#मिपाफिटनेस - मी आज केलेला व्यायाम - मार्च २०१७ - कॅलरी चॅलेंज


काहीच महिन्यांपुर्वी मी खरं तर "मी आज केलेला व्यायाम" ह्या धाग्यांकडे न फिरकणारी मेंबर होते. माझं आपलं बरं सुखात चाललं होतं. पण नेमकं ते "७ दिवसांचं चॅलेंज" आलं. यंदा हा धागा मी काढण्याचं कारण इतकंच, की एका गोडपदार्थनामधारी आयडीला "बघा, "ही" करु शकते, तर कुणीही करु शकतं!" हे दाखवुन द्यायचं आहे.. फारसं चूकही नाहीये ते =)) तर मंडळी अगदी एक महिन्या पुर्वी मी एक शुन्य व्यायाम करणारा काऊच पोटॅटो होते. आपण व्यायाम केला पाहिजे असं मला दर वेळेस हा धागा आलं की वाटायचं आणि १-२ दिवसात ते ही बारगळायचं. मोदकने मागच्या महिन्यात "ग्रुपसोबत ७ दिवस चॅलेंज" आणलं. अनंत काळा पर्यंत रोज व्यायाम करण्यापेक्षा "७ दिवस" हा आकडा मला सोप्पा वाटला. त्यातही सोबत अजुन २-४ जण असले की त्यांच्या नादाने आपणही करतोच काही ना काही. म्हणुन मग आम्ही मैत्रिणींनी आमचा लिंबुटिंबू हा ग्रुप स्थापन केला. ह्यातल्या सामान्य वाचक, सविता००१, स्रुजा, इशा अगदी नियमित व्यायाम करणार्या. ते ही डाएट सांभाळुन. मी त्यामानाने खरंच लिंबुटिंबु होते. पण फक्त "सातच" दिवस व्यायाम करायचाय म्हणुन मी पण सुरुवात केली. प्रामाणिकपणे सांगते, पहिल्या १० मिनिटातच मला "मरते की काय आता ट्रेडमिलवरच" अशी धाप लागायची. २० व्या मिनिटाला मी मोदकला खच्चुन शिव्या घालत असायचे. ३० व्याला ट्रेडमिलवर अक्षरशः अंग टाकलेले आणि पाय आपोआप त्या पट्ट्यावर फिरत आहेत अशी अवस्था. पण ते ५ किमी काही पटकन होताना दिसायचे नाहीत. मला तब्बल ५० मिनिटं लागायची ५ किमी करायला. जिममध्ये आजुबाजुला लोक सलग ३० मिनिटं "धावायचे". ग्रुपमधल्या पोरी ७-८ किमीच्या खाली बोलतच नव्हत्या. इथे मला ५ किमी चालायला जमत नव्हतं. सुरूवातीला दम लागणे, पायात गोळे येणे, पोटात दुखणे, नडगी दुखणे (shin splints) असे प्रकार व्हायचे. पण इथे चर्चा करुन लक्षात आलं की मी वॉर्मअप करतच नाहीये. शिवाय पहिल्या मिनिटापासूनच फुल्ल स्पीडने पळायला सुरुवात करतेय. मग दम लागला की वेग कमी करा, थोड्या वेळाने पुन्हा वाढवा असे खेळ करत बसतेय. इथल्या सूचना लक्षात घेऊन चालायला लागल्यावर लक्षात आलं की स्ट्रेचेस आणि वॉर्मअप करुन सुरूवात केली पायात गोळे येत नाहीत. वेग हळूहळू वाढवत नेला तर शरीरही त्या लयीत चालायला लागते. एकदा लय पकडली की कोणताही अतिरेकी त्रास न होता अगदी पळता सुद्धा येतं. श्वास टिकतो. आणि फुलला तरी नीट बोलता येईल इतपतच दम लागतो. ह्या व्यक्तिरिक्त काही गोष्टींनी अनपेक्षित बराच फायदा झाला. एक तर सावन वर गाणी ऐकणे. तिथे व्यायामासाठी आयत्या प्लेलिस्ट आहेत. जोरजोरात ढीचॅक गाणी लावली की आपोआप चालायला मजा येते. उगाच रडकी गाणी असतील तर एकूणच आयुष्यात काही राम नाही असंच वाटतं. तेव्हा ट्रेडमिलवर फक्त नाचायचं बाकी उरेल अशी गाणी वाजवा. दुसरं एक