Skip to main content

फुस्स...

लेखक आतिवास यांनी रविवार, 12/05/2013 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
दत्तुमामा आलेत. म्हंजे आमच्या आत्याचा नवरा. आमच्या तीन आत्या. एक पुन्याची. हे तिचे नवरे. दुसरी तिकडं फालटन का काय तिकडं. तिसरी मेली. कधी? म्हायती न्हाई. म्या तिला बघिटलीचं न्हवं. दत्तुमामा खाऊ आन्तेत. म्याबी तांब्या भरूण पानी देते त्यास्नी पेयाला. आय चा करत व्हती. म्या येकलीच व्हती त्यांच्यासंग बोलाया. दत्तुमामा म्हन्ले, “कितवीला तू आता?” दर बारीला हेच विचारतेत. दिवाळीला आलते, तवा मी पयलीत व्हते. आताशिक सकरात आली जवळ. मंग आताबी पयलीतच –हाणार की! म्या दामटून म्हन्ली, “तिसरीला” दत्तुमामा म्हनले, “वा! छान, अभ्यास कर हं, मोठी हो”. येकदम फुस्स ! हे आयकत न्हाईत कायी.

जुने ते सोने..

लेखक सचिन कुलकर्णी यांनी शनिवार, 11/05/2013 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
आताच्या माझ्या आजारपणात १ उपाय बाकी नामी सापडला किंवा जुना उपाय नामी आहे हे सिद्ध झाले म्हणूयात. तो असा कि अंगात ज्वर असेल तर आणि paracetamol /antibiotic ने पण फरक पडत नसेल तर कांद्याचा रस हातापायाला/अंगाला चोळावा. यात ताप वेगवेगळ्या पद्धतीने उतरू शकतो. ५ दिवसांपूर्वी माझे अंग रस चोळल्या वर १० मिनटात थंड पडले आणि रात्री तर थंडी वाजली. काल मात्र पाय अजून गरम झाले आणि नंतर थंड.(अंतिम परिणाम-ताप उतरला).५ दिवसात फक्त दोनदा हा उपाय केला. रोज नाही. बरेचदा अंगात आपल्याला चांगलाच ताप वाटतो पण thermometer मध्ये तो दिसत नाही , अश्या वेळेस हा खंग्री उपाय आहे.

अंड्याचे फंडे ७ - खादाडी

लेखक साळसकर यांनी मंगळवार, 07/05/2013 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
नाक्यावरच्या भटकंतीची ठरलेली वेळ, संध्याकाळच्याच आसपासची. तोच रस्ता, तीच दुकाने, आजूबाजुला भटकणारी तीच ती माणसं. पण आज संध्याकाळी मात्र एका मुलीला पाणीपुरी खाताना बघत होतो. तुम्ही तर रोजच बघत असाल नाही, पण राव ऐका तर पुढे. भैय्याने पाणीपुरी वाटपासाठी एक प्लेट तिच्या हातात धरताच तिने त्याच्याकडून एक चमचा मागून घेतला. आता त्या पाणीपुरीच्या गाडी कम स्टॉलवर "विठ्ठल शिंदे पाणीपुरीवाला, आमची कुठेही शाखा नाही" असे शुद्ध मराठीत लिहिले असले तरी विठठल भाऊंनी पाणीपुरीवाटप करायला हाताखाली एक भैय्याच ठेवला होता. कारण आपल्याकडे भैय्याचा हात लागल्याशिवाय पाणीपुरीतला खारटपणा जाणवत नाही ना..

झुळुक

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 05/05/2013 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिना. डोक्यावर आग ओकणारा सुर्य. रणरणते उन आणि दमट हवा. मुंबई मधला उन्हाळा म्हणजे, प्रचंड घाम आणि चिकचीकाट. तशात लोकलच्या सेकंड क्लास मधुन प्रवास करायची मजबुरी. म्हणजे फस्ट क्लास काही फार सुसह्य असतो असे नाही, फक्त तिकडे सेंट मिश्रीत घामाचा दर्प येतो आणि लोक रुमाला ऐवजी टायने घाम पुसत असतात. बसायला जागा मिळाली नाहीच. तसाच लटकत उभा राहिलो. दोन बाकांच्या मधल्या ओळीत. एका बारला जीवाच्या आकांताने घट्ट पकडून. आजूबाजूचे प्रवासी अगदी खेटून उभे होते. त्यांच्या चिकट अंगाचा स्पर्श नको नको झाला होता. त्यातच प्रत्येक दिशेने घामाचा वेगवेगळा वास येत होता.

हो, मीच ती... एक सिगारेट पिणारी मुलगी..!

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 04/05/2013 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
----------------------------------------------------------------------------- एक सिगारेट पिणारी मुलगी - http://misalpav.com/node/24641 ----------------------------------------------------------------------------- हो, मीच ती... एक सिगारेट पिणारी मुलगी..! आज तो दिसला, तब्बल तीन साडेतीन वर्षांनी .. ट्रेनमध्ये बसला होता.. एका मुलीबरोबर... मुलगी.?? अंह, गळ्यात लायसन झुलत होते तिच्या. सौभाग्याच्या ईतर ही सतरा खुणा, त्याची ताई किंवा वहिनी तर नसावी.. छे.. मग असे खेटून बसले नसते, ते ही ट्रेन बर्‍यापैकी खाली असताना.

