Skip to main content

बुरा ना मानो दिवाली है!!

लेखक यकु यांनी शनिवार, 06/11/2010 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
उगाच आपापल्या नादात जगत असणार्‍या लोकांना, लहान-सहान लेकरांना भडडाम्म!!! असा आवाज करून दचकवणं वाईटच! भलेही मग तुम्ही लक्ष्मीपूजन करीत असाल की दिवाळीत फटाक्यात हजारो रूपये जाळून स्वत:चा माज दाखवत असाल. पर ये नहीं हो सकता मेरी जान! लोक जसं वागतात तसंच आपणही वागलं पाहिजे. पागल म्हणतील ना नाहीतर लोक. अख्खं शहर फटाक्यांच्या धुराने न्हाऊन निघत असताना इथे कुणाला शुध्द आहे? दिवाळी आहे ना.. बजाव फटाकाऽऽऽ अ‍ॅटम बॉम्ब लावा‌‍ऽऽऽ पाच-पाच हजारांच्या लडी लावाऽऽऽ लोकांच्या कानाच्या पडदे फुटले तर फुटले! सहा सव्वा सहाची वेळ. छाट्छूट फटाक्यांचे आवाज गल्लीत सुरू झाले होते. त्यांचा काही त्रास होत नाही.

लहानपणीच्या ३ गोष्टी

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 05/11/2010 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी मे महीन्याच्या सुट्टीत दुपारी एकमेकांना कोडी सांग, सागरगोटे खेळ, उखाणे घाल, विनोद सांग असे नाना खेळ आम्ही बिल्डींगच्या सावलीमध्ये जमून खेळत असू. कारण ऊन मी मी म्हणत असे त्यामुळे काहीतरी बैठे छंद जोपासावे लागत. काही बोलघेवडी मुलं-मुली गोष्टी सांगत. जरा चवथी, पाचवीमध्ये गेल्यावर विनोद वगैरे कळायला लागले होते. त्यापैकी एक विनोद मला आजही आठवतो. कारण पुढे येईलच. - एकदा चीन, अमेरीका आणि भारत हे देश बढाया मारत असतात. चीन सुरुवात करतो. चीन म्हणतो आमच्या कुशल तंत्रज्ञानाने आम्ही इतकी बारीक तार बनवली आहे की ती तार साध्या डोळ्यांना दिसतच नाही.

सिमरन...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 03/11/2010 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
दोनचार दिवसांपूर्वीच हा लेख टाकण्याविषयी आणि तिचा फोटू टाकण्याविषयी सिमरनची पूर्ण परवनगी घेतली आहे.

सूड

लेखक आदिजोशी यांनी बुधवार, 03/11/2010 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा आपले म्हणवणारेच आपला घात करतात, जिवाभावाचे मित्र पाठीत खंजीर खुपसतात आणि स्वतःची सावली उलटून वार करते, तेव्हा सुरू होते कथा एका सुडाची.
ह्या कथेचा नायक एक सरळमार्गी, मध्यमवर्गीय तरूण आहे. त्याचं आयुष्य मुंबईत गेलं. नोकरी निमित्त २ वर्ष घरापासून तो लांब राहिला. हा तरूण नुकताच लग्नाच्या गोड बंधनात अडकला आहे. आणि सगळ्या नवर्‍यांप्रमाणे न वागता त्याने स्वतःला गॄहस्थाश्रमात झोकून दिलं आहे. लग्नानंतर काही महिने नोकरीच्या गावी राहिल्यावर तो आपल्या घरी परत आला. आणि ह्या कथेला सुरूवात झाली.

चेरी टोमॅटोची पिशवी.

