"ओळखा पाहू... कोण आहे पुढचा/ची कॉन्ग्रेस अध्यक्ष" हे अनेक अंकी दीर्घ नाटक आहे.
ते जेवढे ताणणे शक्य आहे तेवढे ताणत नेले जाईल. त्या कालखंडाचा उपयोग गांधी घराण्याच्या पायाखाली आपले स्वत्व अंथरण्यासाठी थोडासाही विरोध कोणाचा आहे हे ओळखण्यासाठी केला जाईल (व त्यांचा नि:प्पात केला जाईल)... आणि सरतेशेवटी अध्यक्षपदाची माळ कोण्या एकाच्या गळ्यात घातली जाईल.
त्या उमेदवारीसाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत...
१. खूप मनधरणी करवून घेऊन, खुंटा हलवून हलवून बळकट करून घेऊन, सर्व लहान-मोठ्या, उघड-छुप्या विरोधकांचा आपल्या इमानी सेवकांच्या हाती पूर्ण पाडाव करून, कॉन्ग्रेसजनांवर थोर उपकार करत आहे अश्या अविर्भावात, राहून गांधी परत अध्यक्षपद स्विकारतील.
२. राहूल गांधी हे तसेही राजकारणासाठी तयार असलेले/होऊ शकणारे व्यक्तिमत्व नाही, हे वारंवार सिद्ध झालेले आहे. आपले हितसंबंध राखण्यासाठी जमा झालेल्या स्वार्थी कोंडाळ्याने जबरदस्तीने बोहोल्यावर उभे केलेले आणि त्यांच्या पढवणूकीप्रमाणे नाचणारे बाहुले बनण्याचा पुरेसा अनुभव घेतल्यावर, हे आपले काम नाही हे त्यांना समजले असावे. त्यामुळे, त्यांना अध्यक्षपदाचा खरोखरचा कंटाळा आला असणे शक्य आहे. उगा पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीचा फास सतत गळ्याभोवती ठेवण्याऐवजी; स्वच्छंद, जगभ्रमंतीचे, राजकारणतापहीन पण त्याचबरोबर पक्षामुळे मिळणारे फायदे ओरपण्याचे; सुखासिन पूर्वायुष्य त्यांना खुणावत असल्यास आश्चर्य वाटायला नको.
पण तरीही, कॉन्ग्रेस पक्षामुळे मिळणार्या मोठेपणा, सत्ता व अर्थकारणाची चावी दुसर्यांच्या हाती पूर्णपणे सुपुर्द करण्याइतके ते खुळे नाहीत... आणि त्यांनी तसे करावे म्हटले तरी, त्यांच्या 'मासाहेब' त्यांना तसे करू देणार नाहीत. याशिवाय, ज्यांना स्वबळावर महापालिकेची निवडणूकही जिंकणे शक्य नाही व ज्यांचे सर्वस्व गांधी घराण्याच्या चाकरीवरच अवलंबून आहे असे, 'मासाहेबांचे+युवराचांचे जवळचे शिलेदार', त्यांनी तसे करू नये यासाठी जिवाची बाजी लावतील, हे सांगायलाच हवे काय?
तर मग, युवराज नाही तर पक्षाध्यक्ष कोण होईल? याचे दोन पर्याय होऊ शकतात...
... २.अ) रागांना मनविण्याचे सर्व उपाय थकल्यावर, खुद्द मासाहेबांना गळ घातली जाईल.
* या पर्यायाला रागांचा किंवा जवळच्या शिलेदारांचा विरोध असण्याचा संभवच नाही (काय हिंमत आहे शिलेदारांपैकी कोणी विरोध करण्याची?!). पक्षाध्यक्षपद खुद्द आईच्या हाती असल्यावर, पूर्वीप्रमाणेच दाराआडून पक्षाच्या सत्ता आणि अर्थकारणामध्ये रागांची पाचही बोटे बुडालेली असतीलच !
