Skip to main content

" धन्य आज दर्शनाने तुझ्या -"

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 19/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
नाम जपलं विठ्ठलविठ्ठल, मी तुला पहाया रोज मूर्ति बघणे छंदच मनातून माझ्या || आज दर्शनाने झाली धन्य धन्य काया डोळियाचं फिटलं पारणं जीव नाही वाया || चाल चालुनी शिणली रे जर्जर ही काया ध्यास घेतला होता मी, काळजामधुनी या || तूच ध्यानि तूच मनी रे पंढरिच्या राया शेवटी मला पावला देवा तूच विठू राया || व्हावं सोनं देहाचं ह्या, वाटले मना या डोळियाचं पाणी माझ्या, गेलं नाहि वाया || धन्य आज दर्शनाने तुझ्या पंढरीत मी या आनंदानं लोटांगण हे पायावर तुझिया || .
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 775
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया