Skip to main content

केतकीच्या बनी तिथे..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 10/01/2011 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
केतकीच्या बनी तिथे... (कृपया येथे ऐका)
१९७०-७५ चा काळ असावा तो. किंवा ७०चं दशक म्हणुया. संध्याकाळी पावणे सात की सात वाजता आकाशवाणी मुंबई 'ब' वर केवळ १५ मिनिटांचाच मराठी गाण्यांचा कार्यक्रम लागायचा. त्यात हे गाणं अगदी हटकून ऐकायला मिळायचं.

ऍबल कॉन एला

लेखक निनाद यांनी रविवार, 09/01/2011 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट कथा - वय सुचवणी १५ + साठी ऍबल कॉन एला Hable con ella (इंग्रजी मध्ये - टॉक टू हर.) बेनिनो आणि मार्को एका नृत्य नाटिकेमध्ये शेजारी शेजारी बसतात. बेनिनो मार्कोला पाहतो आणि एका प्रसंगामुळे त्याच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून तो त्याच्या लक्षात राहून जातो. बेनिनो हा पेशाने नर्स आहे आणि तो एका इस्पितळात काम करतो. त्याची अनेक वर्षे आजारी असलेली आई नुकतीच वारली आहे. या इस्पितळात बॅले नृत्य करणारी सुंदर तरुणी ऍलिशिया, अपघातात कोमात गेल्याने बेशुद्ध आहे. बेनीनी तीची सुशृषा करतो आहे. बेनीनी तिच्या प्रेमात पडलेला आहे.

सोपे कोडे

लेखक शुचि यांनी शनिवार, 08/01/2011 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
एकदमच सोप्पं कोडं घालते आहे. पण या धाग्यावर अधिक कोडी घालावीत. (१) ३ खोकी आहेत. (२) एका खोक्यात फक्त काळे हातमोजे, दुसर्‍या खोक्यात फक्त पांढरे हातमोजे आणि तीसर्‍या खोक्यात काळे आणि पांढरे हातमोजे आहेत. (३) तीनही खोक्यांवर निखालस चूकीच्या रंगांच्या चिठ्ठ्या लावल्या आहेत. प्रश्न - कमीत कमी किती प्रयत्नांत तुम्ही हातमोजा उपसून, खोकी आणि रंग बरोबर जुळवून व्यवस्थित चिठ्ठ्या लावू शकाल?

फॅट फ्री मद्य

लेखक खादाड अमिता यांनी शुक्रवार, 07/01/2011 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
सगळेच मद्य मुळात 'फॅट फ्री' असते. अगदी खरच! पोर्ट वाईन आणि रोझे वाईन सारख्या काही ड्रिंक्स मधे नेग्लीजीबल प्रमाणात ट्रेस फॅट असते. पण अगदी 'आहे काय न नाही काय' असे. मग तरी, सर्व सामान्य समाजाप्रमाणे जी व्यक्ती मद्य पान करतात ती जाड का असतात? फर्स्ट थिंग्स फर्स्ट: जाडी हा खूप 'unexclusive' विषय आहे. अमुक अमुक माणसंच जाड असतात आणि बाकी नाही असे अजिबात नाही. व्हेजिटेरियन, नोन व्हेजिटेरियन, व्हेगन किंवा इंडियन, अमेरिकन, ओस्त्रेलीयन ई. कुणी पण जाड असू शकत किंवा जाड होऊ शकत.

सायलेंटियम

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 07/01/2011 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
सायलेंटियम साल्झबर्ग या ऑस्ट्रीयातल्या छोट्याश्या गावात आत्महत्त्या करण्याची लाट आली आहे की काय असे वाटत असते. त्यातच गावातील प्रतिष्ठित अश्या समारोह अध्यक्षांच्या जावयाच्या आत्महत्त्येने गावात खळबळ माजते. हे अध्यक्ष साल्झबर्ग गावाचे नाव मोठे व्हावे म्हणून निरनिराळे समारोह आयोजित करण्याचे मनावर घेत असतात. त्यासाठी वेगवेगळे कलाकार मिनतवारीने गावात बोलावले जातात. पण यावेळी ही आत्महत्त्या नसून खून आहे असा संशय तयार होतो. कारण या माणसाने चर्चच्या सध्या आर्चबिशप असलेल्या व्यक्तीवर लैंगिक शोषणाचे जाहीर आरोप केलेले असतात.