... २.आ) मासाहेबही थकल्या असल्यास, शिलेदारांपैकी जो सर्वात इमानी, सर्वात नम्र आणि सर्वात मुका (आणि आई-बेटा सोडून इतरांसाठी बहिरासुद्धा) असेल असा एकजण निवडून, त्याला बोहोल्यावर चढवून, रिमोटकंट्रोलने चालवला जाईल. यासाठी, सचीन पायलट, मल्लीकार्जून खर्गे, सुशिलकुमार शिंदे, शीला दिक्षित, मीरा कुमार, ए के अॅथनी, इत्यादी अनेक नावे चर्चेत आहेत (पहिल्या वाक्यात दिलेल्या अटी पूर्ण करणार्यांची कमी कॉन्ग्रेसला कधीच भासलेली नाही ;) ) यापैकी, ए के अँथनी, मल्लीकार्जून खर्गे, सुशिलकुमार शिंदे हे तिघेही, अनेक कारणांमुळे, गांधी घराण्याशी (खुद्द गांधी परिवारपेक्षा जास्त) इमानी आहेत. त्यांच्यापैकी एक (त्याक्रमाने) निवडला जाईल अशी माझी अटकळ आहे. :)
* या पर्यायालाही मासाहेबांचा किंवा रागांचा विरोध असण्याचा संभव नाही (इतर शिलेदरांच्या विरोधाला विचारतोय कोण?). पक्षाध्यक्षपद रिमोट कंट्रोलने चालणार्या बाहुल्याच्या हाती असल्यावर, युपिए१+२ प्रमाणेच दाराआडून, पक्षाची सत्ता आणि अर्थकारण मायलेकांच्याच ताब्यात असेल ! शिवाय, "यश तेवढे आपले आणि अपयश मात्र दुसर्याचे" या नेहमीच्याच यशस्वी कॉन्ग्रेसी नाटकाचे प्रयोग, भविष्यातही यशस्वीपणे चालवता येतील, हा फार मोठा फायदा नजरेआड करून चालणार नाही. :)
======
अजून काहीसा चर्चेत असलेला तिसरा पर्याय म्हणजे, प्रियांका गांधी-वाद्रा.
* प्रियांकाशी निष्ठा वाहीलेल्या गटाचे जोरदार प्रयत्न चालू असले तरी, त्यांची ताकद फार कमी आहे आणि त्यांची डाळ शिजणार नाही. याशिवाय, त्या नावाला कॉन्ग्रेसमध्ये महत्व देण्यास खुद्द रागांचा विरोध असल्याचे मागील काही वर्षांच्या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. याशिवाय, जावयाच्या विक्रमी उपक्रमांमुळे वाद्रा या नावामागे असलेली वादग्रस्तता आड येईल, हेवेसांन. तसेच, गांधी नाव मागे पडून वाद्रा नाव पुढे येण्याची आणि पुढेमागे गांधी मायलेकांचीच गच्छंती होण्याची शक्यता, मायलेकांना (आणि त्यांच्या हुजर्यांनाही), परवडणारी नाही. तेव्हा माझ्या मते हा पर्याय सुरुवातीलाच बाद आहे.
वर्गीकरण
वाचने
36772
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला वाटते
वा वा ..
In reply to मला वाटते by श्वेता२४
प्रियांका वडेरा पुढील अध्यक्ष
अशीच शक्यता वाटते
In reply to प्रियांका वडेरा पुढील अध्यक्ष by खिलजि
२. राहूल गांधी हे तसेही
कोंग्रेस नामशेष होईल,
In reply to २. राहूल गांधी हे तसेही by चौथा कोनाडा
२.अ) खुद्द मासाहेबांना गळ
काँग्रेस राष्ट्रवादी मध्ये
पूर्वेतिहास आणि आपापली
In reply to काँग्रेस राष्ट्रवादी मध्ये by तेजस आठवले
काँग्रेसचा पुढील अध्यक्ष
विषय गंभीर आहे.
विषय गंभीर आहे.
विषय गंभीर आहे.
च्यायला...
त्रिवार सत्य
In reply to च्यायला... by अर्धवटराव
अरारारा
In reply to त्रिवार सत्य by नाखु
आता रडवणार का ?
In reply to अरारारा by अभ्या..