लेखक लतिका धुमाळे यांनी सोमवार, 01/11/2010 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
चेरी टोमॅटोची पिशवी ५- ६ वर्षांपूर्वी आम्ही जर्मनीत एक छोट्या गावात रहात होतो. आमच्या घरा समोरच एक छोटेसे सुपर मार्केट होते, तेथे रोज लागणारया गोष्टी, भाजी व फळे मिळत. त्या दुकानासमोरच एक १२- १३ वर्षांचा मुलगा चेरी टोमॅटोच्या अर्ध्या किलोच्या पिशव्या विकत होता. जरासा गबदुलच होता.जर्मन नव्हता, अतिपूर्वेकडिल कोणत्यातरी देशातील होता. उन्हाळा खूपच असल्याने घामाने थबथबत होता. हातातील बास्केटवर "चेरी टोमॅटो २ युरो पिशवी" असा बोर्ड लावून त्या विकायचा प्रयत्न करत होता. निदान ७-८ बायकांना तरी विचारून झाले, पण पदरी निराशाच येत होती. भाजीच्या दुकानासमोर टोमॅटो विकणारया त्या मुलाचे मला कौतुक वाटले.

अवचित....

लेखक स्वानंद मारुलकर यांनी शनिवार, 30/10/2010 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक ट्रेकमध्ये एक क्षण असा येतो की आपण सारे काही विसरतो, कोणतेही प्रश्न तेव्हा आठवत नाहीत, सुख-दु:ख सार्‍याचा विसर पडतो. तो एक क्षण जगण्यासाठीच तर ही ट्रेकची सारी धडपड असते. अवचित गडाच्या चढाईमध्ये तो क्षण इतक्या लौकर येईल असे मात्र वाटले नव्हते. अजूनही गर्द रानाने वेढलेला अवचितगड कोकणात रोह्याच्या जवळ आहे. पुण्याहून रोह्याला जायला ४ तास लागतात. तिथून पुढे पिंगळसई किंवा मेढा या गावी यावे. या दोनही गावातून पायवाट गडावर जाते. कोकण रेल्वे या गडाला अगदी बिलगून जाते. आम्ही पिंगळसईला साधारणपणे ११ वाजता पोचलो.

वेलकम टु द लाईफ..बार !! (प्राईस ऑफ सॅक्रिफाईस.)

लेखक सुहास.. यांनी शनिवार, 30/10/2010 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
कांऊटर वरच्या पोरांशी हाय-हॅलो झाल्यावर, माझ तिथल्या आडोश्याकडे लक्ष गेल, तिथ हे चित्र होतं. खरे तर या आडोश्याला मी बरीचशी चित्र पाहिली होती,पण एखाद्या लहान मुलाला ? श्या !!

बॉडी डबल

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 30/10/2010 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
बॉडी डबल हा शब्द पहिल्यांदा वाचनात आला तेव्हा माझ्यासारखे जे बोडीने डबल आहेत त्यांच्यासाठी हा शब्द वापरत असावेत असा माझा ग्रह झाला होता. मंदाकिनिचा कुठलातरी चित्रपट होता आणि मित्राने सांगितले बॉडी डबल आहे. मी असले चित्रपट का बघतो असे विचारु नका. असाही हा प्रश्न विचारायचा हक्क फक्त असले चित्रपट न बघितलेल्या लोकांना आहे. (हे अकबर बिरबलाची गोष्ट आहे ना की मोत्यांना हात लावायचा हक्क फक्त वारा न सरलेल्या माणसांना आहे त्या धर्तीवर वाचावे) अस्मादिक बराच काळ विचारात पडले होते की मंदाकिनी काही इतकी डबल नाही आहे.

फुल्ल टू दबंग

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 29/10/2010 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
काल मध्यान्ह मुहूर्तावर मी छानसे देवाला आणि स्वतःला वंदन केले. त्यानंतर 'हे कसे शक्य आहे? ' 'असे कधी असते का? ' असे नको ते प्रश्न विचारणारा मेंदूचा भाग काढून बाजूला ठेवाल. त्यानंतर छानसा उजव्या हाताला रुमाल गुंडाळला आणि शर्टाचे वरचे बटण उघडे टाकून मी रिक्षावाल्यांच्या ईस्टाइलने खुर्चीत स्थानापन्नं झालो.