पहलगामचा हल्ला आणि इस्लाम
नुकतेच काश्मीरमध्ये काही पर्यटक फिरायला गेले असता तिथे टी आर एफ या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी त्या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला. ते मुस्लिम सोडून अन्य धर्माचे लोक आहेत हे समजल्यानंतर अगदी जवळून बेछुट गोळीबार केला आणि त्यात २८ जण मृत पावले. त्या मृतात्म्यांना श्रद्धांजली. _/\_
याच विषयावर हा धागा आहे. बरेचसे उजव्या बाजूचे विचारवंत हे इस्लाम हे एक जागतिक संकट आहे असे सतत सांगत असतात. जग सोडून द्या पण भारतासाठी तरी आपण त्याचा विचार करायला हवा. म्हणजे खरंच इस्लाम हे भारतासाठी एक संकट आहे का केवळ उजव्या बाजूचे लोक असे म्हणत आहेत म्हणून आपण ते मान्य करायचं का?
मिसळपाव