लहानपण देगा देवा....

लेखक किसन शिंदे यांनी शुक्रवार, 03/05/2013 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
बालपणीचा काळ सुखाचा असं म्हणतात ते अगदीच काही खोटं नाही. आणि या काळात सर्वात जास्त सुख मिळतं ते मे महिन्यातल्या किंवा दिवाळीतल्या सुट्टीत गावी गेल्यावर! त्यातल्या त्यात दिवाळीपेक्षा मे महिन्यात मिळणारी लांबलचक सुट्टी मिळाली म्हणजे आनंदाला उधान यायचं फार!! याचं कारण म्हणजे बहुतेक सगळी नातेवाईक मंडळी त्यांच्या कच्च्याबच्च्यांसह या काळात गावी आवर्जून यायची. वार्षिक परीक्षा संपलेली असायची आणि डोक्यावरचं एक मोठ्ठं ओझं आणि मनावचं एक अनामिक दडपण शतपटीने उतरलेलं असायचं.

ओ सजना बरखा बहार आणि एक कुंद दुपार..! :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 02/05/2013 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
तिचं नांव..? ते जाऊ दे...!. ती वर्गात होती माझ्या. वाणिज्य शाखा तृतीय वर्ष.. आमची वयं असतील विशीच्या घरातली.. वय वर्ष १९-२०..! सालं काय वर्णन करावं त्या वयातल्या तारुण्याचं..? शब्दशः: मंतरलेली वर्ष..! त्या वयात कुठल्या जादुई दुनियेत मन वावरत असतं काय समजत नाय बा.. अशातच ती आली माझ्या त्या स्वप्नांच्या दुनियेत.. स्वप्नांचं त्या वयातलं ते बेधुंद राज्य अन मी त्याचा अभिषिक्त सम्राट..! पण त्या राज्याच्या राणीचं सिंहासन मोकळंच होतं.. वर्गातल्या वर्गात आमच्या नजरा जुळल्या.. 'दिल में कुछ कुछ होता है..

टकल्या बापटाचा संताप, मी आणि अण्णा...! :) -- २ (अंतिम भाग)

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 01/05/2013 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
येथेल ब-याच मंडळींच्या आग्रहाला मान देऊन टकल्या बापटाचा दुसरा आणि अंतिम भाग येथे देत आहे.. भीमसेनजी, बाबूजी, मधुबाला इत्यादी..ही माझी श्रद्धास्थानं आहेत. त्यांच्याविषयी लिहायला मल आवडतं. ज्यांना या विषयांचा तिटकारा आहे त्यांनी खालील लेख नाही वाचला तरी चालेल. त्यांच्या व्यक्तिगत आवडीनिवडींचा मी आदर करतो..धन्यवाद.. तसेच या लेखनाचे कुणी छानसे विडंबन केल्यास त्याचे स्वागतच आहे.. - ; ) या पूर्वी- टकल्या बापटाचा संताप, मी आणि अण्णा...! :) -- १ >>......आता पुढची पायरी होती ती रंगमंचावर ब्यॅकष्टेज प्रवेश मिळवण्याची.

सबलीकरण

लेखक आतिवास यांनी सोमवार, 29/04/2013 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुष माणसं मीटिंगमध्ये हजर असताना त्या खुर्चीत बसू शकत नाहीत, मी मात्र बसू शकते. मी महागडे कपडे वापरू शकते, त्या नाही वापरु शकत. मी चारचाकीने प्रवास करू शकते, त्या कधीच चारचाकीत बसलेल्या नाहीत. मी डिजीटल कॅमे-याने फोटो काढू शकते, त्यांनी कधीच फोटो काढलेला नाही. मी वेगवेगळ्या राज्यांत प्रवास करते, त्यांच्यापैकी अनेकींनी शेजारचा तालुकाही पाहिलेला नाही. माझ्याकडे मोबाईल फोन आहे, त्यांच्याकडे तो नाही. मी वाचू शकते,लिहू शकते – त्या शाळेत गेलेल्या नाहीत. मी माझ्या इच्छेने मला हवे तेव्हा आणि मला पाहिजे तितके पैसे खर्च करू शकते; त्यांना अशी चैन करता येत नाही. मी इंग्रजी बोलते, त्या बोलायचे तर लांबच,

एक सिगारेट पिणारी मुलगी

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 28/04/2013 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज ती दिसली.. जवळपास तीन-साडेतीन वर्षांनी.. ट्रेनमध्ये, जरा दूरच्याच सीटवर बसलेली.. मला ती दिसत होती, म्हणजे ती देखील मला बघू शकत असणार.. बस्स, अजून तिचे लक्ष गेले नव्हते माझ्याकडे.. पण गेले तरी ओळखेल का..? का, नाही ओळखणार..? मी नाही का ओळखले तिला..? तसा फारसा बदल ही झाला नव्हता तिच्यात.. माझ्यात तरी कुठे फारसा झाला होता.. बस्स, बर्‍याच काही घडामोडी घडल्या होत्या आयुष्यात.. या गेल्या तीन-साडेतीन वर्षांत.. वाशीवरून वी.टी.ला जाणारी ट्रेन पकडली. बायकोबरोबर तिच्या माहेरहून परतत होतो. रविवारची संध्याकाळ अन फर्स्टक्लासचा डब्बा. गर्दी नेहमीपेक्षा तशी कमीच.