Skip to main content

आरोग्य

Tour de Parbhani! सायकलीवर पुणे- परभणी प्रवास

लेखक मार्गी यांनी सोमवार, 28/07/2025 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
✪ केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ✪ तीन दिवसांमध्ये ३९५ किलोमीटर सायकलिंग ✪ नियमित सायकलिंग = स्कूटीचा वेग ✪ रमणीय निसर्ग आणि डोंगररांगा ✪ निसर्गासोबत धारणा आणि ध्यान ✪ सायकलीची लोकांना जोडण्याची क्षमता ✪ जुन्या ऋणानुबंधांना उजाळा ✪ विद्यार्थ्यांसोबत संवाद आणि गप्पा नमस्कार. परभणीच्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राच्या "Yoga for fitness" सायकल अभियानाच्या तयारीसाठी नुकताच पुणे ते परभणी सायकल प्रवास केला. पुढच्या महिन्यातल्या दक्षिण भारतात १८०० किलोमीटरच्या सायकल अभियानाची तयारी सुरू आहे. त्याच तयारीचा भाग म्हणून ही अशी राईड करावीशी वाटली.

21 जून योग दिवस : उद्यानातिल स्वास्थ्य साधक

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 20/06/2025 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
(हा लेख लिहण्यापूर्वी उद्यानात सकाळी पाच ते आठच्या दरम्यान अनेक स्वास्थ्य साधकांशी वार्तालाप केला आहे.) माझे बालपण जुन्या दिल्लीत गेले. त्याकाळी मोरीगेट ते यमुने पर्यन्त अनेक मोठी उद्याने होती. नंतर 35 वर्षे उत्तम नगर इथे राहिलो. जवळच्या जनकपुरी इथेही मोठे-मोठे उद्यान आहेत. बालपणापासून मला पासून उद्यानात फिरण्याची सवय आहे. गेल्या ऑगस्टच्या सुरवातीला ग्रेटर नोएडा इथल्या एका हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये शिफ्ट झालो. मुलाला 22व्या माल्यावरचा फ्लॅट विकत घ्यायला भाग पाडले याचे एकमेव कारण या भागातील उद्यान बाल्कनीतून समोर दिसते.

एक आधुनिक सत्यनारायण कथा

लेखक माहितगार यांनी शनिवार, 12/04/2025 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
सत्यनारायण कथेचे अधिक आधुनिक व्यवस्थापन तत्त्वांवर आधारित पुनर्सादरीकरण खालीलप्रमाणे: १. पहिला अध्याय - ग्राहक केंद्रितता, नेटवर्किंग आणि निरंतर सुधारणा: अरुण नावाचा एक तरुण उद्योजक होता, जो पारंपरिक फर्निचर व्यवसायात नवनवीन प्रयोग करत होता. त्याला त्याच्या व्यवसायात वाढ हवी होती. एक दिवस त्याला, मार्गदर्शन करणारे एक अनुभवी व्यावसायिक, विनय भेटले. विनयने त्याला सत्यनारायण व्रताचे महत्त्व सांगितले, पण त्यासोबतच आधुनिक व्यवस्थापन तत्त्वेही सांगितली.

इतरांच्या कठीण काळात त्यांची सावली होणारे सोबती

लेखक मार्गी यांनी शनिवार, 01/03/2025 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
✪ The more you sweat in peace, the less you bleed in war! ✪ शिक्षण ही जशी शिक्षक- विद्यार्थी अशी दुतर्फा प्रक्रिया आहे तशी आरोग्यसुद्धा आहे ✪ अवघड प्रश्नांवर भाष्य करून उत्तरांचा मागोवा घेणारं पुस्तक ✪ गंभीर विषय पण अनौपचारिक, unpredictable शैली व विनोदाचा शिडकावा ✪ स्वत:ला अनेक प्रश्न विचारण्याची गरज ✪ “व्यक्त होण्याचं" आणि संवादाचं महत्त्व- बोलने से सब होगा ✪ स्वत:साठीचा वेळ- me time बद्दल अपराधभाव सोडून देण्याची गरज ✪ केवळ रुग्णांचेच सोबती नाही तर सर्वांचे व स्वत:चेही सोबती होण्याची दिशा ✪ प्रत्येकाने सजग व्हावं अशी एक छोटी चेकलिस्ट नमस्कार.

