जडण-घडण १८
दारावरची बेल वाजली आणि मी विचारांच्या, आठवणींच्या तंद्रीमधून बाहेर आले, वास्तवात आले. फेरफटका मारायला गेलेले आई-बाबा घरी परतले होते. मी पुन्हा माझ्या कामात गढून गेले. आता सध्या आकाशवाणी आणि शुभेच्छापत्रांसाठी फ्री लान्सींग असं काम सुरू होतं. माझीही भटकंती, अवांतर वाचन आणि अर्थात वर्तमानपत्र वाचन नियमीत सुरू होतं. एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेची जाहिरात वाचली. खरं तर अध्यापन पेशा सोडून साधारण तीन वर्षं उलटून गेली होती, तरीही प्रयत्न करून बघावा का, असं मनात आलं. मग म्हटलं, करूयाच प्रयत्न.
घरी फारशी कल्पना न देताच शाळेत पोहोचले. शाळा मालाडमध्ये. चर्चशी जोडलेली. आधी लेसन झाला.
मिसळपाव