Skip to main content

आरोग्य

द मेन्स्ट्रुअल मॅन

लेखक इरसाल कार्टं यांनी शुक्रवार, 10/02/2017 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
द मेन्सट्रुअल मॅन, वाचून थोडे दचकलात ना? पण मी आज एका अश्या माणसाची गोष्ट सांगत आहे ज्याला अख्खं जग याच नावाने ओळखायला लागलंय त्याचं खरं नाव आहे अरुणाचलम मुरुगनाथम . आणि विशेष म्हणजे हा माणूस आपल्याच भारतातला आहे. चारचौघातला, पण त्याचं काम एवढं जबरदस्त आहे कि त अनेकांसाठी प्रेरणास्थान बनलाय. आमच्या क्लासमेट्स फाउन्डेशन ची मूळ प्रेरणाच तो आणि त्याचे कार्य आहे. माझी याच्याशी ओळख झाली इंटरनेट वरील या व्हिडिओ मुळे. साधारणत: ५-६ वर्षापूर्वी मी हा व्हिडिओ बघितला आणि डोक्यात पार झिणझिण्या आल्या.

मी आज केलेला व्यायाम - फेब्रुवारी २०१७ - सायकलिंग / रनिंग चॅलेंज

लेखक मोदक यांनी बुधवार, 01/02/2017 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८,०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी. डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९,६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ५४७ किमी.

बुद्धीमत्ता, सर्जनशीलता,latent inhibition आणि मानसिक रोग!!!

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी मंगळवार, 10/01/2017 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाने केलेली प्रगती ही त्याच्या बुद्धीमत्तेमुळे आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.पण माणुस ही खुप मोठी टर्म आहे.माणसांचे अनेक प्रकार पडतात,कॉकेशीअन (युरोपियन्स), मंगोलॉईड (पौरात्य),ऑस्ट्रेलॉईड्स (भारतीय), निगरॉईड्स (आफ्रिकन) व इतर अनेक.यांच्यात जसे वर्णादी भेद आहेत , तसेच बुद्धीमत्तेतही भेद आहेत. बुद्धीमत्ता म्हणण्याऐवजी सर्जनशीलतेत (creativity) खूप फरक आहे.जगाच्या बुद्ध्यांकावर जर नजर टाकली तर पौरात्य लोकांचा बुद्ध्यांक सर्वात जास्त आहे व त्यांचा मेंदू सर्वात मोठा आहे.त्या खालोखाल युरोपियनांचा बुद्ध्यांक व मेंदू व बाकीचे नंतर.

वजन करण्याचा सोपा हमखास उपाय

लेखक साहना यांनी शुक्रवार, 06/01/2017 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
भरपेट खाऊन आणि फार थोडा व्यायाम करून तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर हा छान उपाय आहे. वय २०-३५ दरम्यान असलेल्या लोकांना हा उपाय चांगला आहे ४० च्या वर असलेल्यांनी करू नये. १. आठवड्याला २ दिवस व्यायाम करा. शक्य असेल तर एक दिवस १ तास कार्डिओ आणि १ दिवस १ तास वजन उचलण्याचा व्यायाम करावा. २. आपण वाट्टेल ते खाऊ शकता अट फक्त एक. तुमच्या आहारातील किमान ४०% कॅलोरी ह्या प्रोटीन मधून आल्या पाहिजेत. १ ग्राम प्रोटीन = ४ कॅलोरी. समजा तुम्हाला अंडे खायचे असेल तर अंड्यांत सुमारे ३० कॅलोरी असतात आणि ६ ग्राम प्रोटीन असते.

मी आज केलेला व्यायाम - जानेवारी २०१७

लेखक गवि यांनी सोमवार, 02/01/2017 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी. डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - २९१ क

मिपा फिटनेस विकांत

लेखक प्रशांत यांनी रविवार, 04/12/2016 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, एसरावांनी सुचवल्याप्रमाणे १० आणि ११ डिसेंबर हा मिपा फिटनेस वीकांत म्हणून जाहीर करत आहोत. यासाठी एकच करायचे. आपण आपल्याला शक्य असलेले सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, सूर्यनमस्कार अशा कोणत्याही व्यायामप्रकारापैकी कोणत्याही व्यायामप्रकाराचे एक लक्ष्य ठरवायचे आणि १० व ११ डिसेंबरला ते पार करण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग..

