काल सहजच बिटकॉईनची किम्मत पाहिली.
1 Bitcoin equals 2,56,380.08 Indian Rupee
२००८-१० मधे जेंव्हा बिटकॉईन ही संकल्पना बाल्यावस्थेत होती त्या वेळेस मार्च २०१० मधे ५० यूएस डी मधे १०००० बिटकॉईन उपलब्ध होत. मात्र कोणी खरेदीदार उपलब्ध होत नव्हता.
मे २०१० मधे एक व्यवहार केला गेला त्यात एका बिटकॉईन ची किम्मत .००३ डॉलर इतकी आली.
बिटकॉईन मधे व्यवहार सुरू झाले. त्याची किम्मत वाढू लागली.
मार्च २०११ पर्यंत ही किम्मत १ डॉलर = १ बिटकॉईन इतकी झाली.
जुलै मधे ती झपाट्याने वाढून ३१ डॉलर पर्यंत गेली.मात्र डिसेंबरपर्यंत उतरून २डॉलर वर स्थिरावली.
कमी अधीक होत जाणारी ऑक्टोबर २०१३ नंतर मात्र ही किम्मत सातत्याने वाढतच राहीली.
१७ डिसेंबर २०१७ ला ही उच्चांकी १ बिटकॉईन = १९७८३ डॉलर्स इतकी झाली.
मात्र एकाच दिवसात घसरून २२ डिसेंबर ला ती १ बिटकॉईन = १३८०० डॉलर्स इतकी झाली.
त्या नंतरही बीटकोईनची घसरण सुरूच राहीली
आज ती १ बिटकॉईन = ३५८९ डॉलर्स इतकी आहे.
हे पाहिले तर ज्याने सुरवातीला ५० डॉलर्स देवून १०००० बिटकॉईन घेतले असतील त्याला आजच्या हिषेबानेदेखील स्वप्नवत परतावा मिळाला असेल.
मात्र बिटकॉईन बद्दल व्यवहार /गुंतवणूक करताना काही शंका मनात येतात.
क्रिप्टो करन्सी मधे गुंतवणूक केलेली कितपत सुरक्षीत आहे?
क्रिप्टो करन्सीचे विनीमय दर कोण ठरवते / कसे ठरवले जातात?
क्रिप्टो चलनात काही खरेदी करावयाचे असल्यास ते कसे करता येते?
क्रिप्टो चलन विकत घ्यायचे असल्यास कुठून घेता येते?
क्रिप्टो चलनातील व्यवहारासाठी ब्यांका कितपत सहाय्य करतात?
क्रिप्टो चलन ( बिट कॉईन ) हे खरेच व्यवहाराचे चलन आहे की निव्वळ भूलभूलय्या?
वर्गीकरण
वाचने
5207
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
गहन पण रोचक विषय.
बिटकॉइन प्रकरण अजुन समजले
मध्यंतरी बच्चन
बिटकॉईन प्रकरण बरेच गाजते आहे
(No subject)
BITCOIN में INVESTMENT करें या नहीं
जितकी माहिती माझ्याकडे आहे ती इथे लिहीतो.
वा खूपच छान माहिती दिलीत दादा