शक्य आहे
In reply to आता रडवणार का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभ्या लेका दंडवत घे, जबरदस्त
In reply to अरारारा by अभ्या..
@उपेक्षित & अभ्याराव
In reply to अभ्या लेका दंडवत घे, जबरदस्त by उपेक्षित
नमस्कार
In reply to @उपेक्षित & अभ्याराव by माहितगार
(कोणत्याही) घराणेशाहीत एवढी भावनिक गुंतवणूक कशी होते ?एखादा माणसाच्या मताला इतके पोलराईज्ड करण्याचा हा आपला अश्लाघ्य प्रयत्न आहे, खासकरुन त्या प्रतिसादाआधीच उपेक्षितरावांचा प्रतिसाद आला असताना. अगदी भांडणे चालू असताना एखादा जखमी होऊन हार पत्करता झाला तर प्रतिस्पर्धी किंवा त्याचे पाठिराखे त्याच्यावर परत हल्ला करत नसतात. किंवा त्या जखमी पराभुताबद्दल जे कुणी बोलतात, बाजू घेतात ती त्याखेळाडूबद्दल गुंतवणूक नसते. एक साधा माणुसकीचा प्रकार असतो. आणि मी, उपेक्षितराव तेच म्हणताहोत. मेलेल्याना मारणे आहे हा धागा म्हणजे. किंबहुना असे जे कुणी करणार नाहीत ते एका घराण्यालाच निष्ठा वाहिलेले आहेत असे मत व्यक्त करणे म्हणजे सरळ सरळ आरोप आहे. त्याशिवाय का असा प्रश्न येतो? बाकी आपल्या त्या दोन उपरोल्लेखित धाग्यामध्ये माझे मत चार पाच प्रतिसादात आहेच. ते परत वाचल्यास आपणास माझ्या मताचा अंदाज येईल आणि पुनरावृत्ती टाळली जाईल. अजुन एक गोष्ट नमूद करु इच्छितो, त्या दोन्ही धाग्यात आपण म्हणता तसे "संघाच्या सर्वोच्चपदावर सर्वजाती धर्मांना समान संधी असावी" ह्या एका मुद्द्यावरच काही निष्पन्न झालेले तथ्य असेल तर कृपया ते थोडक्यात इथेच विषद करावे ही नम्र विनंती. . . अवांतर टाळण्याबद्दल, लिंका न देण्याबाबत, गोल गोल फिरुन मुख्य उत्तर टाळण्याबद्दल आणि महत्त्वाचे म्हणजे प्रतिसादातून माझा राजकीय कल न ठरवण्याबद्दल अग्रिम धन्यवाद.अगदी मनातील बोललास अभ्या,
In reply to नमस्कार by अभ्या..
बसू एकदा
In reply to अगदी मनातील बोललास अभ्या, by उपेक्षित
चालतंय कि पंढरीला भेटू
In reply to बसू एकदा by अभ्या..
@उपेक्षित & अभ्याराव स.न.वि.वि
In reply to अगदी मनातील बोललास अभ्या, by उपेक्षित
अभ्यारावांसाठी काही आनंदाची माहिती
In reply to @उपेक्षित & अभ्याराव स.न.वि.वि by माहितगार
घराणेशाही बद्दल "आपला तो
In reply to अभ्यारावांसाठी काही आनंदाची माहिती by माहितगार
३४ वर्षात काँग्रेसचे अध्यक्ष पद केवळ इंदिरा गांधी आणि त्यांचे वंशज यांच्यातच आहे.
आणि हे म्हणे काँग्रेसमध्ये घराणेशाही नाहीच तरी बरं ज्या काँग्रेसचा वारसा हे लोक सांगतात ती काही यांच्या "बापाने" स्थापन केलेली नाही. ( निदान हा वारसा तरी सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे सांगू शकतील) १३५ कोटी भारतीयांत गांधी परिवार सोडला तर नेते नाहीतच का?लांगुलचालन आणि वैचारिक दिवाळखोरीची परिसीमा आहे
या धाग्यावरचे अभ्या..चे सगळेच
In reply to अरारारा by अभ्या..
