मिसळपाव