अॅप जे मला सामान्य वाचकने सुचवलं ते म्हणजे - C25k ह्या अॅपमध्ये तुम्ही अजिबात काहीही करत नाही असं समजुन तुम्हाला ५के साठी ट्रेन केले जाते. सोप्पे अॅप आहे. आठवड्यातले तीन दिवस तुम्ही त्यांनी दिलेल्या वेळापत्रकापमाणे चालणे+पळणे आवश्यक आहे. सुरूवात अगदी सोप्प्या टारगेट पासुन होते. ते ८-९ आठवड्यात तुम्ही ५ किमी पळु शकला इतपत तयारी करुन घेतली जाते. मला ह्याचा भरपुर फायदा होतोय. एक महिन्यापुर्वी मी चालत होते पण अजिबात पळता येत नव्हतं. आता मी ९० सेकंद सलग पळु शकतेय. परत २ मिनिटं चालुन परत ९० सेकंद पळणे असं ४० मिनिटं कोणतीही अतिरेकी धाप न लागता जमायला लागलेलं आहे. असा माझा हा व्यायाम अल्ट्रामॅन कौस्तुभ राडकर आणि मिलिंद सोमण ह्यांच्या चरणी समर्पित! सात दिवसांचं चॅलेंज रडत-पडत-उठत-बसत का होईना, पण केलं आहे. ह्या सात दिवसात कैकदा वाटलं की "जाऊ दे ना, काय फरक पडतो आज नाही गेलं तर. बाकीचे मिळुन करतील चॅलेंज पुर्ण." पण भारतात सकाळी सगळ्या ऑफिसला जायच्या आधी व्यायाम करुन जायच्या आणि व्हॉट्सअॅपवर अपडेटही यायचे. मग मात्र मी रात्री ८ ला सुद्धा जिममध्ये जाऊन ५ किमी पुर्ण करुन यायचेच. सात दिवसात ठरल्याप्रमाणे ३५ किमी पुर्ण केले. पण जित्याची खोड.. दोन दिवस आराम करु म्हणता म्हणता आठवडा परत घरात बसून काढला! पुन्हा एकदा "काही होत नाही एक दिवस नाही केला व्यायाम तर" ह्या फेजमध्ये जायला सुरूवात झाली. सातत्य काही ठेवता येईना. आणि जोवर ते नसेल तोवर व्यायामालाही काही अर्थ नाही. म्हणुनच ह्या महिन्यासाठी डॉ.श्रीहास ह्यांनी सुचवल्या प्रमाणे चॅलेंजचा पुढचा टप्पा घेऊन आलो आहोत. ह्या महिन्यात आपण ७ दिवसांचे ३ चॅलेंजस घेणार आहोत. ह्यात तुम्ही दोन चॅलेंजच्या मध्ये गॅप घेऊ शकता अथवा सलग २१ दिवसांचे चॅलेंजही घेऊ शकता. कोणतीही सवय लागायला २१ दिवस लागतात. तेव्हा सातत्य येणाच्या दृष्टीने कुणाला २१ दिवस सलग हे चॅलेंज घ्यायचे असेल तर जरूर घ्या! तर चॅलेंज असे की ३० मिनिटं कोणताही व्यायाम प्रकार करुन किमान २०० कॅलरीज जाळणे. सलग ७ दिवसांची ३ किंवा सलग २१ दिवसांचे एक चॅलेंज तुम्हाला घ्यायचे आहे. रोज किती वेळ व्यायाम केला आणि किती तीव्रतेचा केला ह्यावर बरेच काही अवलंबुन आहे. उत्तम आरोग्यासाठी रोज किमान ३० मिनिटं घाम फुटेपर्यंत चांगला व्यायाम करणे आवश्यक आहे. ह्या दृष्टीने कॅलरीजची अट घातलेली आहे. सर्वांच्या सोयीसाठी बहुतांशी केले जाणारे व्यायाम आणि त्यातून जळणार्या कॅलरीजचा अंदाज देत आहोत. तुमच्या वय आणि वजनाप्रमाणे हे आकडे बदलतील हे लक्षात घ्यावे. आंतरजालावरून तुम्ही तुमच्या व्यायामासाठी वय आणि वजनाप्रमाणे आकडे मिळवु शकता. आपल्याला अचुक कॅलरीजचा हिशोब मिळवायचा नसून, त्या तीव्रतेचा व्यायाम करायचा आहे. अंदाजे ६५-६८ किलोच्या माणसाने, ३० मिनिटांसाठी केलेल्या व्यायामाची ही आकडेवारी आहे. आंतरजालावरून साभार.
