Skip to main content

वाहन खरेदी करतांना

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 31/07/2017 या दिवशी प्रकाशित केले.
वाहन खरेदी करतांना जनरली १ एक्स शोरूम किंमत २ रजिस्ट्रेशन ३ डेपो चार्जेस ४ इन्शुरन्स ह्या सदरांखाली पैसे घेतात १. नुसती एक्स शोरूम पैसे मोजून वाहन खरेदी करता येते का --असे केले तर मुख्य अडचणी आणि मुख्य फायदे काय आहेत ? २ रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्स online करतात असे डीलरच म्हणतात मग ते आपणच का करू नये ? --२.a डीलर चा इंश्युरंस आणि आपला इन्शुरन्स ह्यात जवळपास दुपटी चा फरक आढळून आला आहे ३. डेपो चार्जेस ग्राहका कडून वसूल करणे हे नियमात /कायद्यात बसते का ? ते किती असावेत ह्यावर काही नियम / मार्गदर्शक तत्वे आहेत का ? ४. डिलिव्हरी घेतांना अमुक एक लिटर पेट्रोल घालून मग वाहन ताब्यात दिले जाईल असे वाहनाचे मन्युअल सांगते, प्रत्यक्षात १ २ (कमीत कमी) लिटर पेट्रोल घालून वाहन तय्ब्यात दिले जाते . जागो ग्राहक जागो च्या अंतर्गत ह्यावर कुणी काही तज्ञ मते देऊ शकेल का ?

वाचने 1584
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

भारत देशात नोंदणी करून नंबर मिळविल्याशिवाय वहान रस्त्यावर स्वतंत्रपणे चालवता येत नाही. असे करण्यासाठी देखील "तात्पुरते " सर्टीफिकेट व विमा लागतोच. विमा डीलरने करणे बंधनकारक नाही. पण तो किमान थर्ड पार्टी असणे आवश्यक असते.