Skip to main content

आशियामधला सर्वात तरुण राजवाडा

लेखक पराग१२२६३ यांनी सोमवार, 31/07/2023 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
उमेद भवन स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर भारतीय उपखंडात उभारल्या गेलेल्या शेवटच्या काही राजवाड्यांपैकी जोधपूरचा उमेद भवन राजवाडा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सगळी संस्थानं भारतीय संघराज्यात विलीन झाल्यामुळं पुढच्या काळात भारतातच नाही, तर संपूर्ण उपखंडात नवीन राजवाडे उभारले गेले नाहीत.

पं वसंतराव देशपांडे

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 30/07/2023 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी वसंतराव मित्रहो यांनी एक सुंदर लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन.त्याला प्रतिसाद द्यावा म्हणून लिहीत असताना शब्द भरकटत गेले व खुप मोठा प्रतिसाद झाला. तसेही आज तीस जुलै, कलर्स वर दिवसभरात दोन वेळेस पं वसंतराव हा चित्रपट दाखवला गेला. इतरत्र सुद्धां पं वसंतराव यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या रसीकांनी कार्यक्रम केले असतील. वाटले वेगळा धागा डकवावा. पं वसंतराव यांना जवळून बघण्याचा,बोलण्याचा योग आला होता. काही मखमली आठवणीं पैकी एक.

माझाही एक भयानक अनुभव

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 29/07/2023 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
या आठवड्यात मला एक जरा वेगळा आणि भनायक अनुभव आला अहमदाबाद मधे दोन तीन दिवसांच्या कामासाठी गेलो होतो. ऑफिसने हॉटेल बुक केले होते. पण जी रूम मिळाली त्या रूमला एकही खिडकी नव्हती. रूम वातानुकूलीत असल्याने खिडकी नसल्यामुळे काही फरक पडणार नव्हता म्हणून घेतली. सकाळी बाथरूम मधे गेलो. बाथरूमला ही अर्थातच खिडकी नव्हती, व्हेंटीलेशन साठी छतावर एक एक्झॉस्ट फॅन होता. अंघोळ करून बाथरून मधून बाहेर जाण्यासाठी दार उघडायला गेलो तर लक्ष्यात आले की दाराचे लॅच लॉक झाले आहे. आणि दार उघडता येत नाहिय्ये. दाराला हँडल ऐवजी एक गोल नॉब होता त्यावरच लॅच उघडण्यासाठी एक बटन होते.

पीएनामा: झाडाची फांदी आणि एसीआर

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 29/07/2023 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
(पीएनामा: केंद्र सरकारच्या सीएसएसएस केडर मध्ये ग्रुप सी पासून ते ग्रुप ए पर्यन्त प्रवासच्या दरम्यान अनेक वरिष्ठ आयएएस, आयपीएस इत्यादींच्या दरबारात कार्य करताना मला आणि माझ्या बांधवांना आलेले अनुभव, ऐकलेले किस्से आणि थोडी कल्पना, पीएनामाच्या रूपाने सादरीकरण करण्याचा प्रयत्न) किस्से सांगण्यासाठी काही टोपण नावे मी अर्थात पटाईत, सुनील, सुशील आणि श्याम सुंदर ही ठेवली आहे) (ऐकलेल्या किस्याचा आधारावर काल्पनिक कथा) . त्यावेळी सीएसएसएस केडरमध्ये प्रमोशन दुर्मिळ होते. प्रमोशनसाठी १५ ते २० वर्ष वाट पाहत लागायची.

९८ धावांची दमदार खेळी: नांदेडचे आजोबा

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 27/07/2023 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार. कधी कधी एखाद्या कार्यक्रमाला वक्ता म्हणून एखाद्याला बोलावलं जातं. त्याचं भाषण झाल्यानंतर लोकांना प्रश्न पडतो की तो माणूस कोण ज्याने ह्या वक्त्याला बोलावलं! काहीसं तसंच पण वेगळ्या अर्थाने. माझे नांदेडचे आजोबा- श्री. गजानन महादेव फाटक ह्यांचं जगणं बघताना हाच प्रश्न मनात येतो आणि आश्चर्य वाटत राहतं की- बनानेवाले ने क्या खूब बनाया है! अतिशय वेगळं आणि काहीसं दुर्मिळ जगणं ते जगले. कधी कधी ९८ धावांवर एखादी इनिंग थांबते कारण वेळच संपून जातो. फलंदाज नाबादच राहतो. तसं त्यांचं जगणं आहे असं मनात येतं.