चूक विश्लेषण
आले आले
In reply to चूक विश्लेषण by सुबोध खरे
मला अजून एक काळात नाहीये कि
In reply to आले आले by अभ्या..
+१
In reply to मला अजून एक काळात नाहीये कि by उपेक्षित
आमची घोषणा : भाजप चालनको,
In reply to +१ by मराठी कथालेखक
अटलबिहारी वाजपेयी यांच्या
In reply to मला अजून एक काळात नाहीये कि by उपेक्षित
हे आले लेबल भाद्दर.
नमस्कार
In reply to हे आले लेबल भाद्दर. by सुबोध खरे
दुसऱ्यांच्या माहितीबद्दल इतके छातीठोक पणे कसे बोलता येते?कारण जी माहिती मला आहे त्याबद्दलच छातीठोकपणे बोलतो, आणि लिहिलेले खोटे ठरवायचे काम संबधिताने केलेलेही नाही त्यामुळे तो पक्का असणारच. जगातल्या सगळ्या गोष्टींची माहीती मला आहे असा माझा समज बिल्कुल नाही, तो करुन घ्यायची इच्छाही नाही.इतकी जळजळ का होते आहे?टिपिकल निरर्थक शेरा आहे हा. इतक्या वर्षात असे शेरे कधी येतात ते चांगलेच कळलेले आहे, सो...नमस्कार.लिहिलेले खोटे ठरवायचे काम
In reply to नमस्कार by अभ्या..
अहो तुम्ही स्वतः कुंथत आहात
In reply to लिहिलेले खोटे ठरवायचे काम by सुबोध खरे
ओम शांती शांती:
अगं अगं म्हशी ( किंवा म्हसोबा
होय , यशोधराजी
In reply to अगं अगं म्हशी ( किंवा म्हसोबा by यशोधरा
ते
In reply to होय , यशोधराजी by भंकस बाबा
:))
जाणत्या राजाच्या नावाचा याहून
In reply to :)) by प्रसाद_१९८२
NDA सरकारच्या सत्ताकाळात
'अवजड उद्योग मंत्रालय'हेच खाते का दिले जाते, हा एक प्रश्नच आहे. . . . . . . -- . -- [खातच अस दिलेय, की काईच खाता येत नाही.] इती : मक्या अनासपूरे.:))
In reply to NDA सरकारच्या सत्ताकाळात by प्रसाद_१९८२
माझया मते ...
आनंदवनभुवनी
प्रथम प्रामाणिकपणे तळवे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तू शायर है मैं तेरी शायरी, तू आशिक़ है मैं तेरी आशिकी... :- Saajanकिती हे रिजेक्शन !!!
मी नाही.
लेखात व्यक्त केलेल्या
१. पक्षाला टांगणीला लावून,
१. पक्षाला टांगणीला लावून, पक्षाध्यक्ष रागा त्यांच्या रिवाजाप्रमाणे, परदेशात निघून गेले आहेत.-- राहूल गांधींना परदेशात जायची इतकी घाई झाली होती, की काल खासदारपदाची शपथ धेतल्यानंतर सही करायला देखील त्यांच्याकडे वेळ नव्हता. .....काय ठरलं मग ?
