Skip to main content

वेलकम टु लाईफ...बार !!

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 11/10/2010 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
हे जीवन सुंदर आहे असे कोणीतरी म्हणाले आहे,खरोखरच हे जीवन सुंदर आहे, आहे का ? अर्थात, त्या सौंदर्याच्या व्याख्या व्यक्तीगणीक बदलत असतात,कोणाला गाण्यांमध्ये सौंदर्य दिसते तर कोणाला, ज्या वयात, गर्लफ्रेंडला दुचाकीवर घेऊन फिरायचे,त्या वयात दर्‍या-खोर्‍यात,राना-वनात सौंदर्य दिसते तर कोणी तिच्या दुचाकीवरच्या ओझरत्या स्पर्शाला सौंदर्य म्हणतो.जीवनात येणार्‍या अनेक पैलुपैंकी,अनेक घटनापैंकी आपण ज्याच्याकडे नकळतपणे आकर्षित होतो त्यास सौंदर्य म्हणावे का ?

जाहिरातीरेक!!! (जाहिरातने व्यापून व्यापून थोड्याश्याच उरलेल्या उर्वरीत जगाची गोष्ट!)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 11/10/2010 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
(आजचे युग हे जाहिरातींचे युग आहे हे मान्य. पण जाहिरात करण्याला स्थळ, काळ, वेळ यांचे कसलेच बंधन उरले नाहीए. आजकाल जाहिराती अगदी कुठेही दिसतात. चित्रपटात, त्यातल्या गाण्यांत, वर्तमानपत्रात, बातम्यांच्या ब्रेक मध्ये, सिरियल्सच्या ब्रेकमध्ये, होर्डींग्ज वर, पुलांवर, भिंतींवर, रिक्षेवर, घरांवर, भींतींवरल्या घड्याळांमध्ये, टी शर्टांवर, लहान मुलांच्या चॅनेल्सवर, वाहनांवर, कॅलेंडरवर, मुलांच्या वह्या-पुस्तकांवर, कॅरी बॅग्जवर, बस स्टंण्ड्वर, एस. टी.

कॉर्पोरेट तमाशा १० : पहिली पार्टी

लेखक रन्गराव यांनी रविवार, 10/10/2010 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
गेले तीन महिने मी आर्किटेक्ट बरोबर काम करत होतो. बाकिच्या टिमचा काम आणि माझ काम आता रेल्वेच्या रूळासारखे समांतर चालले होते. सरांनी मला सांगितल होता -"Your code might not be part of the release now, but i'm sure it will be needed at some point of time." मी-" The convergence is going to be a nightmare. If they were to include my code at later point of time, they cant do it without affecting the design. " सर -" None the less continue your work." बनिया म्हणाला- " लगता है अपना प्रोडक्ट जल्दीही कोड कंप्लीट हो जायेगा.

पुस्तक परिक्षण : "पार्टनर" व.पु. काळे

लेखक सागर यांनी शनिवार, 09/10/2010 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
एवढ्यातच वपुं चे 'पार्टनर' सुन्न मनाने वाचून काढले. भन्नाट पुस्तक आहे. मी खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे माझ्या शालेय जीवनात वाचली होती. तेव्हाही 'पार्टनर' मस्त वाटली होती. पण त्यातील दाहकता जाणवली नव्हती. काही संदर्भ, अर्थ व भूमिका कळण्यासाठी लग्नाचा अनुभव गाठीशी (किंवा किमान तेवढी मॅच्युरिटी) असल्याशिवाय 'पार्टनर'मधील दाहकता जाणवणे शक्य नाही. पहिल्या ११ पानांतच मी 'पार्टनर' मध्ये गुरफटलो. कुठे मनसोक्त हसलो ... तर कुठे मनसोक्त रडलोही... होय खोटे कशाला सांगू? 'पार्टनर' वाचल्यामुळे असेल कदाचित पण त्यातील रोखठोक पार्टनर चे विचार जळजळीत असले तरी प्रामाणिकपणे पटले.

मी पाहीलेले मृत्यु

लेखक आप्पा यांनी शनिवार, 09/10/2010 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मा़झ्या आयुष्यातला एक प्रसंग. साधारणतः १९७७ किंवा ७८ ची घटना असावी. मी एका प्रथीतयश रुग्णालयात नोकरीला लागलो होतो. ठाण्यातील पहीलीच नोकरी. ऑपरेशन थियेअटरला मदतनिस होतो. एक रुग्ण ट्रेनमधुन पडला होता. पाय फ्रॅक्चर होता. त्याचे ऑपरेशन ठरले. अती विशाल देह. डॉ.नी त्याच्या कमरेत एक इंजक्शन देऊन त्याचा कमरेखालील भाग बधीर केला. पायाचे हाड जोडले. हाडामध्ये स्टील रॉड टाकला. ऑपरेशन पुर्ण झाले. पेशंट शुध्दीवरच होता. त्याचे पायावर प्लॅस्टर घालण्यास सुरवात झाली. डॉ.नी रुग्णाला सांगीतले तुझे ऑपरेशन यशस्वी झाले. रुग्ण डॉ.ना थँक यु. म्हणाला.

राजगड

लेखक केदार बर्वे यांनी शनिवार, 09/10/2010 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मि.पा.वरच्या सर्व मित्रानो आणि मैत्रिणिनो, नेहमी प्रमाणे शनिवारी सुटी होती आणी काय करायचे असा ? होता.