हे मला माहित नव्हते!! आपणास??
गेल्या आठवड्यात माझं बँक ऑफ बडोदाचे एटीएम कार्ड हरवले. माझ्या लक्षात येताक्षणी मी ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून तात्काळ ब्लॉक केलं आणि नवीन एटीएम कार्डसाठी साठी नोंदणीसुद्धा केली.
छोटासा व्यवसाय असूनही माझे सगळे कलाईन्ट कॅशलेस व्यवहार करतात. मलाही सोपं वाटत ते. पण स्वॅप मारायला कार्डच नसेल तर लोचा झाला. नवीन कार्ड यायला पंधरा दिवस लागणार हे माहीतच होतं.
तर माझी पंधरा दिवसांसाठीची फरफट सुरु झाली. महिनाअखेर असल्याने येणारे पैसे मागत सुटलो. ते बँकेत जमाही होत गेले. पण काढणार कसे? एक युक्ती सुचली कि मित्राच्या अकॉउंटला टाकून त्याच्याकडून घ्यावे. एकदा केलंही.
मिसळपाव