एकटा जीव सदाशिव

लेखक निओ यांनी बुधवार, 12/07/2023 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
अनोळखी शहरात 'एकट्याने' वास्त्यव्य करणं पण कधी कधी सुखाचं असतं. अट एकच खिसा भरलेला हवा. खर्च केलाच पाहिजे असं बंधन नाही पण चिंता नसावी. मग मन मारायची गरज उरत नाही. मन मानेल तसं निश्चिन्तपणे भटकवता येतं. मनाचा व्यायाम हा वेगळा न झेपणारा गहन विषय, आतातरी नको. तर अनोळखी शहरात 'एकट्याने' आल्यावर life कसं शांत होतं. सुपरफ़ास्ट चालणारी गाडी एकदम पॅसेंजर होते. सुट्टीचा दिवस तर रेंगाळत रेंगाळत निघून जातो. धावपळीत अडकलेल्या जीवाला उसंत मिळते. वेळ कसा Invest करावा याचा Sense असलेल्या एखाद्याला तर पर्वणीच वाटावी. काय छंद जोपासायचे ते जोपासा. कोणाचाच अडथळा नाही.

फिटनेस सोपी गोष्ट आहे

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 11/07/2023 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
फिटनेस ५० आणि फिटनेस १०० कुटुंबासोबत व जवळच्यांसोबत फिटनेसचा आनंद घेण्याचा उपक्रम सर्वांना नमस्कार. सर्व जण पावसाळ्यात येणा-या परिस्थितीमध्ये सुरक्षित असतील अशी आशा करतो. फिट राहणं किती सोपं आणि जमण्यासारखं आहे, ह्याबद्दल माझे अनुभव शेअर करत आहे. अनेक वर्षांपासून सायकलिंग, रनिंग, ट्रेकिंग आणि योग असे वेगवेगळे व्यायाम करत गेल्यामुळे आणि त्याला जोडून जीवनशैलीमध्ये बदल केल्यामुळे फिटनेसची आवड होत गेली आणि त्यातल्या गोष्टी कळत गेल्या. व्यायामासाठी वेळ काढणं किंवा फिट राहणं हे जितकं समजलं जातं तितकं अजिबात अवघड नाही हे लक्षात आलं.

लग्न झाले नी अंकल झालो

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 09/07/2023 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात लग्नाला 37 वर्ष पूर्ण झाले. केस पांढरे झाले असले तरीही मी स्मार्ट दिसतो, किमान मला तरी असे वाटते. एक जुना किस्सा आठवला. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यावेळी मी कृषी भवन मध्ये कार्यरत होतो. इमारतीतील एका छोट्या हॉलमध्ये माझ्यासोबत ६ स्टेनो त्यात ४ कन्या होत्या. दोन तर माझ्याच समवयस्क. दोघींचे लग्न झालेले होते. त्यातली एक अजूनही गुलाबाची कळी होती पण दुसरीचे गोबीच्या फुलात रूपांतरण झाले होते. सर्वच पुरूषांना बायकांचे बोलणे कान टवकारून ऐकण्यात एक आसुरी आनंद मिळतोच. दिवस मस्त जात होते.

आपण कल्पना करू शकत नाही अशी Kalpana Chawla story!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 05/07/2023 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
आपण कल्पना करू शकत नाही अशी Kalpana Chawla story! भारतातील पहिली माध्यमिक शाळा स्तरावरील अंतराळ तंत्रज्ञान एकेडमी सर्वांना नमस्कार. काही दिवसांपूर्वी कल्पना चावला स्पेस एकेडमी, एडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल, लोणावळा येथे एका कार्यशाळेमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळाली. तिथला अभ्यासक्रम आखण्यामध्येही सहभाग घेता आला. विज्ञान, शिक्षण, संशोधन अशा क्षेत्रातील दिग्गजांना ऐकण्याचा व त्यांच्यासोबत संवाद करण्याचा अनुभव मिळाला. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. कल्पना चावलाबद्दल फार माहित नसलेल्या अनेक विशेष गोष्टी कळाल्या.

मार्गदर्शन हवं आहे - वेब पेज डिझाईन

लेखक राघव यांनी शुक्रवार, 30/06/2023 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
Html पेज डिझाईन ड्रॅग आणि ड्रॉप पद्धतीने करता येतात का? ते चालवण्याचे लॉजिक नंतर php सारख्या लैंग्वेज मध्ये करेन.. पण लवकर डिझाईन तयार करण्यासाठी काही उपाय आहे काय?