तोक्यो गोमी ओन्ना

लेखक निनाद यांनी गुरुवार, 06/01/2011 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
तोक्यो गोमी ओन्ना अर्थात तोक्यो ट्रॅश गर्ल किंवा तोक्यो गार्बेज गर्ल मियुकी (नाकामुरा मामी) ही तोक्यो मधल्या एका कॅफेमध्ये वेट्रेस आहे. तिला या कॅफेमध्ये एक मैत्रिण आहे. ही बिनधास्त मैत्रिण नवनवीन जोडीदार शोधत राहते. आपल्या शैय्यासुखाचे किस्से मियुकीला ऐकवत राहते. मियुकी तिच्या अपार्टमेंट मध्ये राहणार्‍या संगीतकाराच्या (कझुमा सुझुकी) प्रेमात पडली आहे. पण हे प्रेम व्यक्त करण्याचे धाडस तिच्या मध्ये नाही. रोज रात्री ती कुणी पाहत नसतांना त्याचा कचरा उचलून आपल्या घरी घेऊन येते. त्यातून त्याच्या आयुष्याची चाहूल घेत राहते.

द स्टोरी ऑफ द वीपींग कॅमल

लेखक निनाद यांनी बुधवार, 05/01/2011 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
द स्टोरी ऑफ द वीपींग कॅमल मंगोलियात घडणारी ही कथा आपल्याला एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जाते. द स्टोरी ऑफ अ वीपींग कॅमल ही एक माणुस आणि प्राणी यांच्या संबंधांचे नितांत सुंदर चित्रण असलेली कथा आहे. भटक्या लमाणांचा एक तांडा उंटांचा सांभाळ करत फिरत असतो. सांडणींच्या विणीचा हंगाम होऊन त्यांना आता पिले होणार असतात. एक नवीनच आई होऊ घातलेली सांडणी पिलाला जन्म देत असते. पण दुर्दैवाने हा बाळंत होण्याचा काळ दोन दिवस सुरु राहतो. पिलू होते, पण वेदनेतून गेलेली ही पहिलटकरिण सांडणी पिलू स्विकारायला नकार देते. दूध देत नाही. काफिल्यातली एक बाई जी सून आणि आई ही आहे, पिलाची काळजी घेऊ लागते.

"ब्युटी अँड द बीस्ट" कथा ... प्लूटो ग्रह, व्रुश्चिक रास

लेखक शुचि यांनी बुधवार, 05/01/2011 04:19 या दिवशी प्रकाशित केले.
*ज्यांना ज्योतिष हे थोतांड वगैरे वाटत असेल त्यांनी हा लेख वाचू नये अथवा समं ना सांगून वरील पर्यायातून "ज्योतिष" हा पर्याय काढून टाकायची मागणी करावी. या धाग्यावर अवांतर करू नये ही विनंती. बर्‍याच वर्षांपूर्वी मी "ब्युटी अँड द बीस्ट" या कथेची प्लूटो या ग्रहाशी तसेच वृश्चिक या राशीशी घातलेली एक सुरेख सांगड वाचली होती. तो लेख विशेषतः ज्यांना ज्योतिषविषयक ज्ञान आहे त्यांना आवडेल असा होता. आता जेवढी सांगड आठवते तेवढी माझ्या तोडक्या मोडक्या शब्दात सांगायचा प्रयत्न करते. सूर्य, चंद्रादि वैयक्तिक ग्रहांपेक्षा, प्लूटो हा ग्रह "व्यापक मानसिकतेवर" अधिराज्य करणारा ग्रह समजला जातो.

शाळा

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 03/01/2011 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा हा विषयच असा आहे की कितीही लिहा कमीच पडेल. पेनातली शाई संपेल (किंवा कळफलक दाबु दाबुन बोटे दुखतील) पण शाळेच्या आठवणी संपणार नाहीत. प्रत्येकाच्या हृदयात शाळेच्या आठवणींसाठी एक वेगळ कप्पा राखुन ठेवलेला असतो. त्या १०-१२ वर्षांच्या आठवणी नेहेमीच सोनेरी रुपेरी असतात असे नाही पण अटळ, अचल, अविनाशी नक्की असतात. माझ्या आठवणीत एक नाही अनेक शाळा आहेत. पण शाळेशी खर्‍या अर्थाने बंध जुळण्याच्या काळात म्हणजे ५ वी नंतर मी ठाण्याच्या सरस्वती मध्ये होतो.

आघात

लेखक ऋषिकेश यांनी सोमवार, 03/01/2011 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन वर्षातील चित्रपटांची सुरवात सुरवात यंदा (बरेच वर्षांनी) मराठी चित्रपट पहाण्याने झाली. काल विक्रम गोखले दिग्दर्शित "आघात" पाहिला. एका शब्दात सांगायचे तर चित्रपट "आवडला". टिपः यापुढे चित्रपटाची सुरवात दिली आहे. अंशतः रसभंग होऊ शकतो चित्रपट सुरू होतो तो डॉक्टरांच्या प्रतिज्ञा/शपथ ऐकत. कुठल्याही प्रकारच्या नमनात वेळ न घालवता मुळ विषय वेग घेतो. एक २२ वर्षांची मुलगी जिचे लग्न महिन्याभरावर आले आहे तिच्या ओटीपोटात एक गाठ डिटेक्ट झाली आहे.