Skip to main content

लेख

माझी 'वाईट्ट' व्यसनं : गुलझार

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 26/06/2015 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
गविंनी लिहीलेला खूब-रुयोंसे यारियाँ न गयी.. हा लेख वाचला आणि राहवले नाही. दोन वर्षांपूर्वी अशीच एक लेखमाला लिहायला सुरूवात केली होती. पण नंतर ती अर्धवटच राहीली. त्यापैकी काही लेख 'मीमराठी' तसेच 'ऐसी अक्षरे' वर पोस्ट केले होते. मिपा संपादकांची परवानगी आहे असे गृहीत धरून त्यातील काही लेख इथे पुन्हा रिपोस्ट करतोय. मिपाच्या पॉलीसीत बसत नसल्यास कृपया उडवून टाकावेत. ********************************************************************************* १९९३ ची गोष्ट ! कॉलेजच्या द्वितीय वर्षात होतो. केतन मेहताची नवी फिल्म रिलीज झाली होती. 'माया मेमसाब' !

ती संध्याकाळ मंतरलेली…।

लेखक अपरिचित मी यांनी गुरुवार, 25/06/2015 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
घड्याळाने चारचे ठोके वाजवले. ती तिच्या शनिवारच्या कामात गुंग. अचानक शेजारच्या खिडकीतून लता दीदींच "मालवुन टाक दीप …" कानावर पडलं … अन … ती थबकली … थोडीशी बिथरली … झर झर लग्नाची नुकतीच पूर्ण झालेली पाच वर्ष डोळ्यांसमोरून गेली. गेल्या पाच वर्षात तिने हे गाणं ऐकलंच नव्हतं. लग्ना नंतरचे सुरुवातीचे दिवस आठवले. तो तर कामात इतका गुंग कि आठवणींना ही वेळ नाही. आजही सुट्टीचा दिवस. दुपारी उठल्या पासून मुलगा शेजारी खेळायला गेलेला. वास्तविक एकांत भरपूर. पण कुठेतरी कशाची तरी कमी होती. साडे तीन वाजे पासून T .V. समोर News Channels सुरु. बायको सोबत दुपारचं जेवण झालं. पण गप्पा नेहमीच्याच.

नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे'.....भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 24/06/2015 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे - भाग १' नॉर्मंडी.....अर्थात "द लाँगेस्ट डे' ....भाग-२ मागीलपानावरुन... आपल्या हातातील चांदीची टोके असलेला फिल्डमार्शलचा बॅटन त्या वाळूकडे रोखत तो म्हणाला, ‘या किनाऱ्यावर आपण युद्ध जिंकणार आहोत किंवा हरणार आहोत. शत्रूला थोपविण्याची आपल्याकडे फक्त एकच संधी आहे. तो पाण्यात असेपर्यंत. त्याचा नाश हा किनाऱ्यावर उतरतानाच होऊ शकतो. आपल्याला त्यांना प्रतिकार करायचा असेल तर येथेच करावा लागेल. लँग, आक्रमणाचे पहिले २४ तास या युद्धाचे भवितव्य ठरविणार आहेत.

सौम्या आणि प्रणयरम्यता

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 23/06/2015 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
“हा वसंत ऋतुचा मोसम आहे.वातावरणात प्रणयाचे वारे वाहू लागले आहेत.पण हे सर्वांच्याच बाबतीत नव्हतं.आणि तसं माझ्याही बाबतीत.” सौम्या मला सांगत होती. सौम्याचे वडील आणि मी एकमेकाला ओळखत होतो.आमची ओळख आमच्या एका दुसर्‍या मित्राने करून दिली होती.

विस्मरणातील पांडुरंग

लेखक Sanjay Uwach यांनी सोमवार, 22/06/2015 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणसं निसर्ग नियमानुसार जन्माला येतात, मात्र ती का जन्माला येतात किंवा जन्माला येणे हा काही त्यांचा गुन्हा असतो काय ? भविष्य काळात जे जीवन त्यांना जगावे लागणार आहे, त्याला ते कितपत जबाबदार असतात ? असा प्रश्न मानवी मनाला अनेक वेळा पडतो. कधीकाळी एका इनामदाराच्या संपन्न कुटुंबात जन्मलेल्या पांडुरंगास मात्र आमच्या मामाच्या घरात जन्मभर मानवी पाण्याचा पंप अर्थात पाणक्या बनून रहावे लागले. आम्ही सुट्टीत नृसिंहवाडीला गेलो, की पांडु हा आमच्या कुतुहलाचा विषय असायचा.

हे हृदय कसे बापाचे......!

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 20/06/2015 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
(उद्या जगभरात माणसांच्या दुनियेत Father’s Day साजरा होईल. पण पक्ष्यांच्या मुक्त जगातला हा रोजचा Father’s Day वाचकांसाठी....) रणरणते वाळवंट. निर्मम सूर्य. नजर टाकली तरी, आपले डोळे भाजून जावेत! अशा ठिकाणी कुठला पक्षी रहात असेल, वस्ती करीत असेल, मनातही येत नाही. पण निसर्गाची किमया आणि माया अगाध! ............. ............. ................ एक पक्षीण आपल्या नवजात पिलांना पोटाशी घेऊन खुरट्या झुडपांआड बसलेली. पिलेही आपल्या आईच्या पोटाच्या सावलीला बिलगून, आजूबाजूला टुकूटुकू पाहतायेत. असल्या रणरणत्या वाळवंटात त्यांना दानापाणी कुठून मिळत असेल?

तत्त्वभान

लेखक निरन्जनदास यांनी गुरुवार, 18/06/2015 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, मी गेल्या वर्षी म्हणजे २०१४ साली ‘लोकसत्ता’मध्ये 'तत्त्वभान' हे सदर लेखन करीत होतो. तत्त्वज्ञान या विषयाची ओळख करून देणारं. मी तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक आहे. तत्त्वज्ञान हा जरी उच्च दर्जाचा प्रतिष्ठित विषय असला तरी त्याच्या नादी कुणी फारसं लागत नाही. एका विशिष्ट पातळीच्या खाली येऊन त्यावर लेखन करता येत नाही, अशीही भानगड आहेच. पण वृत्तपत्राचा वाचक सर्व स्तरावरचा असतो. सामान्य माणसापासून प्रतिभावंत तत्त्ववेत्त्यापर्यंत एक मोठा पट या वाचकात असतो. त्यामुळे या सर्वाना सुलभ वाटेल, असे तत्त्वज्ञानविषयक लेखन करण्याचा माझा हा प्रयत्न होता. दर गुरुवारी हे सदर प्रसिद्ध होत असे.