बॅंकांचे खाजगीकरण : स्तुत्य उपक्रम
भारत सरकारने एके काळी खाजगी आस्थापनाकडून बँका चोरून बळजबरीने आपल्या केल्या. मग ह्या चांगल्या चालणाऱ्या बॅंकांना सुशिक्षित लोकांची मनरेगा असल्या प्रमाणे वापरले. भ्रष्टचार माजवला. गरीब लोकांच्या ठेवी चुकीच्या लोकांना लोन म्हणून दिल्या, बँकांना जबरदस्तीने अल्पभूधारक शेती सारख्या रिस्की गोष्टींना कमी दरात लोन द्यायला भाग पाडले. शेवटी हि सर्व सर्कस एक ना एक दिवस कोसळणारच होती. पेटीम, गूगल पे, ऍमेझॉन इत्यादी आधुनिक कंपन्या आता फिनटेक मध्ये येत आहेत त्यामुळे बँकिंग क्षेत्रच मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे आणि ज्या निष्क्रियतेने सरकार डझन पेक्षा जास्त बँका चालवत आहे तो मॉडेल जास्त दिवस टिकेल अशी आशा नाही. अजून पर्यंत करदात्यांचे लक्षावधी कोटी रुपये ह्या बँकांत कृष्णार्पणमस्तु झाले. अनेक ग्रामीण भागांत जिथे एक बँक सुद्धा चालणे मुश्किल आहे तिथे भारत सरकारच्या विविध बँकाच्या तीन शाखा आहेत. स्टेट बँक जिथे आधीपासून आहे तिथे युनियन बँक ची शाखा का बरे उघडावी ? अर्थात सरकारी कामांत तर्क नसतो. जास्त शाखा म्हणजे जास्त कर्मचारी. मग नुकसान झाले तरी चालेल पण फुकट्या लोकांना सरकारी पगारावर पोसायला पाहिजे.
जुन्या काळी राजाची चाटुकारिता केली कि राजा मग एखादे गांव जहागीर म्हणून बक्षीस द्यायचा त्याप्रमाणे बँकांतील नोकऱ्या ह्या आधुनिक काळांतील जहागिरी होत्या.
देशाची प्रगती व्हायला पाहिजे तर भांडवल हे महत्वाच्या गोष्टींत गेले पाहिजे. बँकांचा नफा जास्त तर मग बँका जास्त रिस्क घेऊन लोन देऊ शकतात. त्यामुळे प्रगतीचा वेग वाढतो. त्याशिवाय कमी कर्मचारी असल्यास हेच मनुष्यबळ इतर चांगल्या उद्योगधंद्यांत वळते आणि समाजाचा फायदा होतो.
** सरकारी पावले का उचलली गेली आहेत ? **
आधीची ५ वर्षे मोदी सरकारने काहीही विशेष आर्थिक सुधार न करता वाया घालवली आहेत. अचानक मग आता हि उपरती का बरे सुचली ? ह्याचे कारण आहे कि सरकारी बँका धोक्यांत आहेत आणि ह्यांचे दिवस भरले आहेत. ह्यांना वेळीच बंद केले नाही तर पुढील १० वर्षांत सरकारला आणखीन पैसा ओतावा लागणार आहे.
संपूर्ण जुनाट बँकिंग क्षेत्र धोक्यांत आहे. येत्या काही वर्षांत मोदी सरकार आर्थिक प्रगती वाढवण्यासाठी ठेवींचे दर बऱ्यापैकी कमी करणार आहेत अशी चिंन्हे आहेत. FD चे दार कमी झाले कि कर्जाचे व्याजदर सुद्धा कमी होतात त्यामुळे कर्ज घेऊन नवीन उद्योग धंदे सुरु करण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे रोजगार वाढतो. त्याशिवाय FD वर जास्त व्याज मिळत नसल्यास लोक इतर क्षेत्रांत पैसे गुंतवतात त्यामुळे आणखीन रोजगार निर्माण होतो.
सरकारी बँका मागील काही वर्षांत कँसर प्रमाणे वाढल्या आहेत आणि त्यांचे ओझे फारच कठीण झाले आहे. ह्या बँकांना शेप मधेय ठेवण्यासाठी रिसर्व बँक तसेच अर्थखाते ह्यांचा बराच वेळ आणि पैसा वाया जातो. हा अपव्यय सरकार कमी करणार आहेच पण त्याशिवाय रिलायन्स, गूगल, पेटीम, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट इत्यादी वेगवान आणि आधुनिक प्रकाची खाती लोकांना देतील अशी चिंन्हे आहेत. आधार कार्ड मुळे कागदपत्र व्यवहार अत्यंत सोपा झाला आहे. ऍमेझॉन ICICI क्रेडिट कार्ड तुम्ही हल्ली घरबसल्या ३-४ दिवसांत मिळवू शकता.