त्र्यंबकेश्वरमधील योग शिबिर आणि निसर्गाचा सत्संग

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 18/02/2025 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
✪ त्र्यंबकेश्वरमध्ये बिहार स्कूल ऑफ योगाचं योग शिबिर ✪ पण त्याआधी प्रसिद्ध संस्थानाच्या नावाने झालेली ऑनलाईन फसवणूक ✪ "अखंड सावधान असावे दुश्चित कदापि नसावे!" ✪ परमहंस निरंजनानंद सरस्वतींच्या उपस्थितीतील सत्संग ✪ "चार मिले, चौसठ खिले, बीस करें जोड़" ✪ BSY चं सुंदर आयोजन आणि सत्रांची मेजवानी ✪ आदर्श गुरू बरोबर आदर्श शिष्यत्वाचं उदाहरण! ✪ साधकांची मांदियाळीसह कीर्तन, भजन आणि ध्यान ✪ त्र्यंबकेश्वर भटकंती व ब्रह्मगिरीचा अविस्मरणीय ट्रेक सर्वांना नमस्कार. नुकताच त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या बिहार स्कूल ऑफ योगा ह्या मोठ्या योग विद्यापीठाच्या एका योग शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.

सिद्धी आणि मोक्षप्राप्तीचे विज्ञान

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 03/02/2025 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
सिद्धी आणि मोक्षप्राप्तीचे विज्ञान ================ सध्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने भारताच्या तेजस्वी संस्कृतीचं जे प्रदर्शन चालू आहे, त्यामुळे या संस्कृतीचे आकर्षण किती जणांना निर्माण झाले, आणि कितीजण लांब गेले हा एक संशोधनाचा विषय होईल. एखादा श्वेतकाय जरी कुंभमेळ्यात दिसला तरी तो गर्दी गोळा करतो, पण जे मनात निर्माण झालेली घृणा, तिरस्कार दाखवू शकत नाहीत, त्यांचा हिशेब मात्र कुणी ठेवत नाही.

कोष

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 25/01/2025 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
दर्द में डूबे हुए नग़मे हज़ारों हैं मगर साज़-ए-दिल टूट गया हो तो सुनाए कैसे | अनेक शायरांची प्रतिभा अशा डिप्रेशस मूड मधूनच फुलली.गम / उदासी ची पण एक नशा असते त्यांना.हा एक प्रकारचा डिफेन्स मेकॅनिझम असतो. सब्लिमेशन म्हणतात त्याला. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही फेजेस या ना त्या प्रकारे कुठल्याना कुठल्या टप्प्यात येतात. पुर्वी नात्यांच्या ईकोसिस्टीममुळे नैराश्यावर प्राथमिक अवस्थेतच उपचार होउन जात. आता नात्यांची वीण बदलली आहे. आता ही नात्यांची इको सिस्टीम मानसिक आरोग्य क्षेत्रातील सेवा सेक्टर मधे गेली आहे. अर्थात आताच्य सेवा या सेवा नसून तो व्यवसाय असतो.

भारताने जगाला दिलेली सांस्कृतिक भेट - २१ डिसेम्बर आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस

लेखक चामुंडराय यांनी शनिवार, 21/12/2024 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) आज रोजी Winter/December Solstice म्हणजे उत्तरायणाचा प्रारंभ होत असलेला २१ डिसेम्बर हा दिवस "आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस" म्हणून साजरा करायला मान्यता दिली आहे. २१ जूनच्या "आंतरराष्ट्रीय योग दिवस" ह्या यशानंतर भारताने आणखी एक यश मिळवले आहे. योगानंतर "ध्यान" हि भारताने जगाला दिलेली सांस्कृतिक भेट (cultural export gift) आहे. प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय ध्यान दिवसाचे उदघाटन करण्यात येणार आहे.

सहज सुचलं म्हणून

लेखक कंजूस यांनी शुक्रवार, 20/12/2024 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.