मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहिती

ग्लोबल कॉंग्रेस ऑन इंटेलेक्च्युअल प्रोपर्टी अँड पब्लिक इंटरेस्ट

माहितगार ·
१५-१७ डिसेंबर २०१५, नेशनल लॉ युनिवर्सिटी, नवी दिल्ली येथे होणाऱ्या [http://global-congress.org/ ग्लोबल कॉंग्रेस ऑन इंटेलेक्च्युअल प्रोपर्टी अँड पब्लिक इंटरेस्टसाठी] मराठी विकिपीडियावर आमंत्रण संदेश आला आहे.

मोसाद

महासंग्राम ·
आपण बर्याचदा MI६ अथवा जेम्स बॉंड बद्दल बऱ्याचदा वाचतो, ऐकतो पण मोसाद विषयी माहिती काहीच माहिती नाही ऑपरेशन रेड फाल्कन अथवा मोसाद विषयी मराठीत काही माहिती आहे का ? अशी माहिती असल्यास वाचनास अधिक मजा येईल त्या अनुषंगाने हा धागा निर्माण केला आहे.

आंतरजाल : काय लिहावे काय लिहू नये...

डॉ सुहास म्हात्रे ·
सद्याच्या आंतरजालक्रांतीच्या आणि व्यक्तीस्वातंत्र्याच्या जगात सामजिक माध्यमांनी सर्वसामान्य माणसांला सार्वजनिक स्तरावर व्यक्त होण्यासाठी एक फार मोठी संधी दिली आहे. ही संधी एक दुधारी धार असलेले शस्त्र आहे हे विसरून चालणार नाही. आंतरजालावरच्या मिसळपावसारख्या मुक्त संस्थळांवर वापरलेल्या व्यक्तीगत गैर टिप्पणींमुळे किंवा एखाद्या व्यक्तीच्या / समाजगटाच्या श्रद्धास्थानावर केलेल्या गैर टिप्पणींमुळे ही संधी नकळत कायदेशीर अपराधामध्ये परावर्तीत होवू शकते. त्यामुळे लेख आणि प्रतिसाद लिहीणार्‍या सर्व लेखकांनी ही संधी जबाबदारीने वापरण्याची जरूरी आहे याबाबत दुमत नाही.

मॅगी नूडल्सः कसं असेल कमबॅक..? डोकं लढवा

संदीप डांगे ·
नमस्कार मंडळी, नेहमीच्या काथ्याकूटांच्या लढायांतून वेळ काढूया (हे मी स्वतःला बजावतोय, गैरसमज नको ;-) ). आणि काहीतरी धमाल आणि डोकेबाज करण्याचा प्रयत्न करूया. मॅगीवरील बंदी माननीय न्यायालयाने उठवली आहे. खटला अजून संपला नाही पण आतापर्यंत उपलब्ध बातमी नुसार मॅगी परत विक्रीस येणार आहे असं खात्रीलायक वाटत आहे. ह्या सगळ्या परिस्थितीत जाहिरात जगतात एक कुतूहल लागून राहलंय की मॅगीचं पुनरागमन नक्की कसं असेल? काय करतील नेस्ले आणि त्यांचे ब्रँड मॅनेजर? नुसता जाहिरातींचा मारा करून प्रश्न सुटणार नाही. त्यांना काहीतरी ठोस आणि मौल्यवान असा संदेश द्यायला लागेल.