वजन उचलणे - २०० कॅलरी टेनिस - २३२ कॅलरी सायकलिंग (14 – 15.9 mph) - ३३१ कॅलरी पळणे (7.5mph) - ४०० कॅलरी चालणे (3.5 mph) - १३५ कॅलरी सूर्यनमस्कार - ४१७ कॅलरी (एक सून - १३.९ कॅ. एका मिनिटाला एक सून असा हिशोब आहे)तुम्ही करत असलेल्या व्यायामप्रकारात किती कॅलरीज जळाल्या ह्याचा असाच अंदाज तुम्ही लावु शकता आणि त्या हिशोबाने २०० कॅलरीज जाळण्याच्या दृष्टीने व्यायामाची तीव्रता ठरवु शकता. चला तर मग.. हे नवीन कॅलरीचे चॅलेंज घेऊन कॅलरी जाळूया..!! आपापला व्यायाम नोंदवण्यासाठी केलेली ही गूगल शीट
In reply to वाह वाह !! हे झकास झालं ! by स्रुजा
In reply to अच्छा.. डाएट बोंबललय असं by पिलीयन रायडर
In reply to मागच्या महिन्यात अनेकांनी by पिलीयन रायडर
In reply to Target complete by चष्मेबद्दूर
In reply to मागच्या फिटनेस विषयीच्या by सही रे सई
In reply to अभिनंदन.. प्रगती कळवत रहा. by मोदक
In reply to आजचे १६ सुर्यनमस्कार घातले by सही रे सई
In reply to स्विमिंग यात नसल्याने पास आणि by सूड
In reply to स्विमिंग यात नसल्याने पास आणि by सूड
In reply to बऱ्याच दिवसात व्यायामाला वेळ by प्रसन्न३००१
हा धागा काढल्यावर पिरा ताईंचे आभारकाढल्याबद्दल असे वाचावे :D
In reply to MET रेटिंग by गॅरी ट्रुमन
In reply to MyFitnessPal हे अँप्लिकेशन by प्रसन्न३००१
In reply to MET रेटिंग by गॅरी ट्रुमन
In reply to एक दुरुस्ती -- आपण जेंव्हा by सुबोध खरे
In reply to डॉक, एखादं सोप्पं गणीत सांगा by पिलीयन रायडर
In reply to पहिली गोष्ट म्हणजे आठवड्याला by सुबोध खरे
In reply to एक दुरुस्ती -- आपण जेंव्हा by सुबोध खरे
In reply to मी रोज व्यायाम करतेच आहे. by पिलीयन रायडर
In reply to तुमचा काय अंदाज आहे मॅडम? by मोदक
In reply to ३०-४० मिनिटं व्यायाम करुन by पिलीयन रायडर
In reply to मी रोज व्यायाम करतेच आहे. by पिलीयन रायडर
In reply to व्हाय आर यू जजिंग युअर फिटनेस by वेल्लाभट
In reply to हे ४८ तासांचं गणित माहिती by पिलीयन रायडर
In reply to व्हाय आर यू जजिंग युअर फिटनेस by वेल्लाभट
In reply to ४८ तासाच्या आत पुन्हा व्यायाम देऊ नका. by असा मी असामी
In reply to काहीच नाही म्हणजे त्याच by वेल्लाभट
In reply to व्हाय आर यू जजिंग युअर फिटनेस by वेल्लाभट
In reply to आज बायसेप्स केले, २० मि. by ५० फक्त

In reply to माफ करा जरा स्पष्ट लिहितोय , by माझीही शॅम्पेन
In reply to मीही काहीसा याच मताचा आहे. by वेल्लाभट
In reply to स्विमिंगने पोट कमी होत नाही, by सूड
In reply to स्विमिंगने पोट कमी होत नाही, by सूड
In reply to पण त्यांचं म्हणणं विचार by वेल्लाभट
तू कधी अंतर्वक्र पोट असलेला मासा बघितलायस?असाच विचार करायचा असेल तर अजून मी अंडी देणारा बाप्या देखील पाह्यला नाहीय. =))
In reply to तू कधी अंतर्वक्र पोट असलेला by सूड
In reply to पण त्यांचं म्हणणं विचार by वेल्लाभट
In reply to माशांची पोटं फुगीर असतात. by सुबोध खरे
In reply to जोक्क होता ओ डोक्टर by वेल्लाभट
In reply to मीही काहीसा याच मताचा आहे. by वेल्लाभट
In reply to 'चूजिंग द ईझी ऑप्शन' चं हे एक by अप्पा जोगळेकर
In reply to जाउंद्याना आप्पा by वेल्लाभट
In reply to तुम्ही काय व्यायाम केलात ते by अप्पा जोगळेकर
हे माझे मत फक्त माझ्या स्वतःपुरतेच लागू आहे. इतरांनी हवी तितकी जाहिरात करावी. काही आक्षेप नाही.हे कबूल केलंत बरं केलंत. नाहीतर उगाच. आणि तसंही हा धागा जाहिरातीसाठी नाही. त्यामुळे इथं कुणीच जाहिरात करायला, तुलना करायला व्यायामाचे आकडे टाकत नाही. तुम्हाला तसं वाटत असल्यास तुम्ही पत्ता चुकलायत. तुम्हाला फक्त तर्क, अंदाज, किंवा हा व्यायाम उत्तम की तो याचा कीस पाडण्या ऐवजी व्यायामाचे आकडे टाका असं सुचवलं तर लगेच वेगळा वास आला. असो. आणिक विषयांतर टाळतो. आगोदरच्याही प्रतिसादात लिहिलं, आताही लिहितो; तुम्हाला वाद घालायचाय हे उघड आहे. आणि मला त्यात रस नाही.
