फर्जाना यादव ( लोकल गोष्टी-२)
फर्जाना यादव
===============================================
त्या दिवशी रोजच्या सारखीच मी ऑफिसला निघाले होते तसं फारसं काम नव्हत, शनिवार.. आणि सोनूच्या शाळेला दिवाळीची सुट्टी असल्याने घरीही सगळे जरा सैलावले होते.. त्यामुळे मलाही ऑफिसला जावेसे वाटत नव्हते.. ऑफिसला दांडी मारावी असा विचार सारखा सारखा मनात येत होता.. पण बहादूर (आमचा ड्रायव्हर) दारात येऊन उभा राहिला.. त्यामुळे मग मी ही आळम-टळम न करता गाडीत जाऊन बसले.
रोज सोनू आणि मी आमच्या गाडीने त्याच्या शाळेला जातो..आणि मग तिथूनच मी ऑफिसला जाते. आता सोनूचा शाळेला सुट्टी असल्यामुळे बहादूर माझ्या दिमतीला आहे..
मिसळपाव