Skip to main content

एकदा तरी पहावा असा.

लेखक नाखु यांनी शुक्रवार, 31/10/2014 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ.प्रकाश बाबा आमटे.
      मराठी चित्रपट जगतात सध्या (हिंदीच्या तुलनेने) चांगले आशयघन/नाविन्य विषय्/नवीन प्रयोग असलेले चित्रपट येऊ लागले आहेत्.सकस विषय आणि दर्जेदार निर्मिती बरोबर जाहीरात-वितरण यावर विशेष लक्ष्य दिल्याने चित्रपट व्यवस्थित कमाई करू शकतो हे बालक पालक्/पोष्टर बॉईज ने दाखवून दिले आहे. नमन झाल्यावर आता मुळ विषयः डॉ.प्रकाश बाबा आमटे कालच पाहिला. सरळ रेघ (आवडलेल्या गोष्टी/जमेच्या बाजू):
      • वेगळा विषय निवड तसेच प्रसिद्धी पासून दूर व्रतस्थपणे काम करणार्या माणसांची समाजाला ओळख करून देणे
      • उच्च निर्मिती मुल्ये (कुठेही हात आखडता घेतल

फटाक्याचा आनंद (लघु कथा)

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 25/10/2014 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्याच्या एका बाजूला मोठे-मोठे बंगले आणि दुसर्या बाजूला झोपडपट्टी, महानगरातले सामान्य दृश्य. दहा वर्षाचा चिन्या अशाच एका झोपडीत राहत होता. एका लहान मुलाप्रमाणे त्याच्या मनात ही राकेट, अनार, चरखी इत्यादी उडविण्याची इच्छा होती. पण त्याच्या बाबांनी एक छोटे से पिस्तुल दिवाळी निमित्त त्याला आणून दिले होते. दिवस भर टिकली सारख्या गोळ्या उडवून तो बोर झाला. संध्याकाळी आकाशात उडणारे राकेट इत्यादी पाहून आपले बाबा आपल्यासाठी अनार इत्यादी आणू शकत नाही, आपण गरीब आहोत, ही जाणीव त्याला बोचू लागली. तो उदास झाला.

हायकू - २

लेखक शरद यांनी शनिवार, 18/10/2014 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
हायकूवरील पहिल्या लेखाला चांगला प्रतिसाद मिळाला व अनेकांनी स्वरचित हायकू दिले म्हणून आता दुसर्‍या भागात हायकूचा जरा खोलात विचार करू..पहिल्या लेखात सांगायचा राहिलेला एक सोपा नियम बघा पहिल्या-तिसर्‍या अथवा दुसर्‍या-तिसर्‍या ओळीत यमक पाहिजे. एकच यमक जुळवावयाचे असल्याने सोपे आहे. मराठीत ५-७-५ ही भानगडच नसल्याने प्रत्येक ओळीतील शब्दसंख्या कमी जास्त होते. हरकत नाही. पण त्या रचनेत "लय" पाहिजेच. स्वत:शीच गुणगुणले तरी लय आहे की काही बदल पाहिजे हे लगेच कळेल. शब्दसंख्या मर्यादित असल्याने त्यांची निवड करतांना जास्त काळजी घेतली पाहिजे.

बेडूक आणि सर्प

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 18/10/2014 07:50 या दिवशी प्रकाशित केले.
फार जुनी कथा आहे, आटपाट नगरीत एका विहिरीत शेंकडो बेडूक राहत होते. त्यांच्यात आपसांत भांडण झाले. एका बेडकाने तावातावाने विहीर सोडली. रागाच्या भरात जात असताना, एका सर्पाने त्यास पकडले. बेडकाने सर्पास त्याला सोडून देण्याची विनंती केली. सर्प म्हणाला, बेडूक हे माझे भोजन आहे, त्या मुळे तुला मी खाणारच. त्याही परिस्थितीत बेडूकाला एक भन्नाट कल्पना सुचली, तो सर्पास म्हणाला, तू मला खाईल, तर आज तुझे पोट भरेल, उद्या तुला पुन्हा भूक लागेल. मला सोडेल तर महिन्या भराच्या तुझ्या जेवणाची व्यवस्था करू शकतो. सर्पाने विचारले, ते कसें शक्य आहे?

हायकू

लेखक शरद यांनी गुरुवार, 16/10/2014 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
हायकू : मराठीत न रुजलेला एवढी आवडते जपानी हायकू, तर कशाला केलीत मराठी बायकू ? महाराष्ट्राबाहेरचे दोन काव्यप्रकार म्हणजे गझल व हायकू. हे काही आपल्या भूमीतील, संस्कृतीतील नव्हेत. पण कलाप्रेमी महाराष्ट्राने जसे कथक, भरतनाट्य बाहेरून आल्यावरही प्रेमाने आपले म्हटले, उत्तर हिंदुस्थानातील शास्त्रीय संगीत आवडीने जोपासले तसे गझलला गळ्यात गोवले. पण हायकू मात्र दुर्लक्षीला गेला. एक श्री. शिरीष पै सोडल्या तर इतरांनी हा प्रकार आवडीने हाताळलाच नाही. असे का झाले ? मला वाटते याला दोन गोष्टी कारणीभूत असाव्यात. पहिली म्हणजे हायकूची जन्मभूमी जपान. जपानी भाषा आपल्याला पूर्णपणे अपरिचित.

