Skip to main content

अद्भुतरस

मनकवडी

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 25/08/2013 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
कसा आहेस ?…… प्रश्न एसेमेस मसस्स्स….स्त !!………. उत्तर एसेमेस … लिहिलेला "मस्त" हा मुका शब्द गाभ्यातला कातर स्वर लपवू शकला नाही उत्तरकर्त्याचं आत्मभान, स्वाभिमान, उसनं अवसान ओसांडून वहात होतं त्याच्या अंतर्मनाच्या सांत्वनासाठी… मन, स्वत:शी आणि त्याच्याशी एकरूप झालेल्या द्वैताशी प्रतारणा करू शकत नाही व्यक्त अणि अव्यक्त यांतून परिस्थितीनुरूप एकाच भावनेचे भ्रामक अथवा अर्धसत्य अविष्कार घडत असतात त्यातल्या सत्य वाहनाला "टेलीपथी" म्हणतात असे सूक्ष्म संदेश नेमके वाचू शकणारी माणसं "मनकवडी" असतात ……………………. अज्ञात
काव्यरस

आजहि

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 16/08/2013 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
आजहि बुलबुल तेच बोलते दुष्कर भाषा परी ही ती दूर क्षितीजावरती दिसते क्षीण तेवणारी पणती आशा नाजुक हिरवळते दरवळते प्रतिमा ओझरती अमिट स्वरांचे हे नाते गुंजारवते अवती भवती श्रावण धारा लोभस वारा भाव भावना ओघवती पागोळी हळुवार उतरते आतुरल्या काठावरती वलये वलये उठती विरती हुर हुर मनभर कातरती सांज सकाळी आठवती नयनांत रेखलेल्या भेटी …………… अज्ञात
काव्यरस

किमया

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 14/08/2013 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाषा,… शब्दांची किमया अर्थबोध मानभावी माया जाण काय समजे ना कांही वय तितुके बघ गेले वाया हसणे रडणे भाव भावना अंत:कळा हृदयास कळाया कोश कठीण भिजण्यास हवे स्पर्शता सकळ अंकुर रुजवाया ……………………अज्ञात
काव्यरस

सद्गदीत

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 05/08/2013 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
हलकेच खुणावे मज कोणी अंतरी सुरस श्रावण गाणी मन सुप्त कहाणी एकेरी व्यापल्या साचल्या आठवणी प्राजक्त क्षणांची ही वाणी ओळखी सख्यांची आळवणी उमले दरवळ कर्पुरी उरी नि:संग नितळ जणु की पाणी आकार निराकारात खुळा भिरभिर घरभर ही चाचपणी आनंद कधी विरहात भरे सद्गदीत द्वय हृदय पापणी ……………… अज्ञात
काव्यरस

विरंगुळा

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 24/07/2013 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
नाते नाही मीच एकला श्वासांमधुनी नाद ऐकला कान्हा कान्हा बोले राधा तूच आसरा तू विरंगुळा कोषामधले उमलू पाहे गंध आतला दाटुन आला भेद तरी पण इथला तिथला तूच आसरा यू विरंगुळा मंद कशी ही झाली मेधा अंध मती पथभर मन बाधा न कळे कोणी का लपलेला तूच आसरा तू विरंगुळा ........................अज्ञात
काव्यरस

अवनी

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 19/07/2013 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
भिजल्या उरात जखमा सजले नवीन गाणे वारा उतून वाहे गुंफीत गूढ कवने ओटीत सांडले जे अस्पर्श स्पर्श लेणे फुलल्या सयी पुन्हा त्या झाले सुरेल जगणे अंकूर सुप्ततेचे बिलगूनसे अडाणे वेडात धुंदलेले नि:शब्द मन शहाणे आजन्म भुक्त जैसी आसक्त ओल माती ओढाळल्या गतांचे शब्दाविना तराणे पवनासवे वराती मेघात सकल पाणी सहवास लाघवाचा स्वच्छंद मूक वाणी सुखनैव वेदनांची गर्भारली विराणी अवनीच की जणू ही दूजी नसे कहाणी ........................अज्ञात
काव्यरस

" धन्य आज दर्शनाने तुझ्या -"

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 19/07/2013 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
नाम जपलं विठ्ठलविठ्ठल, मी तुला पहाया रोज मूर्ति बघणे छंदच मनातून माझ्या || आज दर्शनाने झाली धन्य धन्य काया डोळियाचं फिटलं पारणं जीव नाही वाया || चाल चालुनी शिणली रे जर्जर ही काया ध्यास घेतला होता मी, काळजामधुनी या || तूच ध्यानि तूच मनी रे पंढरिच्या राया शेवटी मला पावला देवा तूच विठू राया || व्हावं सोनं देहाचं ह्या, वाटले मना या डोळियाचं पाणी माझ्या, गेलं नाहि वाया || धन्य आज दर्शनाने तुझ्या पंढरीत मी या आनंदानं लोटांगण हे पायावर तुझिया || .
काव्यरस

शब्द शब्द

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 17/07/2013 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द शब्द शब्दातच सारे शब्द जिव्हाळा शब्द उन्हाळा वडवानळ जळ शब्द पसारे एक एकट्या एकांताचे कूस छत्र घर शब्द सहारे मुक्या जाणिवा गभुळ जखमा आतुर माया शब्द शहारे नभ संचित आकाश पवन घन शब्दच वेडे ऋतु झरणारे खोल ओंजळी लाव्हा अंकित खुपणारे सल शब्द बोचरे शब्द उतारा सकल प्रार्थना आत्म संहिता शब्द खरे .....................अज्ञात
काव्यरस

" आम्ही वारकरी, निघालो पंढरपुरी - "

लेखक विदेश यांनी शनिवार, 13/07/2013 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही वारकरी, निघालो पंढरपुरी हाती टाळ, चिपळ्या, वीणा, एकतारी .. भाळावरी गंध, विठ्ठलनाम छंद विठ्ठलस्मरणांत होतो सारे धुंद .. तुळशीवृंदावनाचा डोईवर ना भार पेलतो विठ्ठल आमचा हा संसार .. भक्त सारे गुंग मुखात अभंग भजनात रंग कीर्तनात दंग .. जातीभेदा वारीत नाही हो थारा विठ्ठलभावाचा एक सर्वास निवारा .. उच्चनीच नाही, नाही रावरंक सर्वांनाच मोही विठ्ठलनाम एक ..
काव्यरस

आधीन

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 08/07/2013 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
ओठात माणसांच्या पोटातले उखाणे मेघात चांदण्यांचे संकेत आड गाणे आधीन ओघळांच्या वाहे उदंड पाणी एकांत सागराची पागोळते विराणी थेंबास थेंब भेटे वाटेत पथिक गोटे ओसांड अंतराचे पथ सोडुनी समेटे कधि कुंपणे तळ्याची प्रतिबिंब अंबराचे साकेत भ्रामकांचे अंदाज थेट खोटे सारे खरे परंतू हृदयी उलाल कोणी मातीत सांडलेले उगवे फिरून अवनी संजीवनी जणू ही गत सुप्त भावनांना आशा अजून वेडी संदेश हा पळांना ........................अज्ञात
काव्यरस