पण काही सूत्रांच्या माहितीप्रमाणे भारतांत रिटेल इंवेस्टिंग सुद्धा बऱ्यापैकी वाढणार अशी चिंन्हे आहेत. अमेरिकेतील रॉबिनहूड ऍप्प प्रमाणे स्वस्तांत आणि सहज स्टोक मार्केट, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायला अनेक कंपन्या आपली एप्स बाजारांत आणणार आहेत. एकदा हि ऍप्स लोकप्रिय झाली कि जुनाट बँकिंग व्यवस्था हळू हळू डायनोसॉर प्रमाणे नामशेष होत जाईल. काही मोठया कंपन्यांनी ह्या विषयावर RBI आणि निर्मला सीतारामन ह्यांची मनधरणी केली आहे.
नको असलेल्या बॅंक्स विकून सरकारी भार कमी करणे हि बँकिंग क्षेत्रांतील सर्वांत छोटी स्टेप आहे. ह्यानंतर आणखीन मोठी पाऊले सरकार घेईल असे वाटते. म्हणूनच सरकार आत्मविश्वासाने हा अजेंडा पुढे रेटत आहे.
टीप : संप करणाऱ्या लोकांना माझा अजिबात पाठिंबा नाही. नोकरी पसंद नसेल तर सोडून इतर ठिकाणी जा. उगाच संप करून कष्टकरी भारतीयांना त्रास देऊ नये. २०२१ मध्ये जास्त पैसे सरकारी बँक मध्ये ठेवूच नये. ३-४ बँक मध्ये विभाजित करून ठेवावे आणि किमान ७०% पैसे ICICI किंवा HDFC मध्ये ठेवावेत.
In reply to जिथे जास्त व्याज तिथे लोक पैसे गुंतवता त by Rajesh188
पोस्ट
In reply to पोस्ट by चौकस२१२
चांगले आहे की मग. एक तर
मागे ही बातमी वाचली होती
In reply to मागे ही बातमी वाचली होती by सुखीमाणूस
तो त्या माणसाचा बिझनेस आहे.
In reply to तो त्या माणसाचा बिझनेस आहे. by पिनाक
हैसियत
In reply to हैसियत by चंद्रसूर्यकुमार
यात काहीही विसंगती नाही?
In reply to हैसियत by चंद्रसूर्यकुमार
बाकी याच माणसाने लंडनला
In reply to बाकी याच माणसाने लंडनला by आनन्दा
आपण लोकशाहीत राहतो हे लक्षात
In reply to आपण लोकशाहीत राहतो हे लक्षात by पिनाक
पण लोकशाही राष्ट्रात अमुक एक
In reply to तो त्या माणसाचा बिझनेस आहे. by पिनाक
हैसियत
In reply to हैसियत by चंद्रसूर्यकुमार
दोन्ही गोष्टी असतील तर ते
In reply to मागे ही बातमी वाचली होती by सुखीमाणूस
घोटाळा आणि कॉंग्रेस....
बॅंकांचे खाजगीकरण : स्तुत्य उपक्रम
बॅंकांचे खाजगीकरण : स्तुत्य उपक्रम
आदरणीय रघुराम राजन काय
In reply to आदरणीय रघुराम राजन काय by अनुप ढेरे
राजन
In reply to राजन by चंद्रसूर्यकुमार
असले प्रकार इतक्या ज्येष्ठ प्रोफेसरला शोभतात का?
In reply to राजन by चंद्रसूर्यकुमार
राजन ह्यांचे कर्तृत्व विशेष
In reply to राजन ह्यांचे कर्तृत्व विशेष by साहना
राजन
In reply to राजन by चंद्रसूर्यकुमार
राजन यांना राजकीय
In reply to राजन यांना राजकीय by मनो
हो
BJP सरकार ला
In reply to BJP सरकार ला by Rajesh188
लोकांचा अर्थतज्ञांवरील विश्वास..
In reply to लोकांचा अर्थतज्ञांवरील विश्वास.. by अनन्त अवधुत
अर्थतज्ञांवर....
एअर इंडिया!
In reply to एअर इंडिया! by चौकस२१२
एक शंका
In reply to एक शंका by बापूसाहेब
माफीचा दर
In reply to एक शंका by बापूसाहेब
हो. त्यांना बिझनेस क्लास मधून
In reply to हो. त्यांना बिझनेस क्लास मधून by श्रीगुरुजी
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to एअर इंडिया! by चौकस२१२
एअर इंडिया इतकी घाणेरडी