In reply to माफ करा जरा स्पष्ट लिहितोय , by माझीही शॅम्पेन
In reply to सध्या फिजिओचा सल्ला घेणे तर by पिलीयन रायडर
In reply to उत्तम. by वेल्लाभट
In reply to स्ट्रेंग्थ ट्रेनिंग मध्ये घरी by पिलीयन रायडर
In reply to लोअर बॉडी by वेल्लाभट
In reply to आज घरी नवर्याच्या by पिलीयन रायडर
In reply to पुश अप चं सोपं व्हर्जन by वेल्लाभट
In reply to स्ट्रेंग्थ ट्रेनिंग मध्ये घरी by पिलीयन रायडर
In reply to सिक्स पॅक अॅब्स शॉर्टकट by सूड
In reply to माफ करा जरा स्पष्ट लिहितोय , by माझीही शॅम्पेन
In reply to स्ट्रेचिंग आणि २५ नमस्कार घातले. by चतुरंग
In reply to सूर्यनमस्कार हा व्यायामाचा by सुबोध खरे
In reply to म्हणजे १ तास सूर्यनमस्कार by अप्पा जोगळेकर
In reply to म्हणजे १ तास सूर्यनमस्कार by अप्पा जोगळेकर
पण रोज फक्त सायकल चालवणे ऐवजी फक्त सुर्य्नमस्कार अधिक आरोग्यदायी असावे.हा फक्त शब्द जो आहे ना, तो डोक्यातून काढता आला तर बघा. फक्त... काहीच चांगलं नसतं. आणि हे चांगलं असेल, याने कॅलरी जास्त जळत (मला हा शब्दप्रयोग अजिबात आवडत नाही पण तुम्ही वापरलायत म्हणून तसाच परत करतो) असतील... या जर तर तर्कांपेक्षा वाचा या विषयावर. एक आपला सस्नेह सल्ला.
In reply to न राहवून सांगतो by वेल्लाभट
In reply to या जर तर तर्कांपेक्षा वाचा या by अप्पा जोगळेकर
In reply to न राहवून सांगतो by वेल्लाभट
In reply to राजकारण, समाजकारण याप्रमाणे by sagarpdy
In reply to स्ट्रेचिंग आणि २५ नमस्कार घातले. by चतुरंग
त्यांच्या रिसर्चनुसार स्नायूंची ताकद, शरीराची एकूण क्षमता आणि सर्वांग्सुंदर फिटनेस देण्याची क्षमता नमस्कारांमध्ये आहे!संशोधन शोधून काढल्याबद्दल आभार! ह्या संशोधनाचा हेतू उत्तम आहे आणि निष्कर्ष उत्कंठावर्धक आहेत. पण सरतेशेवटी हा उण्यापुऱ्या ७९ वैद्यकीय विद्यार्थ्यांवर केला गेलेला प्रयोग होता. त्यामुळे एकंदर लोकसंख्येकरता संशोधनाचे निष्कर्ष कितपत लागू पडतील ह्याचा विचार झाला पाहिजे. बाकी सूर्यनमस्कार हा एक चांगला आणि सुलभ व्यायाम आहे हे मात्र नक्की
In reply to गेले ३ दिवस व्यायामाला अजिबात by प्रसन्न३००१
वाह वाह !! हे झकास झालं !