आज 'मराठी राजभाषा दिन'.नेहमीप्रमाणे मराठीची काळजी करण्याचा दिवस. :)
दरवेळी भावनिक आवाहन करुन मराठी जपण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा यावेळी थोडासा उलटा विचार करुन पाहिला तर?
म्हणजे मराठीत बोला,मुलांना मराठी शाळेत घाला,आपली मातृभाषा आहे वगैरे वगैरे भावनिक आवाहन करण्यापेक्षा मराठी भाषा येत्या १०० वर्षात लोप पावली तर व्यावहारिक/आर्थिक स्तरावर(भावनिक नव्हे)काय नुकसान होईल याचा अंदाज बांधला तर? की केवळ सांस्कृतिक नुकसान तेवढंच होईल आणि व्यावहारीक नुकसान होणारंच नाही?
म्हणजे बघा,मोगल काळापासून मराठीत फार्सी शब्द आलेत.फार्सी ही मूळ भारतीय भाषा नाहीये.खरंतर ती भारतावर परकीय शासकांनी लादलेली भाषा आहे.ही भाषा त्याकाळी भारतीयांनी(इथे मराठी भाषिकांनी) स्वत:हून स्विकारलेली नव्हती.तत्कालिन शासकीय कारभाराची भाषा,मोगल शासकांची भाषा यातून ती पसरत गेली आणि अगदी आजही बरेच फार्सी शब्द मराठीत आहेत.यामुळे मराठी भाषा समृद्ध झालेली नाहीये.मूळ मराठी शब्दांची हकालपट्टी होऊन फार्सी शब्द त्या जागी आले.अन्यथा सावरकरांना भाषाशुद्धीसाठी प्रयत्न करावे लागलेच नसते.
अशाच प्रकारे इंग्रजीचं गारुड मराठी भाषिकांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसंच सर्वाधिक बोलली जाणारी भारतीय भाषा म्हणून जोडीला हिंदीचंही आक्रमण मराठीवर येत्या काळात वाढू शकतं.
हे असं काही होईल असं म्हणण्याला, वाढणार्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा,त्यातही अशा शाळांमधे मराठी भाषा सक्तीची नसणं,मुला-पालकांकडूनही दुसरी भाषा म्हणून जर्मन,फ्रेंच अशा पैसा मिळवायला उपयोगी ठरणार्या भाषा निवडलं जाणं,महानगरांमधे वाढणारा हिंदीचा प्रभाव आणि त्यामुळे बोलली जाणारी हिंदीमिश्रित/हिंदीप्रभावित मराठी, इंग्रजी सफाईदारपणे बोलता आल्याने लठ्ठ पगाराच्या नोकर्या मिळण्याची अधिक शक्यता,जागतिक स्तरावरच्या अधिक संधी उपलब्ध होणं यामुळे पुष्टीच मिळत नाहीये का?
हे दिवसेंदिवस वाढत आहे.याला टक्कर द्यायला मराठी कमी पडतेय.कमी पडत जाणार हे उघड आहे.
कशी असेल येत्या १०० वर्षानंतरची मराठीची स्थिती? भरमसाठ इंग्रजी आणि हिंदी शब्दांनी भरलेली असेल की केवळ भरमसाठ इंग्रजी शब्दांनी भरलेली असेल? कारण इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा असल्याने आणि तिचा आर्थिक प्राप्ती वाढण्याशी जवळचा संबंध असल्याने कदाचित हिंदीचीसुद्धा वाट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण पैसा,अधिकाधिक पैसा हा नेहमीच मानवाला आकर्षित करत आलाय. :)
मग अशी जी मराठी असेल ती मराठी म्हणण्याच्या पात्रतेची असेल का?
आज भारताची लोकसंख्या वाढती असली तरी ती सदोदित वाढतच नाही राहणार.कुठेतरी स्थिरावेल.पण जेव्हा स्थिरावेल तेव्हाही ती कमी नसणारंच आहे.मग या अफाट लोकसंख्येला पोट भरण्यासाठी अखिल जगात कुठंही जावं लागू शकतं.म्हणजेच पर्यायाने इंग्रजीचा संबंध आलाच.मजुरी काम आज जरी काही प्रमाणात मानवी श्रमांद्वारे केलं जात असलं तरी भविष्यात ते मोठ्या प्रमाणात यंत्रांकडून केलं जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.मग उरतील ती थोडी वरच्या स्तरावरची कामं.जिथे इंग्रजीचा आधार घेऊनच काम करणं अनिवार्य असेल.
तर त्याकाळी आपण मराठीपासून बर्यापैकी दूर गेलेलो असू.
म्हणजे आज या घडीला तरी अापण मराठी चांगल्याप्रकारे बोलता,लिहीता न आल्याने भविष्यात मराठी माणसांचं व्यावहारीक नुकसान काहीच होणार नाहीये असं ठामपणे म्हणू शकतो.भविष्यातही हे व्यावहारिक स्तरावर न अडणं कायम राहील की अडावं अशी काही आत्ता ज्ञात नसलेली परिस्थिती निर्माण होईल?
वर्गीकरण
मिसळपाव
१) नॅट जिओ,हिस्ट्री चानेल्सवर
In reply to १) नॅट जिओ,हिस्ट्री चानेल्सवर by कंजूस
काही वर्षांपुर्वी मराठीचा
In reply to काही वर्षांपुर्वी मराठीचा by थॉर माणूस
थॉर माणूस!
अजून काही दशके तरी मराठी आताच्या
In reply to अजून काही दशके तरी मराठी आताच्या by तुषार काळभोर
समर्पक प्रतिसाद, पैलवान
पैलवान!
हम्म
हिंदीने ही भाषा तीच्या
In reply to हिंदीने ही भाषा तीच्या by विजुभाऊ
नुसती
In reply to नुसती by माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेब
मराठीचे व्याहवारिक महत्व
In reply to मराठीचे व्याहवारिक महत्व by मराठी कथालेखक
अरे हो.. मराठी चित्रपट