Skip to main content

ताज्या घडामोडी - १

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 14/07/2016 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव या संकेतस्थळावर आजपर्यंत राजकारण व आजूबाजूला होणार्‍या रोजच्या स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर अनेक धागे निघाले. राजकारणासंबंधी धागे बहुतेक वेळा एका विशिष्ट निवडणुकीच्या निमित्ताने निघाले होते. आजूबाजूला होणार्‍या घडामोडींवरील धागे एखाद्या विशिष्ट घटनेच्या निमित्त निघालेले होते. परंतु रोज होणार्‍या ताज्या घडामोडींसंदर्भात एकही धागा नाही. त्यासाठी 'ताज्या घडामोडी - १' हा धागा सुरु करीत आहे. या धाग्यात अंदाजे ३०० प्रतिसाद झाल्यावर पुढील धागा 'ताज्या घडामोडी - २' सुरू करता येईल.

डोंबिवलीच्या स्फोटाच्या निमित्ताने

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 29/05/2016 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच डोंबिवलीच्या एम आय डी सी च्या क्षेत्रातील एका कारखान्यात प्रचंड स्फोट होऊन डझनभर लोक मरण पावले आणि शेकडो जखमी झाले. शिवाय अनेक इमारतींना भेगा पडून मोठे नुकसान झाले आहे. एकेकाळचे रम्य, सुसंस्कृत शहर आज रासायनिक ज्वालामुखीच्या जवळ जाऊन बसले आहे. खुद्द एम आय डी सीत पाहिले तर घरांच्या आसपास कारखाने आहेत का कारखान्यांच्या आसपास घरे आहेत ते कळत नाही. घातक रसायने, वायु वगैरे वापरले जातात अशा कारखान्यांकरता कडक नियम असतात. त्यांच्या आसपास पुरेशी मोकळी जागा, प्रशिक्षित कामगार असणे वगैरे. पण डोंबिवलीची एम आय डी सी केवळ पैसे खाऊन हवी ती कागदपत्रे बनवते.

मांगी तुंगी, स्टॅच्यू ऑफ अहिंसा, धर्मवाद, निसर्ग आणि आपण

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 27/01/2016 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या भारत देशाचं एक फार मोठं दुर्दैव आहे. इथे नैतिकाची पूजा करणारे लोक नगण्य आहेत, आणि भौतिकाची पूजा करणारे असंख्य. त्यात इथे पुतळे, स्मारकं यांचं लोकांना व्यसनच आहे असं म्हणायला हवं. त्या मूर्ती, पुतळ्यांकडून लोकं काय आणि कशी प्रेरणा घेतात हा एक प्रश्नच आहे कारण लोकांचं आचरण कुठेच बदलताना दिसत नाही. अशाच एका पुतळ्याविषयी एक व्यथित करणारी बातमी पाहिली. महाराष्ट्रात नाशिकच्या पुढे सटाणा येथे एक 'मांगी-तुंगी' नावाची जागा आहे. हा एक सुमारे ४४०० फूट उंचीचा पर्वत आहे ज्यावर जायला ४५०० हून अधिक पाय-यांचा मार्ग आहे.

पुन्हा इशरत जहान

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 13/12/2015 03:03 या दिवशी प्रकाशित केले.
जगप्रसिद्ध दहशतवादी डेव्हिड हेडली हा अमेरिकेत कैदेत आहे. हा अतिरेकी २६/११ च्या भारतीय हल्ल्याचा आयोजक समजला जातो. हल्ल्याच्या आधी तो दोन तीन वेळा त्या त्या हॉटेलात येऊन टेह्ळणी करुन गेला होता. त्या माहितीचा उपयोग करुन पाकिस्तानी अतिरेक्यांनी आपला हल्ल्याचा बेत आखला. अमेरिकन सरकार ह्या माणसाचे हस्तांतरण करु इच्छित नाही. भारतीय न्यायालयाने ह्याला माफीचा साक्षीदार बनवले आहे. त्याने असे म्हटल्याचे सांगितले जाते की इशरत जहान ही तरुणी आमच्या आत्मघातकी पथकाची (अर्थात सुसाईड स्क्वॉडमधली) एक बाई होती.

देऊळ, लोकल ट्रेन, चित्रपटगृह आणि माणसं

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 01/12/2015 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
तीन घटना. तीन बातम्या. आणि तीन प्रकारे वागलेली तिथली माणसं. याबाबत मी गेले तीन दिवस विचार करतोय. रत्नाकर मतकरींचं एक वाक्य आठवतं, 'माणूस वाईट नसतो; माणसं वाईट असतात.' याबद्दल विचार केला की त्यांचं म्हणणं किती खरं आहे ते जाणवतं. या घटना वृत्तवाहिन्यांनी, वृत्तपत्रांनी पुरेशा चघळल्यात त्यामुळे त्या सगळ्यांना माहित असतीलच. लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या जनसमुदायाचं वागणं, त्यांचा विचार. शनिशिंगणापूरला, जिथल्या देवळात स्त्रीयांना प्रवेश निषिद्ध आहे, तिथे एका मुलीने जाऊन तेलाचा अभिषेक केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.

कलेवराचा उत्सव?

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 06/10/2015 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ता मधे प्रकाशित झालेल्या 'कलेवराचा उत्सव' या लेखाच्या लेखकास हे पत्र. यातील मजकूर कुणा एका व्यक्तीस उद्देशून नसून तो केवळ एक विचार समजावा. नमस्कार, लोकसत्ता चा मी एक नियमित वाचक असून त्यात प्रकाशित झालेला आपला 'कलेवराचा उत्सव' हा लेख वाचला. (http://www.loksatta.com/vishesh-news/rajiv-khandekar-article-1147141/) त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी म्हणून हा ई-संदेश. आपली कळकळ या लेखातून वाचकांपर्यंत नक्कीच पोचली.

सदाहरित धागा - बातम्या ऐकवा.. भाग २

लेखक धर्मराजमुटके यांनी सोमवार, 29/06/2015 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या धाग्यावर प्रतिक्रिया शंभरच्या आसपास पोहोचल्याने नवीन धागा तिथल्या नव्या बातमीच्या प्रतिसादापासून वेगळा काढून नव्याने सुरु करत आहोत. - संपादक मंडळ जेव्हा संवेदना मृत्यू पावतात… बेस्ट बसच्या धडकेने जबर जखमी झालेल्या दोन तरुणी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यात पडलेल्या... मात्र त्यांना वेळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी मदतीचा हात देण्यासाठी कोणीही पुढे येईना...