आरोग्य विमा आणि बदललेली मेडिकल प्रॅक्टिस !

लेखक म्हया बिलंदर यांनी बुधवार, 30/11/2016 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
१) “अहो, हे बघा तुम्हाला अपेंडिक्स आहे आणि त्याच्या ओपरेशन चा खर्च अमुक अमुक होईल.” “सर, आमचा विमा आहे पण तो दीड वर्षापूर्वी उतरवलाय.” “नवीन असेल तर दोन वर्षे त्यात काही उपचार बसत नाहीत, तुम्ही एक करा ह्या गोळ्या घ्या , सहा महिने तुम्हाला काही होणार नाही, तोपर्यंत इन्शुरन्स ला देखील दोन वर्षे पूर्ण होतील मग करू ओपरेशन.” “चालेल.” --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- २) “सर, त्या अमुक अमुक पेशंट ला आज डिस्चार्ज दिला तरी चालेल, त्यांच्या डॉक्टरांनी देखील सांगितलय.” “त्यांना दोन एक दिवस अजून ठेवा, त्

गंडलेल्या फिटनेसची कहाणी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 09/11/2016 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग दुवा मिपावर सद्ध्या फिटणेसविषयक धाग्यांची लाट आलेली आहे. त्यात भर म्हणून हा धागा. खरं तर प्रतिसाद लिहायला घेतला, पण धागा झाला. लोकं व्यायाम, आहार, आराम यांची आपापली तर्कहीन त्रिसूत्री मांडताना बघितली की फार उद्विग्न व्हायला होतं. अर्थात फिटनेस, आरोग्य याला कुणी किती महत्व द्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि कुणी त्या गोष्टीला महत्व दिलं नाही तर त्यात माझं काही नुकसान नसतं, पण त्यांचं स्वतःचं नक्कीच असतं. फिट असायला हवं, असं सामान्यतः प्रत्येकाला वाटतं.

चिकुन्गुनिया सद्रुश नवीन विषाणुजन्य आजार

लेखक स्मिता श्रीपाद यांनी सोमवार, 10/10/2016 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही महिन्यांपासुन पुण्यात चिकुन्गुनिया सदृश एक नवीनच प्रकारचा विषाणुजन्य आजार पसरला आहे. माझ्या माहितीतल्या घरटी एकातरी व्यक्तीस हा आजार झालेला मी ऐकला/पाहिला. याची लक्शणे साधारण खालील प्रमाणे असतात : - थंडी वाजुन अतिशय तीव्र स्वरुपाचा ताप येणे ( १०२ ते १०४ ) - सांधे,स्नायु दुखणे - ताप उतरला की ३-४ दिवसांनी अंगावर रॅशेस येणे - क्वचित जुलाब्/उलटी असा त्रास ताप १-२ दिवसात कमी होतो.

होय , मधुमेह पूर्ण बरा होतो

लेखक विटेकर यांनी मंगळवार, 19/07/2016 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! २००६ साली, वयाच्या ३८ व्या वर्षी मला मधुमेहाचे निदान झाले! घरात परंपरा होतीच शिवाय स्थौल्य आणि बैठी जीवनशैली यामुळे हे अपेक्षित होते. फक्त फार लवकर ही ब्याद मागे लागली म्हणून किंचित वाईट वाट्ले. मूळात गोड खाण्याची आवड आणि व्यायामाचा आळस त्यामुळे साखर कमी जास्त होत राहीली ( कमी कधीच नव्हे , सतत जास्तच !) गेल्या ९ वर्षात अनेक चढ- उतार आले, तात्पुरता व्यायाम - पथ्य पाळले जाई, पुन्हा येरे माझ्या मागल्या ! यात नवीन काही नाही , बहुतेक मधुमेहींची हीच कहाणी असते.