चौको,
In reply to काय ठरलं मग ? by चौथा कोनाडा
'लोकशाहीच्या भल्यासाठी एक
In reply to काय ठरलं मग ? by चौथा कोनाडा
'लोकशाहीच्या भल्यासाठी एक भक्कम विरोधी पक्ष असायलाच हवा' असा सतत गळा काढणार्या 'तथाकथित' विचारवंतांना किंवा इतर पक्षांच्या नेत्यांनाही त्याबद्दल काय म्हणावे हे सुचत नाही आणि ते तोंडात गुळणी धरून बसल्याचे नाटक करत आहेत. इतर कोण त्याबाबत काही बोलले तर, 'तो पक्षाचा अंतर्गत मामला आहे' हा हुकुमाचा एक्का असलेला मुद्दा आहेच ! मात्र तो मुद्दा मांडताना, (अ) कॉन्ग्रेस स्वतःला राष्टिय स्तरावरचा पक्ष आहे व (आ) सद्या लोकसभेत खासदारांच्या संखेनुसार दुसर्या क्रमांकाचा पक्ष आहे... त्यामुळे कोणत्याही भारतियाला त्या पक्षाच्या अवस्थेबद्दल (किंबहुना, दुरावस्थेबाबत) बोलायचा आणि काळजी व्यक्त करायचा हक्क आहे, हे ते महोदय (सोईस्कररित्या) डोळ्याआड करत आहेत.हे इतक्या लौकर इथे मिपावरही सिद्ध होईल असे वाटले नव्हते. =)) सजग नागरिकांनी सरकारवर नजर ठेवून त्याला सरळ मार्गावर राहण्यास जेवढे भाग पाडायचे असते, तेवढेच विरोधी पक्षांना त्यांच्या वैधानिक जबाबदार्यांची जाणीव करून देण्याची गरज असते. मुख्य म्हणजे, "निवडणूक हरले म्हणून आता विरोधी राजकीय पक्ष आराम आणि मजा करायला मोकळे झाले, आता त्यांच्यावर काहीच जबाबदारी नाही. त्या बिच्च्यार्यांना पाच वर्षे मोकळे सोडा." असा (वेडगळपणे किंवा (विरोधी पक्षाच्या पाठिराख्यांनी) हेतुपुर्रसर चलाखपणे) विचार न करता, "विरोधी पक्षांवर आता सकारात्मक कृती करून सरकारला सरळ मार्गावर ठेवण्याची जबाबदारी आहे", हा विचार जेथे रुजलेला असतो, तेथेच उत्तम लोकशाही व्यवस्था बनते. पूर्णविराम. मात्र, ती जबाबदारी म्हणजे, केवळ "विरोधी पक्षांनी बेजबाबदार आणि खोटी विधाने/कृती करून सरकारला जेरीस आणणे" नव्हे, हे सुद्धा नागरिकांनी ध्यानात ठेवायला पाहिजे... नाहीतर देशाच्या विकासाला खीळ लावण्याचे पाप, विरोधी पक्षांइतकेच, नागरिकांच्याही माथी असेल.अधीर रंजन चौधरी
नाटकाचा पुढचा अंक सुरु झाला.
ह्या विषयात आत्ताच ठाम मत मांडणे चुकीचं ठरेल
ओहो
In reply to ह्या विषयात आत्ताच ठाम मत मांडणे चुकीचं ठरेल by Rajesh188
Sonia Gandhi named interim
अभिनंदन
In reply to Sonia Gandhi named interim by डॉ सुहास म्हात्रे
१. असे म्हणतात की कॉन्ग्रेस
In reply to अभिनंदन by माहितगार
गराडा घातलेल्या पत्रकारांसमोर
In reply to १. असे म्हणतात की कॉन्ग्रेस by डॉ सुहास म्हात्रे
गराडा घातलेल्या पत्रकारांसमोर राहुल गांधींनी मला तर काश्मिर प्रश्ना संबंधात बोलवण्यात आले होते हे सांगुन थांबले असते तर राहुल गांधी कसले त्यांनी काश्मिर मध्ये हिंसक घटनेच्या बातम्या असल्याची पाकीस्तान्यांना शोभेलशी संतापजनक भाषा वापरली.हे सुद्धा नेहमीचे झाले आहे. रागांनी एखाद्या मुद्द्यावर पाकिस्तानची तळी उचलली नाही तर ती "अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट" असेल. त्यांचे हे पाकिस्तानला सोईचे बोलणे/वागणे, राजकिय विरोधाच्या सीमा ओलांदून जाणारे आहे... त्याबद्दल काही प्रवाद आहेत, पण ते बोलायची ही वेळ व स्थळ नाही.आपण जे पाळता ते वेळ आणि
In reply to गराडा घातलेल्या पत्रकारांसमोर by डॉ सुहास म्हात्रे
कॉन्ग्रेसला सद्या पाकिस्तानची
In reply to आपण जे पाळता ते वेळ आणि by माहितगार
हेमेटोलोजिस्ट