मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहिती

हे मला माहित नव्हते!! आपणास??

फुटूवाला ·
गेल्या आठवड्यात माझं बँक ऑफ बडोदाचे एटीएम कार्ड हरवले. माझ्या लक्षात येताक्षणी मी ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून तात्काळ ब्लॉक केलं आणि नवीन एटीएम कार्डसाठी साठी नोंदणीसुद्धा केली. छोटासा व्यवसाय असूनही माझे सगळे कलाईन्ट कॅशलेस व्यवहार करतात. मलाही सोपं वाटत ते. पण स्वॅप मारायला कार्डच नसेल तर लोचा झाला. नवीन कार्ड यायला पंधरा दिवस लागणार हे माहीतच होतं. तर माझी पंधरा दिवसांसाठीची फरफट सुरु झाली. महिनाअखेर असल्याने येणारे पैसे मागत सुटलो. ते बँकेत जमाही होत गेले. पण काढणार कसे? एक युक्ती सुचली कि मित्राच्या अकॉउंटला टाकून त्याच्याकडून घ्यावे. एकदा केलंही.

नोकरी मिळवताना १ ) जॉब कन्सल्टन्ट

रानरेडा ·
नोकरी संबंधी क्षेत्रात नोकरी केल्यामुळे अनेकांनी नोकरी मिळवण्यासाठी काय काय करावे लागते हे मला अनेक लोकांनी विचारले . स्वत: वर हि नोकरी शोधायचा प्रसंग अनेकदा आल्याने अजून भरपूर अनुभव हि होताच. अगदी चांगल्या संस्थेत शिक्षण झाले तरी नोकरी कशी शोधावी हे कोठेच शिकवले जात नाही. त्यामुळे अनेक गोष्टी चुकत माकतच शिकाव्या लागल्या. त्या साठी काही लेखांची मालिका लिहिण्याचा विचार आहे . ( या लेखा मध्ये अस्थानी लेखक - हेमंत वाघे असे येईल - हा माझा वॉटरमार्क असेल.

कृत्रिम पाउस कसा पाडतात ?

शरद ·
कृत्रिम पाउस (१) पाउस का पडतो ? सूर्याच्या उन्हाने पाण्याची वाफ होऊन ती आकाशात वर जाते. तेथे ती गार होते व वाफेचे रुपांतर परत पाण्यात होते व पाउस पडतो. ही माहिती शाळेत मिळालेली असते. यात थोडी भर घालावयास पाहिजे. (२) वाफ गार झाली तरी पाण्यात रुपांतर होतांना न्युक्लिएशनची गरज असते. प्रथम वाफेच्या एका अतिशय छोट्या भागाचे पाण्याच्या एका फार छोट्या थेंबात रुपांतर होते. मग त्या भोवती इतर पाणी गोळा होते व तो थेंब मॊठा होतो. हा मोठा थेंब हवेहून जड झाला की तो खाली घसरू लागतो. असे अनेक मोठे थेंब खाली पडू लागले म्हणजे पाउस पडतो. (३) म्हणजे दोन गोष्टींची गरज आहे. (१) न्युक्लिएशन व (२) थंड तापमान.

परदेशात पदवीचे शिक्षण घ्यावे काय?

खेडूत ·
दहावी बारावीत चमकायचे किंवा बरे गुण मिळवायचे , भारतात इंजिनियरिंग करायचे आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी म्हणून परदेशी जायचं ते न परतण्यासाठीच ! असा सर्वसाधारण प्रवास दोन पिढ्यानी केल्यावर आता कल बदलतोय की काय असं वाटतंय. पदवीलाच परदेशी जाणारे चारपाच जण पाहिले अन बरेच तसा विचार करताहेत. माझा एक शाळूमित्र व्यावसायिक असल्याने तिकडे गावाकडेच रहातो. गेल्या महिन्यात तो विचारत होता की मुलाला बारावीनंतर पदवीसाठी कुठल्यातरी (!) देशात पाठवायचंय, ही कल्पना कशी आहे सांग ?

अॅबाकस (सोरोबन) शिका, स्मरणशक्ती वाढवा !! (भाग २)

राजकुमार१२३४५६ ·

अॅबाकस (जपानी भाषेत सोरोबन)

मागच्या भागात जाण्यासाठी ...... ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- मागच्या भागात आपण संख्या कश्या रीतीने मांडल्या ते आपण पाहिले. आता या भागात सोरोबन वापरून बेरीज कशी करायची ते शिकणार आहोत.

अॅबाकस (सोरोबन) शिका, स्मरणशक्ती वाढवा !! (भाग १)

राजकुमार१२३४५६ ·

अॅबाकस (जपानी भाषेत सोरोबन)

अॅबाकस ला मराठी मध्ये "सरकणार्या मण्यांच्या दांड्या असलेली आणि मोजण्यासाठी किंवा आकडेमोडीसाठी वापरण्यात येणारी चौकट" असे म्हणतात. पूर्वीच्या काळी आकडेमोड करण्यासाठी आजच्या सारखे इलेक्ट्रोनिक कॅल्कूलेटर नव्हते. मग एखाद्या धातूच्या किंवा लाकडाच्या चौकटीमध्ये आडवे उभे मणी लावून आकडे मोड केली जायची. याच उपकरणाला अॅबाकस म्हणतात. प्रत्येक देश्या प्रमाणे त्या अॅबाकस ला वेगवेगळी नावे आहेत आणि अॅबाकस वापरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पण आहेत.

आय बी/ रॉ/ मिलिटरी इन्ट्लिजन्स

बाबा पाटील ·
आज पर्यंत मिपावर अनेक परदेशी गुप्तहेर खात्याबांबत (मोसाद/केजिबी/)बाबत अत्यंत माहितीपुर्ण लेख/कथानक आली आहेत्,परंतु भारतीय हेरखात्याबाबत मात्र फारशी माहिती येत नाही,तरी बोका-ए-आझम,स्पार्टाकस्, सोन्याबाप्पु/खरे सर यांना विनंती की आपल्या हेरखात्याबाबतही काही लेख मिपाकरांसाठी येउ द्यात.

महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र (+मराठी ओसीआरचे यश)

माहितगार ·
गोपाळ गणेश आगरकरांच्या लेखसंग्रहाच्या निमीत्ताने मराठी ओसीआर वापरुन युनिकोडीकरणात बर्‍यापैकी यश आले, याची बातमी (प्रुफ रिडींग साहाय्याची अद्याप गरज असूनही) त्यांचे महाराष्ट्रीयांस अनावृत्त पत्र उधृत करुन देतो आहे.

सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग ३

तुषार काळभोर ·
सदाहरित धागा - मनातले प्रश्न..शंका..जिज्ञासा..सल्ला, माहिती- भाग २ १०० प्रतिसाद झाल्याने (व सध्या संमं हायबरनेट झाल्याने,) मीच तिसरा भाग सुरू करतोय. जानेवारीच्या ८-१० तारखेला महाबळेश्वरला जायचे नियोजन आहे. (प्रेरणा: चौदहवी कि रात). मागच्या वेळी प्रतापगड रस्त्यावर मधुसागरच्या मागे असलेल्या ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये राहिलो होतो. लोकेशन चांगलं आहे.