Skip to main content

होय , मधुमेह पूर्ण बरा होतो

लेखक विटेकर यांनी मंगळवार, 19/07/2016 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! २००६ साली, वयाच्या ३८ व्या वर्षी मला मधुमेहाचे निदान झाले! घरात परंपरा होतीच शिवाय स्थौल्य आणि बैठी जीवनशैली यामुळे हे अपेक्षित होते. फक्त फार लवकर ही ब्याद मागे लागली म्हणून किंचित वाईट वाट्ले. मूळात गोड खाण्याची आवड आणि व्यायामाचा आळस त्यामुळे साखर कमी जास्त होत राहीली ( कमी कधीच नव्हे , सतत जास्तच !) गेल्या ९ वर्षात अनेक चढ- उतार आले, तात्पुरता व्यायाम - पथ्य पाळले जाई, पुन्हा येरे माझ्या मागल्या ! यात नवीन काही नाही , बहुतेक मधुमेहींची हीच कहाणी असते.