मला न आवडलेली पुस्तके: आत्मचरित्रे/चरित्रे

लेखक पुस्तकमित्र यांनी बुधवार, 15/10/2014 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 http://www.misalpav.com/node/29133 ------------------------------------------------------------------------------- या आधीच्या ३ धाग्यांप्रमाणेच या धाग्यात लिहूया मला न आवडलेल्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल. चरित्रे/आत्मचरित्रे न आवडण्याची कारणे काही अशी सांगता येतील की त्या पुस्तकात सत्याचा विपर्यास झालेला कधी कधी दिसतो. तर कधी आत्मप्रौढीचा वास येतो.

छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्रः३ ऋतु (Seasons) निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी मंगळवार, 14/10/2014 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! नेहमीप्रमाणेच तिसर्‍या स्पर्धेचा निकाल जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेला आधीच्या २ स्पर्धांपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळाला आहे. तसेच आधीपेक्षा जास्त म्हणजे एकूण ४५ जणांनी आपली मते नोंदवली आहेत. यावेळीही एकाहून एक सरस चित्रे स्पर्धेत होती. आणि जवळपास सर्वांनाच कोणा ना कोणाची पसंती मिळाली आहे. तरीही आतापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल की प्रथम क्रमांकाचे चित्र कोणते असावे. बहुमताने क्र.

निरवतापाची जत्रा

लेखक निराकार गाढव यांनी रविवार, 12/10/2014 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
अताशा निरवतापाच्या जत्रंला पूर्वीसारखी मजा नाय रावली. तुमी इचाराल ह्यो निरवताप कोणचा गाव... तर आपल्या सार्वेजेनिक पारापासून तसा अगदी हाकंच्या अंतरावर हाय. येक पाच कोस आलिकडं म्हनाना. तर निरवतापात खूप जत्रा लागतात. खंडोबाची जत्रा, नीळावण्ती देवीची जत्रा, अंबाबायचा गोंदोळ, ग्यानबाची पाल्की, नरसोबाची गाडी,...  निसता उच्छाद असतुया. पोरं आयबापाची नजर चुकावून सांजंला साळा सुटली की उणाडक्या करत जत्रंत शिरायची. मलाबी त्ये बरुबर घ्यायची. गरदीमद्दे लै धम्माल आसायची. देवीच्या म्होरं पोरं लेझीम खेळायची. मंग मोट्टे मानसं पोरांस्नी कायतरी खायाला द्यायच्ये आन एक दोन रुपं बी हाती टिकवायच्ये.

मला भावलेलं गाणं

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 09/10/2014 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
घरी येता येता ती तिच्या घराच्या दारात उभी दिसली. मन प्रसन्न झाले. खांदा दरवाज्याच्या चौकटीला टेकवून उभं राहण्याची तिची ती तर्‍हा मोहक होती. ती तशी उभी राहिली की तिच्या कंबरेची उजव्या बाजूला नाजूक कमान तयार होत असे. तिचा उजवा हात कमरेवर आणि डावा हात वेणीशी चाळा करत असे. घरी आलो. चैन पडेना. पुन्हा एकदा तिच्या घरावरून चक्कर मारण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. ती अजून तशीच उभी होती. मला पुन्हा पाहताच सुरेख हसली आणि आत पळून गेली. मनाला इतकी खुशी इतर कुठल्याच गोष्टीने होत नसे. परत घरी जायला निघालो. आभाळ भरून आलं होतं; पावसाचे थेंब पडू लागले होते. तिच्या त्या हसण्याचा गारवा मनाला गुदगुल्या करतच होता.

गम्मत (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी बुधवार, 08/10/2014 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
''तुला काय काय करता येतं बेटा ?'' ''मला … नं ? जादू करता येते !'' ''कसली ? '' ''मी जादूनं काळंकुट्ट करून टाकते माझं नाई ऐकलं कुणी तर . . '' ''बापरे ! मलां नको गं काळं करूस . मी तुला बिस्कीट आणलं ना?'' ''हेहे ! तुमाला कसं काळं करणार? तुमी आधीच तर काळे आहात ! '' ममानं डोळे मोठे केले- '' शरू! काकांना असं बोलतात? से सॉरी !'' ''सॉरी अंकल !'' वेरी सॉरी हं . . '' जाउद्या हो - लहान आहे ती'' - काका म्हणले . - काईपण बोल्लं तरी रागवतेच ! ''थांबा -आता - मी ना, ममाची एक गम्मतच सांगते सगळ्यांना ! '' ममानं मला उचललं अन आत पळाली.